एरव्ही दिवाळीत बंद असणारे शेअर मार्केट लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच का चालू असते ?

पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या आभाळभरून सुभेच्छा……येणारी  प्रत्येक दिवाळी तुमच्या आयुष्यात आरोग्य आणि धनसंपदा घेऊन येवो. चला मग धनसंपदाच्या सुभेच्छा आल्यात म्हणजेच लक्ष्मी आली. लक्ष्मी म्हणजेच संपन्नता आणि संपत्ती. 

आज दिवाळीमुळे सर्वांना सुट्टी असेलच..कोणत्याही ऑफिसला सुट्टी असू देत मात्र एक मार्केट कायम चालू असते. ते म्हणजे शेअर मार्केट. या मार्केटची एक वेगळीच दिवाळी असते जी फारशी कुणाला माहिती नसेल. खरं तर खरी ‘दिवाळी’ हि शेअर मार्केट मध्ये असते म्हणायला हरकत नाही.  शेअर मार्केट म्हणजे मूर्तीमंत लक्ष्मीच !    

शेअर मार्केट मध्ये महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे ‘मुहूर्त ट्रेडिंग’ याच गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत. मुहूर्त ट्रेडिंग’ हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असते.  हे मुहूर्त ट्रेडिंग’ मार्केटच्या इतर दिवसांच्या शेड्युलपेक्षा वेगळे असते.  शेअर मार्केट वाले लोकं लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा कसा करतात याची माहिती घेवूया. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त १-२ तासाच्या अवधीत मार्केट चालू ठेवलं जातं. या वेळेत सगळे ब्रोकर ट्रेडिंग करतात आणि त्यालाच मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात. जे जे लोकं शेअर मार्केटशी संबंधित असतात ते ते लोकं या दिवशी खरी दिवाळी साजरी करतात. बाहेर इकोनॉमी कोणत्याही अवस्थेत असो पण हे मुहूर्त ट्रेडिंग तेजीतच असते. हा थोडं वर खाली चालत असतंय. 

मुहूर्त ट्रेडिंग हे शेअर बाजारातील परंपराच आहे जे बऱ्याच काळापासून चालत आली आहे. दिवाळीच्या दिवशी बाजार बंद असला तरी लक्ष्मीपूजनाच्या वेळी गुंतवणूकदारांसाठी खुला केला जातो. 

शेअर मार्केट मधील लोकं म्हणतात कि, ‘लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जो शेअर घेतो तो देवासारखा किंवा मुहूर्ताचा असतो.. तो लगेच विकायचा नसतो..’

या मुहूर्त ट्रेडिंग विशेष वेळी, गुंतवणूकदार आणि बाजारातील दिग्गज शेअर बाजारात पैसे गुंतवतात. ही विशेष गुंतवणूक नफ्याच्या उद्देशाने केली जात नाही. बहुतेक लोकं याकडे एक ‘शुभ’ गोष्ट म्हणून पाहतात. विशेषतः ती लोकं, ज्यांचा उदरनिर्वाह शेअर बाजारावर चालत असतो. 

इतका महत्वाचा समजला जाणारा मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास काय आहे ?

आणि याच गणनेनुसार २०२१ हे वर्ष विक्रम संवतप्रमाणे २०७८ वं आहे असे म्हटले जाईल. आणि याच खास मुहूर्ताला साजरा करण्यासाठी, एक विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जातं ते म्हणजे ‘मुहूर्त ट्रेडिंग’.  याची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये १९५७  मध्ये झाली. तसेच ते १९९२ मध्ये NSE म्हणजेच राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरू झाले.

भारतात असेही काही ठिकाण आहेत जिथे दिवाळीला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून समजली जाते. त्याला एक शास्त्रीय नाव आहे ते म्हणजे ‘विक्रम संवत’ होय. 

इ.स.पूर्व ५७ दरम्यान राजा विक्रमादित्यने शकांवर विजय मिळवला होता. तर हा विजय एवढा मोठा होता की हे वर्ष एका नव्या युगाची सुरुवात आहे असं मानलं जातं. आणि याच गणनेला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजेच विक्रम संवत असे नाव देण्यात आलं. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ५७ वर्षे जोडून त्याची गणना केली जाते. 

यंदाचा मुहूर्त काय आहे ?

NSE च्या नोटिफिकेशन नुसार, ४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हे  सत्र सायंकाळी पावणे सहा वाजता सुरु होणार आहे आणि ६ वाजता संपणार आहे.

आता या मुहूर्तावर शेअर्स खरेदी करणे हे कितीपत शहाणपणाचे आहे ? आधी आपण बोलल्याप्रमाणे, या  मुहूर्तावर शेअर्स खरेदी करणे हे शुभ मानले जाते. या दिवशी लोक नफा/तोट्याचं टेन्शन न घेता पैसे गुंतवतात. सो तुम्ही बिनधास्त आजच्या या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये शेअर्स विकत घ्या अन दिवाळी साजरी करा. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.