भारतात सगळ्यात पहिल्यांदा मुस्लिम धर्म या माणसाने आणला..

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुप्रीमो मोहन भागवत म्हणाले,

भारतातील हिंदू-मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत. आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत, पण ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर निर्माण केलं. तेव्हापासून आपण भांडत आहोत, मात्र प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहे.

सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. विदेशी आक्रमकांसोबत इस्लाम भारतात आला, हाच इतिहास आहे आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे.

राव हे जसं का ऐकलं, डोकं नुसतं घुमायला लागलं. खरंच हिंदू मुस्लिमांचे पूर्वज एक होते का ? हे शोधून काढायच ठरवलं. म्हणजे कोण असतील हे पूर्वज, कुठून आले असतील. म्हणून मनाशी ठरवलं की, कोणी हा धर्म भारतात आणला, हे शोधायचं… शेवटी सापडलंच..

ज्यांनी भारतात मुस्लिम धर्म आणला ते होते, शेख उबैदुल्लाह. एक मुस्लिम संत. अरबस्तानातून ते समुद्र मार्गे भारतात आले आणि त्यांनी भारतात, इस्लामचा प्रचार आणि प्रसार केला.

या उबैदुल्लाह यांचा जन्मच मुळी अरबस्तानातला 663 ई सालातला. ते अबू बकरचे पाहुणे होते. आता अबू बकर कोण तर ते इस्लाम धर्मातले पाहिले खलिफा होते. आणि मुहम्मद पैगंबरांचे सासरे देखील. जेव्हा उबैदुल्लाह अबू बकर यांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांच्यावर इस्लामचा प्रभाव वाढला. इस्लाम मध्ये इच्छा लालसा या वातावरणाला थारा नव्हता. त्यामुळे उबैदुल्लाह आपल्या भौतिकता वादी जीवनाला रामराम ठोकून इस्लाम धर्माकडे आकर्षित झाले.

उबैदुल्लाह यांच्या नावाचा अर्थ कुराणात दिला आहे. त्यांच्या नावाचा अर्थ अल्लाहाचा छोटा सेवक. उबैदुल्लाह या नावाच संक्षिप्त रूप आहे अब्दुल्ला. आणि उबेद पासून सेवक तर अल्लाह म्हणजे परमेश्वर.

त्यांच्या प्रारंभिक जीवनाविषयी जास्त काही माहिती उपलब्ध नाही. पण त्यांच्या वंशाबद्दल माहिती उपलब्ध आहे. म्हणजे ते अबू बक्र यांचे पाहुणे असल्यामुळे ती माहीती उपलब्ध होते.

उबैदुल्लाह हे धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामावर नियुक्त होते. थोडक्यात ते संत होते. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार उबैदुल्लाह एक दिवस पैगंबरांची मस्जिद मदिना इथं विश्रांती घेत असताना झोपले. त्यावेळी त्यांच्या स्वप्नात पैगंबर आले. पैगंबरांनी त्यांना इस्लाम धर्म वाढवण्यासाठी पूर्वेकडच्या देशांकडे प्रयाण करण्यास सांगितले.

उबैदुल्लाह यांना त्या स्वप्नांचा दृष्टांत मिळाल्यावर ते लगेचच समुद्र पार करून पूर्वेकडे आले. तो पूर्वेचा देश होता भारत.

समुद्रमार्गे प्रवास करत असताना त्यांचं जहाज भरकटले. समुद्रात मोठं वादळ निर्माण झालं होतं म्हणूनच वाऱ्याची दिशा, आणि भूमी शोधण्यात अडचण आली. ते भारताच्या शेवटच्या टोकाला पोहोचले लक्षद्विप या बेटसमूहावर.

तिथं त्यांनी आपलं धर्म प्रसार आणि प्रचार करायला सुरवात केली. सुरुवातीला त्यांच्या या कामात त्यांना स्थानिक लोकांनी अडचणी निर्माण केल्या. त्यात आणि भाषेचा मोठा अडथळा त्यांना या कामात आला. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी तिथली लोकल भाषा शिकून घेतली. जेव्हा ते आपले धर्माचे विचार लोकांना त्यांच्याच भाषेत पटवून द्यायला लागले. तेव्हा मात्र लोकांनी त्यांना आपलं मानलं. लोक त्यांचा धर्म स्वीकारू लागले.

पुढे त्यांचे हे शिष्य भारतात इस्लामचा धर्म प्रचार करू लागले. म्हणजे भिडूनो अरबस्तानातुन एका संताने येऊन इस्लामचा प्रचार आणि प्रसार केला. पुढं इस्लामी कट्टरपंथी आले. त्यांनी आक्रमण केली, लोकांना बाटवल. पण सुरुवात ज्या संताने केली तो तर आपला पूर्वज नव्हता, आणि त्याने आक्रमण ही केलं नव्हतं.

आम्ही सांगायच काम केलं, तुम्ही काय ठरवायचं ते बघा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.