उद्धव ठाकरे यांनी एकदा मनमोहनसिंग यांना हिजडा म्हणत टीका केली होती..

“किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात काय गदारोळ चालू आहे हे आपण पाहत आहोत. 

नारायण राणेंच्या या आणि आणखीही काही वादग्रस्त वक्त्यव्यानंतर शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. नाशिक, महाड, पुणे या ठिकाणी राणेंच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यानंतर राणेंना अटक ही झाली होती. मिडियाने देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. या निमित्ताने अनेक जन चर्चा करत आहेत कि, राजकारणातला सुसंकृतपणा हरवत चालला आहे का?

उठसुठ आजकाल हे राजकारणी एकमेकांना खालच्या थराला जाऊन टीका करत आहेत. मारण्याची भाषा करत आहेत, बेताल वक्तव्य करतायेत. बरं हे काय आजकालचं नाहीये…

आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत केलेले हे वक्तव्य निश्चितच गंभीर आहे. कारण राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून जरूर एकमेकांशी स्पर्धा करा मात्र टीका करतांना, आपण ज्यांच्यावर टीका करतोय, ते कोण आहेत? त्यांचं पद काय इत्यादी गोष्टी या राजकीय नेत्यांकडून नेहेमीच विसरायला होतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिक राडा घालत आहेत, जिकडे तिकडे सोशल मिडिया वर देखील याचा निषेध होतोय, व्हायलाच पाहिजे…पण आपण हे विसरतोय का कि,

एकदा उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी पंतप्रधान यांना ‘हिजडा’ हा शब्द वापरून टीका केली होती.

२००९ मध्ये पुण्यातल्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना ‘हिजडा’ म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांशी बोलतांना, काही त्यांना माध्यमांनी विचारले की, त्यांना सध्याच्या सत्ताधारी पक्ष नेतृत्वाबद्दल काय वाटते? यावर त्यांनी उत्तर दिले कि, पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे एक  निष्प्रभ नेते आणि हिजडा (नपुंसक) आहेत.

संजय राऊत यांनी मात्र उद्धव यांचा बचाव करत म्हटले होते कि, “भाषणात काहीही आक्षेपार्ह नाही. सेनेने अनेकदा उघड उघड या वाक्याचा वापर केला आहे”

त्याचदरम्यान तत्कालीन भाजप प्रदेश युनिटचे प्रमुख नितीन गडकरी यांनीही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती, त्यांनी म्हणलं होतं कि, सत्ताधारी पक्ष नपुंसक लोकांनी भरलेला आहे. 

त्यादरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या भाषणांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची तपासणी केली होती. आणि लोकप्रतिनिधी कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत काही दोष आढळल्यास कारवाई करण्याचा प्रयत्न देखील झाला होता मात्र तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते कि, याबाबतीत आतापर्यंत कोणतीही तक्रार मिळाली नाही त्यामुळे कोणतीही कारवाई झाली नव्हती.

या वक्तव्यामुळे प्रदेश काँग्रेसकडून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी जुन्या एका घटनेचा संदर्भ देत प्रतिउत्तर दिले होते कि, “काँग्रेसने मायकल जॅक्सनला हिजडा म्हटल्यानंतर ज्या पक्षाच्या शब्दांचा विचार केला त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.”

हिजडा हा शब्द अपमानजनक नाहीये पण टीका करण्यासाठी असे शब्द उद्देशपूर्वक वापरणे हे निश्चितच चुकीचे आहे.

त्यानंतर एकदा बाळासाहेबांनी देखील मनमोहन सिंग यांना नपुंसक म्हणलं होतं.

२०१२ मध्ये, टाइम मासिकाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना “अंडर अचीव्हर” असे लेबल लावल्यानंतर, तेंव्हादेखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग ‘राजकीयदृष्ट्या नपुंसक’ म्हटले होते. पण आता, राजकीयदृष्ट्या नपुंसक शिवसेनेसाठी नायक बनला आहे.

मनमोहन सिंग यांना हिजडा म्हटल्यानंतर शिवसेना आज मात्र त्यांचे कौतुक करत आहे त्याचं कारण म्हणजे,

२०१६ मध्ये नोटबंदी झाली. नोटाबंदीबाबत आधी मवाळ भूमिका असलेली शिवसेना नंतर विरोधकांच्या आवाजात आवाज मिसळू लागली होती. सेनेला तेंव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाची आठवण होत होती.  “मनमोहन सिंग हे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे”. असं म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी या आधी मनमोहन सिंग यांच्यावर अनेक प्रकारे टीका केली होती. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.