मुंबईतून शिवसेना कधीच संपत नाही त्यामागं आहे मुंबईतली शिवसेनेची शाखा सिस्टिम

एक महिला होती तिच्या खोलीवर युपीच्या भाडेकरू भैय्याने कब्जा केला. भैय्या तथाकथित डॉन होता. महिलेला कुठं जावं कळत नव्हतं. ही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली. सिवील केस असल्याने पोलीसांनी हात वर केले. कायद्याची बंधने होती. मग ही महिला दूसऱ्या ठिकाणी गेली. दूसऱ्या दिवशी काही तरुण आले आणि त्या भैय्याचं सामान रस्त्यावर फेकून खोली मोकळी करून दिली.

असाच एक दूसरा किस्सा. एक तरुण होता. त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली. काय करावं आणि काय नाही. चाळीतले लोकं गोळा झाले. जो तो प्रयत्न करू लागला पण पोराकडे बापाला हॉस्पीटलमध्ये घेवून जाण्याचे देखील पैसे नव्हते. अशाच एक ॲम्ब्युलन्स आली. बापाला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पीटलला नेण्यात आलं. उपचारात मदत करण्यात आली. इथही काही तरूण मदतीला होते..

गेल्या तीन पिढ्यांचे असे हजारों किस्से, हजारों कहाण्या आणि एक शाखा..

शाखा शिवसेनेच्या.. ज्यामुळे मुंबईतून शिवसेना संपत नाही, ठाकरे संपत नाहीत.. आणि मराठी माणूस संपत नाही..या शाखांच समाजकारण कस वर्कआऊट झालं आणि आजही संपूर्ण राज्याची सत्ता हाती येवूनही मुंबईच्या शाखांच गणित सोडवणं शिंदे गटाला अडचणीचं का ठरत आहे? अर्थात शाखाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या सर्व बाजू या व्हिडीओतून जाणून घ्या…

Leave A Reply

Your email address will not be published.