दोघांची “संयमी” म्हणून इमेज सेट झालेय, याला उतारा म्हणून तेजस ठाकरे मैदानात उतरतील?
जास्त दूरची नाही, मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातलीच गोष्ट. 7 ऑगस्ट 2021 ला सामना या वर्तमानपत्रात तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाहीरात देण्यात आली होती. त्या दिवशी सर्व माध्यमांमधून तेजस ठाकरे या नावाची चर्चा झाली. कारण देखील तसच होतं..
ही फक्त जाहीरात असती तर ठिक होतं, पण ही जाहिरात देणारा माणूस देखील खास होता. जाहिरात देणाऱ्या माणसांच नाव होतं मिलिंद नार्वेकर…
उद्धव ठाकरेंचे एकदम खास, उद्धव यांच्या सहमतीशिवाय नार्वेकरांनी ही जाहिरात दिली नसती. अशा प्रकारची जाहिरात थेट वर्तमानपत्रात दिल्यामुळे चर्चा सुरू झाली ती तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाची. पण तेव्हा फक्त ही चर्चाच होती.
तात्काळ या चर्चांना ब्रेक देखील लावण्यात आला. त्याचं कारण होतं शिवसेनेला घराणेशाहीचा आरोप अजून गडद करायचा नव्हता. अस म्हणलं जातं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री. वडिल आणि मुलाकडे अगोदरच दोन मंत्रीपदं. त्यातही कुठेतरी तेजस सक्रिय होत चालले आहेत हा मॅसेज गेला तर शिवसेने अंतर्गतच विरोध वाढेल..
आत्ता मात्र पुलाखालून बरच पाणी गेलं. शिवसेनेत अंतर्गत विरोध होईल हे कारण विरोध-बंड असा प्रवास करण मुख्यमंत्रीपदापर्यन्त गेलं आहे.
त्यामुळेच प्रश्न येतो आत्ता तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात उतरतील का?
तेजस ठाकरे आत्ता राजकारणाच्या आखाड्यात उतरू शकतात याची काही प्रमुख कारणं आहेत तीच कारण आपण पाहणार आहोत.
- पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच सहानभुतीचं वारं..
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका मांडली. लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानभुतीचं वातावरण निर्माण झालं. पण शिवसैनिक म्हणून असणाऱ्या व मुळं शिवसेनेच्या मतदारांचा पिंडच सहानभुतीचा नाही. भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा भुजबळांना चार वर्ष संरक्षण घेवून रहावं लागलं होतं. त्यांच्या घरावर हल्ले करण्यात आले होते तसेच मुंबईच्या निवडणूकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर मुंबईतून उभा राहण्याचं धाडस भुजबळांनी दाखवलं नाही.
मुळचा शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक कृतीने तयार झालेला आहे. अशा वेळी तात्काळ प्रतिक्रिया म्हणून तो सहानभुती दाखवू शकतो पण कायमचा मतदार म्हणून शिवसेनेकडून आक्रमक राजकारणाचीच तो अपेक्षा करतो. अशा वेळी उद्धव ठाकरेंकडे सहानभुती, अन्याय झालेले नेते म्हणून पाहणं व त्यांच्यामागे उभा राहणं हे लॉन्गटर्म राजकारण ठरणार नाही हे स्पष्टचं होतं..
2) आदित्य ठाकरेंची देखील झालेली मवाळ राजकारण्याची इमेज
उद्धव ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंची इमेज देखील मवाळ राजकारणी म्हणूनच झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये रोजचा सामना रंगवता येईल, खटके उडवता येतील, लोकांमध्ये मिसळता येईल अस खातं न घेता आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्रालयाला पसंती दिली.
पर्यावरण खात्यासोबत लोकांची दैनंदिन कामे यावीत हा प्रश्नच उद्धभव्त नव्हता. दूसरीकडे या खात्यामुळे आदित्य ठाकरे आंतरराष्ट्रीय बैठका, परिसंवाद अशा गोष्टीमध्ये रमत गेले. आदित्य ठाकरेंची युथ ची नस पकडून एक हूशार, अभ्यासू राजकारणी म्हणून प्रतिमा तयार करण्याची तयारी जरी करण्यात आली असली तरी मुळच्या शिवसैनिकांची नस पकडून ठेवणारी ती इमेज बिल्डिंग ठरली नाही. पर्यायाने आदित्य ठाकरेंची इमेज देखील मवाळच झाली.
3) बाळासाहेब ठाकरे, भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना पर्याय..
शिवसेनेला फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक नेतृत्त्वालाच पर्याय शोधायचा नाही तर बाळासाहेब, भुजबळ, राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्व नेत्यांच्या वृत्तीचा आणि कृतीचा माणूस तयार करावा लागणार आहे. कारण हीच शिवसेनेची खरी ओळख होती. बाळासाहेबांच्या हयातीत भुजबळ, राणे, राज ठाकरे बाहेर पडल्याने पक्षाला आक्रमक भाषेची गरज पडली नाही पण बाळासाहेबांच्या नंतर मात्र पक्षात एकनाथ शिंदे यांच्यासारखे निवडक लोक होते जे प्रत्यक्ष कृतीतून आक्रमक नेतृत्त्व रेटत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गुलाबराव पाटील यांच्यासारखे लोक आज पक्षाच्या बाहेर गेले आहे.
संजय राऊत यांच्यासारखी भाषाशैली बऱ्याचदा पक्षाला अडचणीतच आणणारी ठरत आहे. शिवाय संजय राऊत हे फक्त भाषाशैलीसाठीच मर्यादित असलेले दिसून येतात. आज उद्धव यांच्यासोबत अनिल परब, सुभाष देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर असे निवडक लोक आहेत यातून कोणतच नेतृत्त्व आक्रमक भाषा आणि आक्रमक कृती करणारं ठरू शकणार नाही अशा वेळी पर्याय उरतो तो फक्त तेजस ठाकरे यांचाच..
4) शेवटचं कारण म्हणजे, घरचा माणूस…
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन व्यक्ती सोडले तर सेनेतून आक्रमक नेतृत्व तयार झालं नाही. पैकी राज ठाकरेंना पक्ष सोडावा लागला. त्यानंतर शिवसेनेत जे आक्रमक नेते होते ते सर्व नेते ठाकरे कुटूंबाच्या बाहेरचे लोक होते. बाहेरील व्यक्तीला मोठ्ठं करण्याचा फटका ठाकरे कुटूंबाला सध्या बसलेला दिसूनच येतो अशा वेळी घरचा माणूसच म्हणून तेजस ठाकरे आक्रमकपणे राजकारणात उतरतील यात शंका नाही..
थोडक्यात काय तर तेजस ठाकरे हेच एकमेव पर्याय सध्यस्थितीत तर शिवसेनेकडे दिसत आहे. येत्या महानगपालिका निवडणूकीमध्ये तेजस ठाकरेंना प्रचारासाठी उद्धव ठाकरेंकडून उभा करण्यात आल्यास आश्चर्य वाटू नये इतकच..
हे ही वाच भिडू