इंग्लंडच्या राणीची हत्या करायला एक शीख तरुण तिच्या महालातच घुसलाय

१३ एप्रिल १९१९ रोजी इंग्रजांनी आणलेल्या रौलट या जुलमी कायद्याचा विरोध करण्यासाठी हजारो नागरिक बैसाखीच्या पवित्र दिवशी अमृतसरच्या जालियनवाला बागेत जमले होते. शांततेत आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांवर जनरल डायर यानं गोळ्या झाडण्याचा आदेश दिला आणि  हजारो निष्पाप नागरिकांचा कत्तल झाली. नुसतं वर्णनं ऐकलं तरी अंगावर काटे उभं राहतात.

ज्या जनरल डायर यानं ही घटना घडवली त्याचा तर ‘मॉर्निंग पोस्ट’ या ब्रिटनमधल्या न्यूजपेपरनं इंग्लिश लोकांकडून देणगी जमा करून सन्मान केला होता.

पुढे ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करून उधमसिंग यानं या घटनेचा बदला घेतला. या कृत्याबद्दल ब्रिटनचे राजकारणी अजूनही माफी मागण्यास तयार नाहीत.

मागे भारताच्या दौऱ्यावर आल्यावर तेव्हाच्या इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी तर नुसतं जालियनवाला घटनेबद्दल वाईट वाटतं एवढेच शब्द काढले होते.

मात्र भारतानं मात्र माफीच्या भानगडीत न पडता कृतीतून इंग्लंडला जवाब दिलाय. आज बऱ्याच गोष्टींमध्ये इंग्लंडला भारताच्या दारात यायला लागतंय. मात्र अजूनही काही जण इतिहासातून बाहेर पडायला तयार नाहीयेत.जसवंत सिंह खैल हा असाच एक तरुण. 

ख्रिसमसच्या दिवशी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांची हत्या करण्यासाठी या शीख तरुणानं थेट राणीच्या राजवाड्यात प्रवेश केला.

१९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी या तरुणाला राणीला मारायचे होते. पोलिसांनी या आरोपीला शस्त्रासह अटक केली. ब्रिटीश मीडियानुसार त्याचे वय अवघे १९ वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय. नाताळच्या दिवशी घडलेल्या या घटनेची माहिती आता समोर आली आहे.

”मी जे काही केले आणि करणार आहे त्याबद्दल मला माफ करा. मी राजघराण्यातील राणी एलिझाबेथला मारण्याचा प्रयत्न करणाराय.  १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडात मारल्या गेलेल्यांचा हा बदला आहे. त्यांच्या जातीमुळे ज्यांना मारले किंवा अपमानित केले त्यांचाही हा बदला आहे. मी एक भारतीय शीख आहे,माझे नाव जसवंत सिंग चैल होते, आता माझे नाव डार्थ जोन्स आहे” असं यानं ख्रिसमसच्या दिवशी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

आता तुमच्यापैकी काहीजण याला राष्ट्रभक्त म्हणत असाल तर थोडं थांबा. हा भाऊ जे व्हिडिओमध्ये डार्थ जोन्स म्हणतोय ते एक स्टार वॉर मधलं पात्र आहे. या नमुन्यानं अवतार ही त्या पत्रासारखाच केला होता.

 मिशनच्या आधी मित्रांना पाठवलेल्या मेसेजमध्ये मी ज्यांच्यासोबत चुकीचं वागलो त्या सर्वांची मी माफी मागतो. जर तुम्हाला हा मेसेज मिळाला असेल तर माझा मृत्यू आता जवळ आहे असं समजा आणि हा व्हिडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर कराअसं म्हटलंय. 

त्यात हा भाऊ महालात धनुष्य घेऊनपण घुसला होता. ह्या भाऊंचे हे अतरंगी चाळे  पाहून पोलिसांनी पण त्याला मेंटल हेल्थ एक्टनुसार अटक केलंय. त्यामुळं नुसतं भूतकाळात रमणाऱ्याला जसं खुळं म्हणतात तशी याची गत झालेय. बाकी असे चाळे ना करता शशी थरूरांनी ऑक्सफोर्डमधल्या एका भाषणात  इंग्लंडची कशी शेलक्या शब्दात  घेतली होती हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळं असं काय जमतंय का ते बघा.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.