पाकिस्तानमधील शीख समुदाय पेशावरमधून भारतात स्थलांतर का करतोय..? 

हिंदू आणि शीख हा पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाज. परंतु पेशावर आणि शीख समाज हे नातं फार ऐतिहासिक आहे. गेल्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानमधील पेशावर आणि पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात शीख समुदायाचा अढळ आहे. शीख समाजाच्या पेशावरमधील वास्तव्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. गेल्या जवळपास २५० वर्षांपासून येथील शीख समाज मुस्लिमांबरोबर गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहे. असं असतानाही गेल्या काही दिवसात पेशावरमधील जवळपास ६० टक्के शीख समाजाने भारतात अथवा  पाकिस्तानमधील इतर शहरांमध्ये स्थलांतर केलंय. याचं मुख्य कारण असं की पेशवावरमध्ये शीख समाजातील लोकांवर हल्ल्याच्या घटना गेल्या काही दिवसात समोर आल्यात.
धार्मिक तणावाच्या स्थितीत पेशावरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करणाऱ्या चरणजीत सिंह नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आलीये. त्यामुळे संपूर्ण शीख सामाजातच भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.चरणजीत सिंह हे शांततेसाठी लढणारे  मानवी हक्क कार्यकर्ते आणि तालिबानचे कठोर टीकाकार होते. गेल्या महिन्यात एक अज्ञात इसम त्यांच्या किराणा दुकानात मिरची पावडर खरेदी करण्यासाठी आला आणि जसे ते त्याला सामान देण्यासाठी मागे वळले तसं या इसमाने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.
charanjeet singh
मानवाधिकार कार्यकर्ते चरणजीत सिंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ४ वर्षातली ही अशा प्रकारची १० वी घटना आहे. या आधी शीख समाजातील ९ प्रभावशाली नेत्यांना अशाच प्रकारे संपवण्यात आलं आहे. पाकिस्तानातील सर्वात सुरक्षित अल्पसंख्याक समाज म्हणून समजल्या जाणारा शीख समाज हा सध्या इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळेच पेशवरमध्ये गेल्या ७३ वर्षांपासून बंद असलेला  गुरुद्वारा गेल्या वर्षी उघडण्यात आला आहे. या गुरुद्वाऱ्याभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२०१६ सालच्या एका घटनेत ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाच्या सोरण सिंग यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी बलदेव कुमार या आणखी एका अल्पसंख्याक हिंदू समाजातील नेत्याला ताब्यात घेतलं होतं परंतु पुराव्याअभावी या प्रकरणी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. यातील बऱ्याच हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेऊन देखील दहशतीखलील पोलीस त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता दोन अल्पसंख्याक समाजातील वादातून या घटना घडल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, असा तेथिल स्थानिकांचा दावा आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.