शिल्पा ताई म्हणत असतील, सुटले रे बाबा एकदाची !

काल भारतात सगळ्यात गाजलेल्या पप्प्यांमधलं एक प्रकरण निकालात निघालं. पण काही वाचण्याआधी दोन फोटो बघा आणि मगच वाचा. 

885217 shilpa0

आता हे काय आहे असं म्हणत असाल तर यातला उजव्या बाजूचा फोटो आहे ना त्या एक पप्पीमुळं शिल्पा शेट्टीवर १५ वर्ष कोर्टकेस सुरू होती. काल ही केस निकाली निघाली आणि शिल्पा शेट्टी ‘अश्लीलता’ पसरवते या आरोपातून मुक्त झाली.

पण डाव्या बाजूचा फोटो आहे ना, ती घटना मात्र अश्लीलता पसरवत नाही, बरं का ! जाऊ द्या….आपण १५ वर्षांपूर्वीच्या त्या रिचर्ड गेयर आणि शिल्पा शेट्टीच्या किश्श्याकडे फोकस करू. 

तर १५ एप्रिल २००७ च्या दिवशीची ही गोष्ट. राजस्थानमध्ये एका ठिकाणी एड्स जनजागृतीवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड स्टार रिचर्ड गेयर यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम सुरू होता आणि शिल्पाच्या हातात माईक होता. या कार्यक्रमादरम्यान रिचर्ड शिल्पाची परवानगी न घेता स्टेजवर सारखं सारखंच शिल्पाच्या हाताची पप्पी घेत होता. मध्येच त्याला काय हुक्की आली काय माहित, त्याने डायरेक्टच तिला मिठी मारली आणि तिच्या गालाची पप्पी घेतली. 

त्याकाळात सोशल मीडिया एवढं फोफावल नव्हतं. पण हा व्हिडिओ न्यूज चॅनेलवर वारंवार दाखवला गेला. यानंतर देशभरात शिल्पा शेट्टीवर अनेक तक्रारी दाखल झाल्या. अनेक आंदोलने झाली.

वाराणसी, भोपाळ, कानपूर, दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये लोकांनी शिल्पाविरोधात निदर्शन केली. रिचर्ड गेयरने तिची पप्पी घेतली तेव्हा तिने विरोध का केला नाही, अशी शिल्पा शेट्टीविरुद्धची तक्रार होती.

२००७ च्या या घटनेनंतर, राजस्थानच्या मुंडावर जिल्ह्यातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तिच्या विरोधात एक एफआयआर नोंदवण्यात आली. या एफआयआर मध्ये शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेयर या दोघांवर एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. या एफआयआरला न्यायदंडाधिकार्‍यांकडून परवानगी मिळाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल.

एफआयआरमध्ये शिल्पा आणि रिचर्डवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम २९१, २९३, २९४ (अश्लीलता) तसेच माहिती तंत्रज्ञान आणि महिलांचे असभ्य प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने हे प्रकरण मुंबई न्यायालयात वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ज्याला सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये परवानगी दिली. यानंतर मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

शिल्पा शेट्टीच्या वतीने कोर्टात एक अर्ज दाखल करण्यात आला होता. 

कलम २३९ अंतर्गत शिल्पाचा अर्ज कोर्टात स्वीकारण्यात आला. शिल्पाच्या अर्जात म्हंटल होत की,  तिच्यावरचा आरोप एवढाच आहे की, तिने रिचर्ड गेयरने केलेल्या चुंबनाला आक्षेप घेतला नाही, त्या आधारे ती गुन्हेगार असल्याचे सिद्ध करता येणार नाही.

२४ जानेवारी रोजी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीच्या खटल्याची सुनावणी घेतली. या सुनावणीत कोर्ट म्हंटल की, आरोपी शिल्पा शेट्टी ही पहिला आरोपी रिचर्ड गेयरच्या कथित कृत्याची बळी असल्याचे दिसते. दाखल केलेल्या तक्रारीत कथित गुन्ह्यासाठी कोणताही ठोस पुरावा सापडत नाही. त्यामुळे पुराव्याअभावी शिल्पा शेट्टीची निर्दोष मुक्तता करण्यात येते.

आता या गोष्टीचं तात्पर्य काय म्हणाल तर, एका पुरुषाने जबरदस्तीने दिलेल्या चुंबनाचा परिणाम शिल्पा शेट्टीला विनाकारण १५ वर्ष मनस्ताप भोगावा लागला

 हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.