मोरारजी दारूबंदीचा आग्रह धरत होते. पण पवार गंडवत राहिले अन् काम फत्ते झालं..

शिवांबू  म्हणजे स्वत: मुत्र पिणे. ऐकताना किती चुकीचं आहे हे अस् वाटेल पण आपल्याच आयुर्वेदात याच महत्व मांडण्यात आलं आहे अस सांगितलं जातं. तर हा प्रयोग करणारे नेते म्हणून इतिहासात मोरारजी देसाई प्रसिद्ध आहेत. चोरून मारून ते हा प्रयोग करत नव्हते हे विशेष. आपल्या आरोग्याचं रहस्य सांगताना ते शिवांबू प्रकरणाचे भरभरून जाहीर कौतुक करायचे. सर्वच लोकांनी हा प्रयोग करायला हवा असे त्यांचे ठाम मत होते. 

मोरारजी देसाईंचा हाच प्रयोग एकदा शरद पवारांसाठी मदतीला धावून आलेला. नेमका काय होता किस्सा ते सांगतो. 

तर झालेलं अस की राज्यात पुलोद च सरकार होतं आणि शरद पवार यांच्यासारखा तरूण व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला होता. तेव्हा केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाच सरकार अस्तित्वात होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान तर शरद पवार मुख्यमंत्री असा कार्यक्रम होता. 

तर यामुळे काय व्हायचं की मोरारजी देसाईंचा वारंवार मुंबई दौरा घडायचा. जेव्हा कधी दौरा असले तेव्हा प्रोटोकॉल नुसार शरद पवारांना मोरारजी देसाईंना विमानतळावर घेण्यासाठी जावं लागायचं. तिथून एका गाडीतून ही स्वारी मुंबईच्या राजभवनावर यायची. 

एकदा झालं अस की ठरल्याप्रमाणे मोरारजी देसाई मुंबई विमानतळावर उतरले.

मुख्यमंत्री शरद पवार त्यांना रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर पोहचले. दोघे एकत्र गाडीत बसले आणि मोरारजी देसाई यांनी राज्यात दारूबंदी करण्याचा विषय काढला. मोरारजी देसाई दारूबंदीसाठी आग्रही होते. तेव्हा राज्यात फक्त वर्धा जिल्ह्यात दारूबंदी होती. आत्ता या विषयातून सुटका नाही. पतंप्रधान अतीच फोर्स करत आहेत हे शरद पवारांनी जाणलं. पण हो नाही, करुया, करुया म्हणतं ती वेळ मारून नेली. 

पुढच्या वेळी देखील अशाच प्रसंगात विमानतळ ते राजभवन दरम्यान दारूबंदीचा विषय निघाला. आत्ता या चर्चेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांना दुसरा मुद्दा पाहीजे होता. पण मोरारजी देसाई कधीही भेटल्यानंतर दारूबंदीचाच विषय रंगवत असतं. 

एकदा असेच विमानतळावरून राजभवनाकडे एकत्र जात असताना पुन्हा मोरारजी देसाई यांनी दारूबंदीचा विषय काढला. तेव्हा शरद पवारांनी एक आयड्या केली. आपला हात छातीकडे नेवून चोळू लागले. छातीत जळजळ होतेय हे सांगू लागले. लागलीच मोरारजी देसाई यांनी राजकीय नेत्यांच आरोग्य हा विषय अजेंड्यावर घेतला आणि ते आरोग्य आणि त्या संदर्भातून शिवांबू बद्दल बोलू लागले. 

शिवांबूची महती सांगता सांगता राजभवन आले आणि पवारांची सुटका झाली. 

पुढच्या वेळी असाच प्रसंग आला तेव्हा मोरारजींच्या गाडीत बसताच पवारांनी शिवांबूचा विषय काढला. मी देखील शिवांबूचा प्रयोग करायला लागलोय आणि आत्ता त्याचा खूपच फायदा होतोय हे पवार सांगू लागले आणि मोरारजी यांच्यासाठी शिवांबूचा आवडता विषय चर्चेत आला. 

शरद पवार हा किस्सा सांगताना म्हणतात, 

शिवांबू हे प्रकरण सुरू राहिलं. ते खूष होते आणि मलाही दारूबंदीतून सुटकेचा मार्ग सापडल्याचा आनंद होता.

थोडक्यात काय तर पवारांना राजकीय चाणक्य म्हणतात. दरवेळी चाणक्य असण्यासाठी काहीतरी मोठ्ठी गोष्ट करण्याची गरज नसते अगदी छोट्याछोट्या गोष्टीतून पवार मार्ग काढतात हेच या किस्स्यातून दिसून येते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.