आता अर्णब वगरैना विसरा.. कारण मुलाखत घ्यायला येत आहेत जवान दिलोंकी धडकन !

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही चॅनेल्सना एकत्र करून नवा संसद टीव्ही सुरु होणार आहे हे आता अख्या गावाला माहित  झालंय. पण अँकर कोण बसवणार हा मोठा प्रश्न होता.

पण आता या प्रश्नावर उत्तर सापडलंय. 

तर ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे अशा तरुणांना आवडणारे कॉंग्रेस नेते शशी थरूर आणि शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी  या संसद टीव्हीवर चॅट शो होस्ट करणार आहेत. या चॅनेलच उदघाटन उपराष्ट्रपति आणि राज्यसभेचे सभापति एम. वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी केलं आहे.

आता संसद टीव्हीने जेव्हा एखादा भारी शो होस्ट करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर लागलीच शशी थरूर आले. तर महिला शो होस्ट करण्यासाठी शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आल्या. या शो मध्ये काय असणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर माजी खासदारांसह आता जे खासदार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू या चॅनेलवर होणार आहेत.

थरूर यांचा शो ‘टू द पॉइंट’ नावाचा असून, प्रख्यात व्यक्तींच्या मुलाखतींची मालिका यातून होस्ट करण्यात येईल. तर चतुर्वेदी यांच्या ‘मेरी कहानी’ या शोमध्ये महिला खासदारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. पण हे शो तयार करताना या दोघांना पण काही सूचना करण्यात आल्यात.

यात अर्णब करतो तसा दंगा आणि राजकारण चालणार नाही हे आधीच सांगण्यात आलं आहे.

त्यात अजून शो पण आहेत. म्हणजे सुरुवातीच्या यादीत किमान दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सरकारच्या सार्वजनिक धोरण, थिंक-टँक नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ या शोमध्ये ‘भारताच्या विकासाची कथा’ सांगतील. तर सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार संजीव सान्याल ‘आर्थिक सूत्र’ हा शो होस्ट करतील.

थांबा…संपलं नाही अजून

तर जेव्हा सभागृहाच अधिवेशन सुरु असेल तेव्हा संसद टीव्हीचे दोन फ्लॅटफॉर्म असतील. थेट प्रक्षेपण करण्यासाठी एक लोकसभेचे आणि दुसरे राज्यसभेचे असे दोन फ्लॅटफॉर्म. तसेच संसद टीव्ही हे द्विभाषिक चॅनेल असेल. अर्थातच हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रोग्राम तयार करण्यात येतील.

आता विशेष म्हणजे जर तुमच्या आवडत्या अँकरचा शो तुमच्याकडून मिस झाला तर टेन्शन नहीं लेनेका भिडू.. संसद टीव्हीचं ऍप्लिकेशन पण असणार आहे. आता हे कमी वाटेल म्हणून हे चॅनेल तुम्हाला सोशल मीडिया सोबतच ओटीटी प्लॅटफॉर्म वर बघायला मिळणार आहे.

सांगा असतंय का इतकं भारी कुठं. राव आता असं वाटायला लागलंय की, त्या अर्नबच मार्केट खाणार हे संसद टीव्ही. विषयच नाही ओ.. कारण, मोदी है तो मुमकिन है.  

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.