कम्युनिस्ट शिखरावर असताना जन्मलेली शिवसेना मुंबईत कम्युनिस्टांचा बाजार उठवूनच मोठी झाली
घटना १९६९ची आहे. ‘टी. मानेकलाल आणि कंपनीत’ कामगारांनी संप पुकारला होता. संप कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली झाला होता. आपण सगळे नाही रे वर्गातील आहोत आणि आहे रे वर्गाशी संघर्षासाठी सर्व कामगारांनी एकत्रित आले पाहिजे कम्युनिस्टांच्या तत्वखाली कंपनीतील कामगार एकत्र आले होते. ९०दिवस झाले तरी संप मिटता नव्हता. गुंडांकरवी दिलेल्या धमक्यांनाही कामगार भिख घालत नव्हते.
यावर कंपनीच्या मालकानं एक इंटरेस्टिंग गेम खेळाला.
त्याने कंपनीमध्ये सत्यनारायणची पूजा आयोजित केली आणि सभेला बाळासाहेब ठाकरे यांना आमंत्रित केलं. बाळासाहेबांचं काम कामगारांना बऱ्यापैकी माहित होतं. त्यामुळे संपावर असणाऱ्या कामगारांना त्यांच्याबद्दल कुतुहूल होतं. त्यात कंपनीच्या एकूण कामगारांपैकी जवळपास ६०% कामगार मराठी होते. ते कामगार बाळासाहेबांच्या भोवती जमा होऊ लागले. लागलीच बाळासाहेब भाषणासाठी उभा राहिले आणि त्यांनी संपकरी कामगारांना हाक दिली
‘ हे लाल बावटे तुमचं नुकसान करत आहेत. संपामुळे काहीही फायदा होण्याची शक्यता नाही. तेव्हा निदान मराठी कामगारांनी तरी एकत्रित येऊन कामावर जायला हवं.’
बाळासाहेबांनी त्याच्या ट्रेडमार्क ओघवत्या शैलीत केलेल्या भाषणाचा व्हायचा तो परिणाम झाला. मराठी कामगार गटा-गटाने कामावर रुजू होऊ लागले. संप पूर्णपणे मोडून पडला. टी. मानेकलाल कंपनीवर भारतीय कामगार सेनेचा भगवा फडकला आणि कारखाना सुरु झाला.
पुढे लार्सन अँड टुब्रो आणि पार्ले बॉटलिंग या दोन बड्या कंपन्यांमधील कम्युनिस्टांच्या वर्चस्वाला बाळासाहेबांनी असाच शह दिला होता.
पुढे सेनेच्या वाढीबरोबर कधी ज्यांच्या एक हाकेवर मुंबई ठप्प व्हायची ते डावे पक्ष मुंबईतून कसे संपत गेले हे आपण जाणतोच. विषय चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत सेनेला दिलेला पाठिंबा. कधीकाळी कट्ट्रर शत्रू असणारे हे दोन पक्ष एकत्र आल्याने आश्यर्य व्यक्त केलं जात आहे.
या दोन प्रमुख पक्षांच्या शत्रुत्वाचं मूळ होतं कामगारांचं नेतृत्व करण्यावरून.
स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळे ज्यांची कामगारांवर पकड त्या पक्षाची मुंबईवर पकड हे इक्वेशन फिक्स होतं. त्यातच मुंबईला कामगार चळवळीची मोठी परंपरा होती. कामगार चळवळीचे पितामह म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी १९ व्या शतकातच कामगार चळवळीची मुहूर्तमुढ मुंबईत रोवली होती.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्टांचं या कामगार चळवळीवर एकहाती नेतृत्व होतं.
मात्र कम्युनिस्टांच्या चळवळींमुळे मुंबईतल्या भांडवलदारांचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यामुळेच सुरवातीला काँग्रेस आणि नंतर शिवसेनेला भांडवलदारांनी कामगार चळवळी फोडण्यासाठी वापरल्याचा आरोप होत होता.
त्यात १९६६ ला सेनेची स्थापना देखील डावे मुंबईवरील त्यांच्या वर्चस्वाच्या शिखरावर असताना झाली होती. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत कॉम्रेड डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस हे दोघे मुंबईतुन खासदार म्हणून निवडून गेले होते यावरून डाव्यांच्या ताकदीचा अनुभव येतो.
त्यामुळे सेनेची वाढ होता शिवसेनेला डाव्यांच्या ताकदिशी पंगा घ्यावा लागणार होता एवढा नक्की होतं. आधी कामगारांच्या युनियनवरून एकमेकांच्या पुढे उभे राहणाऱ्या या संघटना राजकीयदृष्ट्या देखील समोर समोर आल्या आणि याला हिंसक स्वरूप मिळालं ते ५ जून १९७० ला.
‘कॉ. कृष्णा देसाईचे खरे खुनी शिवसेना व वसंतराव नाईक’, अशी ठळक हेडलाईन आचार्य अत्र्यांच्या ‘दैनिक मराठा’मध्ये पहिल्या पानावर ६ जून १९७० ला प्रसिद्ध झाली होती.
कृष्णा देसाई हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परेलमधून आमदार होते आणि त्यांच्या हत्येचा आरोप शिवसेनेवर होत होता. कॉ. कृष्णा देसाई गिरणी कामगार युनियनचे उपाध्यक्ष देखील होते.
मात्र सेनेनं हे आरोप फेटाळले मात्र त्यांनी यामुळे बाळासाहेबांची डावांविरोधात बोलण्याची धार कमी झाली नाही. त्याचबरोबर पोटनिवडणुकीसाठी शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांच्या सभांचा झंझावात सुरू झाला. कम्युनिस्टावर टिंगल-टवाळी, शिवराळ भाषेत टीका टिपणी होऊ लागली. चीन-रशियाची, ‘लाल माकडे, देशद्रोही’ अशी टीका बाळासाहेबांच्या भाषणातून होऊ लागली.
कृष्णा देसाई यांच्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेचा विजय झाला आणि वामनराव महाडिक सेनेचा पहिला आमदार म्हणून निवडून आले.
मात्र यानंतर कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अजूनच चिघळला. कामगारांमध्ये सेनेने आता मराठीचा मुद्दा घुसवला होता. मुंबईत मराठी कामगाराचा टक्का कमी आहे, तो वाढला पाहिजे असं ठाकरे सुरवातीपासूनच बोलायचे. मराठी कामगारांचा टक्का वाढला पाहिजे अशी मागणी बाळासाहेब ठाकरे अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून करत होते.
याचकाळात सेनेला तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव यांच्या पाठिंब्यामुळे सेनेला वसंतसेना म्हणून देखील हिणवलं जाऊ लागलं. वसंतराव नाईकांनी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा उपयोग करून घेतला होता.
जनता पक्षाच्या काळामध्येही मुंबईतल्या डाव्या आणि समाजवादी कामगार संघटना प्रबळ होत्या.
80 च्या दशकाच्या आसपासच या राजकीय पक्षांशी संबंधित संघटनांसोबत काही कामगार नेत्यांचा व्यक्तिगत प्रभावही वाढला होता. दत्ता सामंत हे असेच एक नेते म्हणू समोर आले. दत्त सामंत हे जरी कामगारांचे नेते असले तरी ते कम्युनिस्ट पक्षात नव्हते.
मात्र डाव्यांच्या आणि समाजवादी पक्षांच्या अनेक संघटनांचे नेतृत्व दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि आता कामगारांना आपल्याकडे ओढण्यासाठी दत्ता सामंत यांच्या विरोधात शिवसेना असा संघर्ष चालू झाला. त्याचवेळी कॉ. श्रीपाद अमृत डांगेंच्या नेतृत्वातील डाव्यांच्या संघटना प्रभावहीन होत चालल्या होत्या, जॉर्ज फर्नांडीस दिल्लीच्या राजकारण गुंतले होते. शिवसेनेची कामगार सेना मात्र पाय पसरू लागली होती. मात्र त्यातही कुठलीही पार्श्वभूमी नसलेले दत्ता सामंत कामगार चळवळीत उठून दिसत होते.
१९८२च्या कामगारांच्या सर्वात मोठया संपही दत्त सामंत यांच्या नेतृत्वाखालीच झाला.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे आणीबाणीनंतर सगळे विरोधी पक्ष इंदिरा गांधींच्या विरोधात जनता पार्टीच्या बॅनरखाली एकत्र आले होते. त्यात भारतीय जनसंघ देखील होता. मात्र सेनाला या मेळात घेतलं गेलं नाही.
पुढे १९८४ला भारतीय जनता पार्टी शिवसेनेशी युती करण्यास उत्सुक होती मात्र मृणाल गोरटे आणि इतर समाजवाद्यांच्या त्याला विरोध होता. मृणाल गोरे, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर यांना कधीकाळी बाळसाहेब ठाकरे जाहीर सभेतून भटक भवान्या म्हटले होते त्यामुळे समाजवाद्यांचा वैचारिक फरकाबरोबर या कारणांमुळे देखील विरोध होता.
त्यातच १९८५ ला भजसबोट युती करून शिवसेना सत्तेत बसली आणि सेनेनं डाव्यांना कधीच मागे टाकल्यावर शिक्कामोर्तब झालं. पुढे आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारत सेना आता काँग्रेसच्या विरोधात झाली होती.
त्यात ९०च्या दशक उजडेपर्यंत दत्ता सामंत यांच्या नेतृत्वखालील१० वर्ष चाललेल्या संपांनंतर गिरणी कामगार पूर्णपणे देशोधडीला लागला होता.
१९९१ च्या जागतिक आणि आर्थिक उदारीकरणाच्या निर्णय यानंतर मुंबईतून कामगार म्हणून ओळख सांगणारा ब्लू कॉलर वर्कर दिसेनासा झाला. औद्योगिक राजधानी आता आर्थिक राजधानी झाली होती.
मुंबईच्या बाहेर नवीन मुंबईत आणि ठाणे जिल्ह्यत जे उद्योगधंदे गेले तिथं गणेश नाईक, साबीर शेख आणि इतर सेनेच्या नेत्यांनी युनियन ताब्यात घेतल्या होत्या. आनंद अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली बँक कामगार एकत्र आले. दत्त प्रधान यांनी बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून बेस्ट कामगार एकत्रित केला. थोडक्यता माताही आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर सेनेनं जे थोडे-थोडके स्वतःला कामगार म्हणून घेणारे होते त्यांना आपल्याकडे वळवलं.
हे ही वाच भिडू :
- कधीकाळी पश्चिम बंगालचे डॉन असणारे डावे आज १ जागेवरच आघाडीवर आहेत..
- नाव महाप्रबोधनच का? नेतृत्व सुषमा अंधारेंकडेच का?