शिवसैनिकांनी पाकिस्तानी खेळाडू समजून भारतीय खेळाडूला दम भरला होता…

मंगळवारी भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली तरी बेल्जियम दिलेल्या लढती बाबत सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तब्बल चार दशकाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण हा सामना पाहत असल्याचे ट्वीट केले होते.

आता सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे ते कास्य पदकासाठी होणाऱ्या मॅच वर. ब्रिटन सारख्या बलाढ्य संघाला मत देत भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत मजल मारली होती.

यामुळे भारतीय हॉकी संघाबद्दल पुन्हा एकदा भरभरून बोलण्यात येत आहे. मात्र भारतीय हॉकी संघात खेळणाऱ्या एका खेळाडूला शिवसैनिकांच्या दमबाजीला समोर जावे लागले होते.   

घटना आहे २०१३ मधील.

 पाकिस्तानी हॉकी संघाचे काही खेळाडू भारतात हॉकी इंडिया लीग खेळण्यासाठी आले होते.

हॉकी इंडिया लीगच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबई मरीन्स संघात पाकिस्तानचे चार खेळाडू सामील झाले होते. दुसरा दिवशी होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबई मरीन्स संघातील सर्व खेळाडू मुंबई हॉकी असोसिएशनच्या मैदानावर सरावासाठी आले होते.

काही शिवसैनिकांना कळाले होते की, पाकिस्तानी हॉकी खेळाडू सरावासाठी हॉकी असोसिएशनच्या मैदानावर येणार आहेत. साधारण १५० शिवसैनिक हॉकी मैदानाजवळ आंदोलन करत होते. तसेच यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणा देत होते त्यामुळे प्रशासन गोंधळून गेले होते.

शिवसैनिकांनी त्या खेळाडूंना सरावापासून तर रोखलेच. आणि हॉकी मैदानातील खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊ देण्याची मागणी करत होते. महमूद रशीद, फरीद अहमद, मुहम्मद तोषिक आणि इमरान बट हे पाकिस्तानी खेळाडू मुंबई मरीन्स संघाकडून खेळण्यासाठी मुंबईत आले होते.

 काही दिवसापूर्वी एलओसीवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात २ भारतीय जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानचे लष्कर हे आपल्या जवानांवर गोळीबार करत असतांना पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळू देणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती.

आंदोलनक करणारे काही शिवसैनिक शेवटी मैदानारील खेळाडूंच्या ड्रेसिंग मध्ये घुसले होते. शिवसैनिकांनी ड्रेसिंग रूम मधील खेळाडूंना तुम्ही पाकिस्तानी आहात का असे विचारायला सुरुवात केली होती. एका खेळाडूची थोडी दाढी वाढली होती. त्याच्या जवळ जात शिवसैनिकांनी तू पाकिस्तानी आहेस का? असा प्रश्न प्रश्न विचारला. त्यावेळी एका भारतीय हॉकी खेळाडूने शिवसैनिकांना उत्तर दिले कि, जर तुम्हाला आपल्या भारताचे खेळाडूं ओळखायला येत नसेल तर तुम्हीला पाकिस्तानी खेळाडू कसे ओळखणार.

शिवसैनिक हे उत्तर दिले ते होते ते, भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने. यानंतर मैदानाच्या ड्रेसिंग रूम मध्ये घुसलेले शिवसैनिक बाहेर पडले. मात्र त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. अशा प्रकारे पी. आर. श्रीजेश याला शिवसैनिकाच्या दमबाजीला समोर जावे लागेल होते.

महत्वाचे म्हणजे बाहेर सुरु झालेला गोंधळ पाहून पाकिस्तानी खेळाडूंना अगोदरच मैदानाच्या मागील गेट मधून बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानी खेळाडूंची सुटका झाली होती. 

यानंतर संघाची मालकी असणाऱ्या डाबर ग्रुपकडून स्पष्टीकर देण्यात आले होती की, सर्व परवानग्या घेऊनच पाकिस्तानी खेळाडूंना हॉकी इंडिया लीग मध्ये खेळायला बोलाविले आहे.मुंबईत होणारा सामना रद्द करून दिल्ली येथे घेण्यात येत असल्याचे हॉकी असोसिएशनच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले होते.

आजही पी. आर. श्रीजेश भारतीय हॉकी संघात गोलकीपर म्हणून उत्तम काम करत आहे. त्याच्यामुळेच भारतीय संघ ऑलिम्पिक मध्ये उपांत्य फेरी पर्यंत मजल मारू शकला होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.