शार्क पियुष बन्सलचं गणित कुठे गंडलंय, हे एका पठ्ठ्याने छातीठोकपणे दाखवून दिलंय

भारतात तर आता शार्क म्हटलं तर मासा नाही ‘शार्क टॅंक इंडिया’ डोळ्यासमोर येतंय. या रियालिटी शोनं लोकांना नादच असा लावलाय! त्यातही यात शार्क म्हणून घेण्यात आलेले जे पर्यवेक्षक आहेत त्यांची तर वेगळीच हवा होतीये.

पण एक गोष्ट जी सर्वश्रुत आहे ती म्हणजे, ‘प्रसिद्धी आपल्यासोबत अनेक आव्हानं घेऊन येत असते.’ तेव्हा एकदा का प्रकाशझोतात आलं की प्रत्येक शब्द खूप सांभाळून वापरावा लागतो. कारण आपलं थोडंही गणित बिघडलं की आपल्यावर शिरजोर होणारे लोक असतातच. असंच काहीसं झालंय शार्क पियुष बन्सल सोबत.

पियुष बन्सल म्हणजे लेन्सकार्ट कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ.

या शोमध्ये पियुष बन्सल हे येणाऱ्या जास्तीत जास्त कंटेस्टंट्सचे लाडके. त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसू स्पर्धकांना नवीन ऊर्जा देतं. आपली आयडिया घेऊन येणाऱ्या लोकांना हे शार्क काहीवेळा सल्लेही देत असतात तर काहीवेळा एखाद्या गोष्टीबद्दल स्टॅटिस्टिक सुद्धा हे मांडताना दिसतात.

असंच एका एपिसोडमध्ये पियुष यांनी स्वतःच एक निरीक्षण नोंदवलं, ज्यावर ते कसं चुकीचं आहे हे एका पठ्ठ्याने सिद्ध केलंय.

हा नायक म्हणजेच प्रियानजीत घोष. जो एका एआय (Artificial Intelligence) कंपनीचा सह-संस्थापक आहे.

गेल्या एपिसोड दरम्यान एका दुसऱ्या एआय (Artificial Intelligence) कंपनीच्या उद्योजकाची बोलताना पियुष यांनी मोतीबिंदूबद्दल कंमेन्ट केली. ते म्हणाले की, “कॅटरॅक्ट (मोतीबिंदू) इंडिया में बहुतभारी प्रॉब्लेम है, पर ग्लोबली कोई ‘AI’ ये अभी तक ऍक्युरेटली डिटेक्ट नाही कर पाता है.”

आता पियुष बन्सल यांनी हे टीव्हीवर बोललं आणि सगळ्यात भारताने ऐकलं. सोबतच ऐकलं प्रियानजीत घोष याने. मग काय, त्याने ‘लिंक्ड ईन’वर (LinkedIn) एक पोस्ट लिहिली ज्याच्यातून पियुष बन्सल यांचं गणित कसं गंडलंय? हे सिद्ध केलं.

घोष याने लिहिलं की, “मी शार्क टॅंक इंडियाचा स्पर्धक नाहीये. पण मी मोतीबिंदूवर मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आणि कमीत कमी संसाधनांच्या साहाय्याने भारतातील एआयचा वापर करून मोतीबिंदू स्क्रीनिंगचं निराकरण केलंय. हे एकदम परवडणारे आहे. अगदी घरबसल्या स्मार्टफोनचा वापर तुम्ही करू शकता, कोणत्याही अतिरिक्त डिव्हाईसची आवश्यकता नाही. हो, विश्वास ठेवणे अशक्य आहे, पण हे झालं आहे.”

पुढे हे ही लिहिलंय की, फक्त स्मार्टफोन इमेजेसच्या माध्यमातून मोतीबिंदू स्क्रीनिंग करत आम्ही ९१% अचुकता मिळवलीये. आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त स्क्रीनिंग आम्ही केले आहेत.

प्रियानजीतच्या या माहितीने पियुष बन्सलला आता ट्रोल केलं जातंय. जेव्हा आपण जज असतो तेव्हा विचारपूर्वक बोलावं, असं बोलल्या जातंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.