किस्सा वाचून तुम्हीपण म्हणाल, वाह् वाह् गेम करायची तर शरद पवारांसारखी…!!!

पवारांची गेम, महाराष्ट्राच्या राजकीय शब्दकोश काढायचा झाला तर या शब्दकोशात पहिलं वाक्य येईल ते पवारांचा गेम. पवार कधी कशी गेम करतील ये सांगता येत नाही. पण मॅटर असाय की प्रत्येक गेम मोठ्ठीच असेल अस पण काही नसतय.

कधीकधी पवारांनी अगदी साध्या गेम केलेल्या आहेत. अशा साध्या गेमवर कधी संपादकिय छापून आलं नाही की न्यूज चॅनेलच्या बातम्यांमध्ये त्या चर्चेत आल्या नाहीत पण इतिहासाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पवारांचे असे किस्से लपून राहिलेत.. 

असाच एक किस्सा पवारांनी केलेल्या गेमचा.

जो ऐकल्यानंतर तुम्हीपण म्हणाल राव छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठ्ठे डाव मारायचे असतात.. 

तर किस्सा आहे जूना. जूना म्हणजे तारिख, वार, सांगता येत नाही पण काळाचा अंदाज सांगता येतो. तेव्हा शरद पवार युवा आमदार म्हणून बारातमीतून निवडून आले होते तर उल्हासदादा पवार हे युथ कॉंग्रेस राज्याचे अध्यक्ष झाले होते.

झालेलं अस की या दोघांना दिल्लीतल्या एका केंद्रिय मंत्र्याला भेटायला जायचं होतं. 

ठरल्याप्रमाणे दोघेही दिल्लीला गेले. आजच्या सारख्या विमानतळावर उतरल्या उतरल्या हजर होणारा गाड्यांचा ताफा तेव्हा त्यांच्याकडे नव्हता. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर दोघांनी केंद्रिय मंत्र्यांच्या घरी जाण्यासाठी टॅक्सी केली. टॅक्सी चालवणारा व्यक्ती होता एक सरदार.. 

शरद पवारांनी टॅक्सीत बसल्यानंतर केंद्रिय मंत्र्यांच्या बंगल्याचा पत्ता सांगितला आणि भाडं किती होईल हे पण विचारलं. सरदारजीनं उत्तर दिलं. आत्ता विषय इतक्यावरच संपण्यासारखा होता पण पवारांना इथं गेम करण्याची हुक्की आली. पवारांनी काय केलं तर सरदारजीला टॅक्सीच्या भाड्याची अंदाजे रक्कम अगोदरच देवून टाकली आणि सरदारजीला सांगितलं, 

“ तुला भाड्याची रक्कम मिळालेय. आपण जेव्हा केंद्रिय मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहचू तेव्हा आम्हाला घेण्यासाठी ते बाहेर येतील. तेव्हा आम्ही तुला भाडे विचारू पण नको म्हणायचं, म्हणायचं की, अहो तुम्ही या मंत्र्याकडे आलात.

हे गोरगरिबांसाठी किती काम करतात. जनतेसाठी किती काम करतात. त्याच्याकडे आलेल्या लोकांकडून मी कसे पैसे घेवून.. अन् पैसे न घेता जायचं..”

ठरलं आत्ता टॅक्सी बंगल्याच्या दारात पोहचली आणि केंद्रिय मंत्री शरद पवार व उल्हासदादा पवारांना घेण्यासाठी स्वत: बाहेर आले. आत्ता शरद पवार टॅक्सीवाल्याला पैशाचा आग्रह करु लागले तोच टॅक्सीवाला नको नको करू लागला.

मंत्रीमहोदयांकडे पहात अहो, तुम्ही या साहेबांचे पाहूणे वगैरे ठरलेले डायलॉग फेकू लागला… 

पैसे न घेता टॅक्सीवाला गेला अन् इकडे मंत्रीमहोदयांचा चेहरा खुलला. ते शरद पवारांना सांगू लागले. बघ शरद दिल्लीत मला किती लोक मानतात. बघितल ना टॅक्सिवाल्याने तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत. केंद्रिय मंत्री शरद पवारांना आपली स्तुती सांगत होते अन् शरद पवार गेम केल्याच्या खुशीत होते. हा किस्सा अंकुश काकडे यांनी आपल्या हॅशटॅग पुस्तकात लिहून ठेवला आहे. 

हे ही वाच भिडू 

2 Comments
  1. Bhagwan says

    एक ऐकलेला किस्सा सांगतो .
    एका शहरातील एका वसाहतीत एक झाड तोडायचे होते पण मनपा काही त्याला परवानगी देईना.सर्वजण झटले पण परवानगी काही मिळेना.मग काही नागरिक एकदा थेट पवार साहेबांकडे गेले आणि आपला प्रश्न त्यांच्या कानावर घातला.साहेब म्हटले आमच्याकडे अशी परवानगी वगैरे घेत नाही हो.मग काय करता ? असा प्रश्न नागरिकांना पडला.साहेबांनी गावरान उपाय सांगितला.म्हटले त्या झाडाच्या खोडाजवळ अमुक अमुक टाका, झाड आपोआप वाळून जाईल .मग मनपाला सांगा.ते स्वतः हून येऊन झाड तोडून नेतील.
    हा किस्सा खरंच घडला आहे की नाही हे पवार साहेबच जाणो.

  2. Ashok Naringrekar says

    मोरचुदाचे पाणी टाकले,६ महिन्यात विषय संपला

Leave A Reply

Your email address will not be published.