संपूर्ण देशभरात गाजलेल्या हत्याकांडामधील शीना बोरा खरंच जिवंत आहे का ?

संपूर्ण देशभरात गाजलेलं शीना बोरा हत्याकांड कुणाला नाही आठवत? आता त्याच हत्याकांड प्रकरणात एक फिल्मी ट्विस्ट समोर आला आहे.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. याच प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आणि शीना बोराची आई असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं हा खुलासा केला आहे….शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिलंय, असा दावा तिची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीनं केला आहे. 

तिचं असं म्हणणं आहे कि, जेल मध्ये तिला एक महिला भेटली आणि तिने सांगितलं कि, शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये पाहिलंय. या दाव्यामुळे आता सगळीकडेच खळबळ उडाली आहे. 

इंद्राणी मुखर्जी हिने, थेट सीबीआयला पात्र लिहून काश्मीर मध्ये शीना चा शोध घ्या अशी विनंती केली आहे. 

भायखळा जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहिलं असून शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंती इंद्राणी मुखर्जीनं केली आहे. पत्रासोबतच इंद्राणीने विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या. महिन्यात मुंबई हायकोर्टानं इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर इंद्राणी सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

२०१२ मध्ये २४ एप्रिल रोजी, शीना बोरा नावाच्या तरुणीची हत्या करण्यात अली होती. या प्रकरणाचा तपस करतांना इंद्राणी मुखर्जी हिच्या ड्रायव्हर शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या तपासादरम्यान हळूहळू या तपासाचे धागेदोरे बाहेर येत होते. त्याने दिलेल्या जबाबानुसार,  इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली होती. त्याने दिलेल्या या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.  संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून शीनाची हत्या केली आणि २५ एप्रिल २०१२ रोजी रायगड मध्ये तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती.

श्यामवरच्या म्हणण्यानुसार, इंद्राणी मुखर्जी  शीनाला तिची बहीण म्हणूनच ओळख सांगायची. पण पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समजलं कि, या दोघींचं नातं आई-मुलीचं आहे. इंद्राणीची तिच्या पहिल्या लग्नापासूनची मुलगी होती. 

पण हे सगळं प्रकरण २०१५ मध्ये उघडकीस आलं होतं. 

 

शीना बोरा हत्या प्रकरण उघडकीस आले जेव्हा इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला बंदुकीसह पकडण्यात आले. श्यामवारने मुंबई पोलिसांना सांगितले की, इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये शीना बोराची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणीला आणि तिच्या पहिल्या पतीला संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तसेच या कटात सामील असलेल्या पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. पण २०२० मध्ये तो जामिनावर सुटला. याच खटल्याच्या दरम्यान इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांचा इंद्राणीचा घटस्फोट झाला होता. 

पण तपास यंत्रणांनी जेंव्हा रायगड जिल्ह्यात शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्याचा दावा केला होता तेंव्हा मात्र हे दावे इंद्राणीने हे दावे फेटाळून लावले होते. आणि आत्ता शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करण्यात येतोय या दोन्ही मध्ये काही साम्य आहे का ? कि फक्त तपस भरकटवण्यासाठी चे प्रयत्न चाललेत याचा लवकरच शोध लागेल.  

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.