जेव्हा संरक्षणमंत्री शरद पवार भारतातच सर्जिकल स्ट्राईक घडवून आणतात…!

आज शरद पवारांचा वाढदिवस, शरद पवार आणि किस्से यांची संख्या त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वासारखीच. दोन्ही गोष्टींचा तळ सापडत नाही. एक किस्सा आपण सांगतो तोच पुढचा दूसरा किस्सा सांगतो. पण या किस्सेबाजीत काही महत्वाच्या कामाच्या गोष्टी सुटून जातात. 

वाढदिवसाच्या निमित्ताने अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हि गोष्ट सरकार दप्तरी नोंद करण्यात आलेली नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे भारताच्या सुरक्षतेचा प्रश्न.

शरद पवार तेव्हा संरक्षणमंत्री होते. राजीव गांधींची हत्या करण्यात आलेली होती. त्याचवेळी देशात अतिरेकी कारवाई करण्यासाठी पाकिस्तानची ISI मोठ्या प्रमाणात हालचाल करत होती. खलिस्तानचा प्रश्न देखील डोकं वर काढत होता.

पंजाब प्रांतात तेव्हा सरबत खालसा, खलिस्तान कमांडो फोर्स, बब्बर खालसा अशा दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात कारवाई करत होत्या. सीमाभागात होणाऱ्या या कारवाईंच्या पाठीमागे पाकिस्तानची ISI हि गुप्तचर संघटना होती. याच गुप्तचर संघटनेने आपल्या भागात दहशतवादी संघटनांना पोसलं होतं.

या संघटना मुक्कामाला पाकिस्तानमध्ये असत व वेळ पडताच घुसखोरी करत भारताच्या सीमाभागात दहशत निर्माण करत होत्या. 

पंजाब सधन भाग असल्याने सीमाभागात गाव व खेड्यांचे मोठ्ठ अर्थशास्त्र होतं. सीमाभागातल्या या गावांमध्ये रात्रीअपरात्री दहशतवादी घुसत असत. स्थानिक रहिवाश्यांना बंदुकीच्या जोरावर धमकावत असत. गावकऱ्यांच्या घरात मुक्काम करत असत. यामुळे पंजाब पोलिस सुद्धा अशा गावकऱ्यांवर कारवाई करत होते. रात्री दहशतवादी आणि दिवसा पोलिस कारवाई यामुळे पंजाबच्या सीमाभागातील कित्येक गावे ओस पडू लागली. 

दोन्ही बाजून होत असणाऱ्या जाचामुळे पंजाबमधील सामान्य माणूस पिचून गेला होता. 

शेतीचा भाग सधन असल्याने इथली गावे समृद्ध होती. तरिही शेती सोडून गावातले लोक बाहेर पडू लागली. शेतीच यांत्रिककरण झाले असल्याने या भागात टॅक्टर व शेतीचे अवजारे दुरुस्त करणारे, मेकॅनिक्स होते. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डॉक्टर्स असायचे, शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक असायचे. मात्र या सर्वांनीच या काळात गाव सोडून पळ काढला होता. अशा वेळी स्थानिक देखील भितीने गाव सोडून जात होता. 

यावर काय उपाय करता येईल याबाबत विस्तृत चर्चा जनरल सुनित रॉड्रिग्ज यांच्यासोबत करण्यात आली. संरक्षणमंत्री शरद पवार आणि जनरल सुनित रॉड्रिग्ज यांच्या चर्चेतून एक योजना अंमलात आणण्याची ठरवण्यात आले.

मात्र अशा गोष्ट करता येत नसल्याने दबाब होता मात्र शरद पवारांनी ऑफ रेकार्ड हि गोष्ट अंमलात आणण्याच ठरवलं. 

प्रथमत: देशभरात असणाऱ्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजस मार्फत लष्करामार्फत वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी टिमने या गावांमध्ये प्राचारण करण्यात आलं. मिलिटरी इंजनीअरिंग सर्व्हिसेस मार्फत इंजनिरिंगच शिक्षण घेणाऱ्यांना तिथल्या शिक्षकांना या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्याच सोबत संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठीच्या केंद्रीय महाविद्यालयातील शिक्षकांना देखील या ठिकाणी पाचारण केलं. 

या सर्वांचं वेषांतर करुन संबधित गावात गॅरेजवाला, शिक्षक, प्राथमिक आरोग्य अधिकारी म्हणून पाठवण्यात आलं. त्याच सोबत गावकरी म्हणून लष्करातील जवानांना पाठवण्यात आलं. या सर्वांना वेगवेगळ्या भागात नियुक्त करण्यात आलं. 

कोणताही गाजावाज न करता कामास सुरवात झाली. साध्या वेषातील लष्करी जवानांमुळे वेषांतर करुन राहिलेले गॅरेजवाले, शिक्षक, डॉक्टर देखील सुरक्षीत होते. जनजीवन सुरळीत चालू आहे म्हणल्यानंतर लोकांनी गावा सोडून जाणं बंद केलं. दहशतवादी गावात घुसल्यानंतर त्याची टिप मिळून त्वरीत कारवाई होवू लागली. पोलिसी अत्याचार होत असतील तर त्यावर देखील कारवाई करण्यात आली. 

या गोष्टीची नोंद मात्र करण्यात आली नाही. त्याचं कारण की,

नागरी भागात अशा प्रकारे लष्करी कारवाई करता येत नसते.  एक प्रकारे भारताच्या भूमीवर घडवण्यात आलेलं हे सर्जिकल स्ट्राईक होतं. ज्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यावर कारवाई तर करण्यातच आली पवार या गोष्टींचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात करतात. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.