एलन मस्कच्या एका ट्विटनंतर मार्केट गाजवणारी शिबा इनू क्रिप्टोकरन्सी काय आहे?

शेअर मार्केट म्हटलं की, कधी कोणाचा भाव वधारेल आणि कधी कोणाचा भाव आपटेल सांगता येत नाही. तसंच काहीचं चित्र क्रिप्टोकरन्सीचं असतं. कधी हाययेस्ट पॉइंटवर जातं तर कधी तितक्याच वेगाने खाली कोसळतं. शिबा इनू या क्रिप्टोकरन्सीसोबतच असच काहीसं झालं.

आता सगळ्यांना बिटकॉइन, इथरियम, लाइटकॉइन अश्या क्रिप्टोकरन्सी माहित असतील. पण शिबा इनू नाव बहुतेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल.

तर मिम म्हणून शिबा इनू किंवा शिबा टोकन ही क्रिप्टोकरन्सी सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षीच म्हणजे २०२० ला ती सुरु झाली. पण ही कोणी सुरु केली याबाबत संभ्रम आहे. पण रयोशी या व्यक्ती किंवा समूहाने ती सुरु केल्याचं बोललं जात.

या कॉईनच्या वेबसाईवर गेलो तर त्याचा उल्लेख ‘एक मिम टोकन’ म्हणून आहे, जे आता ‘एक व्हायब्रंट इकोसिस्टममध्ये बदलले आहे. हे Dogecoin च्या स्पर्धेत सुरू झाले, हे नाणे स्वतःला Doge Killer असे देखील म्हणते. त्याचे सिम्बॉल सुद्धा डॉजकॉइन प्रमाणेच जपानी शिकारी कुत्रा शिबा इनूवर आधारित आहे.

आता ही शिबा इनु क्रिप्टोकरन्सी चर्चेत आली ती त्याच्या उच्चांकीमुळे. गेल्या आठवड्यात शिबा इनुने विक्रमी उच्चांक गाठला. ज्यांनंतर ती ११ वी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बनली. एका  अहवालानुसार रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत या नाण्यामध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

मात्र, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी ट्विट करून या क्रिप्टोकरन्सीचा वेग पार खाली आला. आता यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या या उच्चांकामागेही त्यांचाच हात होता.

कारण एलन मस्कने गेल्या आठवड्यात शिबा इनूच्या आकारात एक इमोजी ट्विट केला होता आणि त्याच्या हातात रॉकेट इमोजी दिसत होता. क्रिप्टो मार्केटमध्ये रॉकेट म्हणजे ‘टू द मून’ फ्रेज म्हणजे किमती वाढीवरून घेतल्या जातात. या ट्विटनंतर शिबा इनूच्या किमती वाढू लागल्या, ज्या रविवारी पहिल्यांदाच ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्या.

कालच्या वाढीनंतर त्याची मार्केट कॅप सुमारे २१ बिलियन डॉलर झाली आहे. त्याच वेळी, ज्या कॉईनमध्ये ते लाँच केले गेले होते, त्या Dogecoin चा  एकूण मार्केट कॅप सुमारे ३४ बिलियन डॉलरच्या आसपास आहे. एका वर्षात ते ४.५ कोटी टक्के म्हणजेच ४.५ लाख पटीने वाढले आहे.

पण यानंतर त्यांच्याच एका ट्विटमुळे या क्रिप्टोकरन्सी पुन्हा खाली आल्या.

वास्तविक, या ट्विटवर एका वापरकर्त्याने एलनला विचारले कि, त्यांच्याकडे किती शिबा इनूची कॉईन आहेत. ज्यावर त्याने उत्तर दिले, ‘एकही नाही’

या ट्विट नंतर शीबा इनू हाय रेकॉर्डपासून डायरेक्ट खाली आला. मस्कने त्याच ट्विटच्या फॉलो-अप ट्विटमध्ये स्पष्ट केले की, त्यांनी ‘बिटकॉइन, इथरियम आणि डॉगेकॉइनमध्ये गुंतवणूक केली आहे.

CoinGecko.com च्या साइटवर, या शिबा इनुच्या क्रिप्टोकरन्सी किंमत ८.६% च्या घसरणीसोबत ०.००००४४३२ च्या स्तरावर होती.

आता एलन मस्कच्या सर्वात श्रीमंत माणूस म्हंटल्यावर पैशांच्या बाबतीत लोक तर त्यालाच फॉलो करणार ना. याचाचं परिणाम या क्रिप्टोकरन्सीवर झाला.

पण हा प्रभाव फार काळ टिकला नाही. शिबा इनुने पुन्हा उसळी घेतली. एका दिवसात ६०% इतकी रेकॉर्डब्रेक कामगिरी शिबा इनु करत आहे. आणि त्याचा वेग आजही तसाच कायम आहे.

हे हि वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.