अमोल कोल्हे Vs शिवाजीराव आढळराव, सोशल मिडीयावर कोण चाललय पुढे ?

वातावरण तापलय. डोक्यावर उन्हाचं आणि देशात निवडणूकीच. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात  गेली तीन लोकसभा जिंकणारे  शिवसेनेचे विद्यमान खासदार अनुभवी शिवाजीराव आढळराव विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तरुणतुर्क डॉ. अमोल कोल्हे. दोन तुल्यबळ मल्लांची  काट्याची लढत म्हणून या निवडणुकीकडे पूर्ण राज्याच लक्ष लागलंय.

शिवाजीराव यांनी आता पर्यंत तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. या तिन्ही निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या बहुमताने अस्मान दाखवल होतं. त्यांना आव्हान देईल असा नेताचं राष्ट्रवादीला सापडत नव्हता. यामुळेच टीव्हीवर छत्रपती संभाजी महराजांच्या भुमिकेमुळे सुप्रसिद्ध झालेल्या सिनेस्टार अमोल कोल्हे यांना पाचारण करण्यात आलं.

अमोल कोल्हे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून काम केलेल्या कोल्हेनी या निवडणुकीच्या तोंडावर शिवबंधन तोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला याचा शिवसैनिकांना राग आहे.  खर तर इतिहासात डोकावून पाहायचं झालं तर आढळराव पाटील हे सुद्धा एके काळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. मात्र त्यांनी २००४ साली निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळवण्यासाठी शिवसेना प्रवेश केला. यामुळेच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जास्त आक्रमक आहेत.

आता पर्यंत एकतर्फी निवडणूक पाहिलेल्या शिरूर मतदारसंघात एवढी रणधुमाळी पहिल्यांदाच दिसली. अमोल कोल्हेंची जात काढल्यापासून ते बैलगाडा शर्यतीपर्यंतच्या मुद्द्यांनी एकमेकांना ट्रोल करून निवडणुकीची ही लढाई सोशल मिडीयावर देखील जोरदार पणे खेळली जात आहे. चला तर बघू सोशल मिडियाच्या आखाड्यात शिरूरचा कोणता पहिलवान विजयी ठरतोय?

तत्पुर्वी उमेदवारांची बेसिक माहिती. 

शिवाजीराव दत्तात्रय आढळराव पाटील

  • जन्म- ८ मे १९५६
  • शिक्षण- प्रथम वर्ष बीए.
  • टोपणनाव – शिवाजीदादा.
  • व्यवसाय – डायनोलॉग कंपनीचे संस्थापक, शेती, राजकारण.
  • कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.
  • यशस्वी उद्योजक म्हणून आंबेगाव तालुक्यात नाव कमावल्यावर तिथले सुप्रसिध्द नेते दिलीप वळसे पाटील यांनी आढळरावाना राजकारणात आणलं.
  • भैरवनाथ पतसंस्था ते भीमाशंकर साखर कारखाना संचालक सहकारी चळवळीच्या माध्यमातून लोकसंग्रह.
  • २००४ साली राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेकडून खेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली.
  • तीन वेळा खासदार.

अमोल रामसिंग कोल्हे.

  • जन्म – १८ ऑक्टोबर १९८०
  • शिक्षण- एमबीबीएस.
  • व्यवसाय- अभिनय.
  • कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.
  • राजा शिवछत्रपती या टीव्हीसिरीयलमध्ये शिवरायांच्या भुमिके मुळे घराघरात नाव पोहचले.
  • २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानंतर शिवसेना प्रवेश केला.
  • विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम केले.
  • २०१५ पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख.
  • पुणे पिंपरीचिंचवड महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा.
  • फेब्रुवारी २०१९ मध्ये बारामती येथे शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश निश्चित केला.

फेसबुक.

१. शिवाजीराव आढळराव पाटील.

Screenshot 2019 04 06 at 5.04.13 PM

शिवाजी आढळराव यांचे Shivajirao Adhalrao Patil नावाचे अधिकृत फेसबुक पेज आहे. या पेजला तब्बल सहा लाख लोक लाईक करतात आणि तेवढेच फॉलोवर देखील आहेत. हे अकाऊंट १४ एप्रिल २०११ मध्ये उघडण्यात आले असून या पेजला फेसबुकचा निळा टिक अर्थात ऑफिशियल अकाऊंट चा सिंम्बॉल आहे. आढळराव यांच्या प्रचाराची दिशा या अकाऊंटवरून कळते,

“शिरूरच्या कणाकणात मनामनात एकच नाव आढळराव”

ही त्यांची या निवडणुकीची टॅगलाईन आहे.

शिवाजी आढळराव यांच्या पेजवरील सुरवातीच्या तीन पोस्ट उदाहरणा दाखल घेतल्या तर,

  • आज ६ एप्रिल रोजी दीड वाजताच्या सुमारास या पेजवर  शिवसेनेच्या निवडणूक प्रचारगीताचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला ३६० लाईक, ९ कमेंट आहेत. ही पोस्ट ४२ जणानी शेअर देखील केलेली आहे.
  • सकाळी ८ वाजता या पेजवर आढळराव पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेला फोटो शेअर केला होता. या फोटोला ७६१ लाईक, ५३ कमेंट आहेत. ही पोस्ट ७३ जणांनी शेअर केलेली आहे.
  • सकाळी ७ वाजता आढळराव यांच्या पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याचे कॅप्शन होते “सर्वसामान्यांचा विश्वास,दिखाऊ अभिनेते नको, कार्यतत्पर नेते हवेत” या व्हिडीओला ३७८ लाईक, ३६ कमेंट आणि ४९ शेअर आहेत

या शिवाय शिवाजीराव आढळराव पाटील या नावाचे इतर पेजेस पहायचे झाल्यास फक्त दोन पेज सजेस होतात. त्यांना ४ हजारांच्या व ३ हजारांच्या दरम्यान लाईक आहेत.  

Screenshot 2019 04 06 at 4.44.39 PM

 

२. डॉ. अमोल कोल्हे.

Screenshot 2019 04 06 at 4.46.19 PM

अमोल कोल्हे यांचे Dr.Amol Kolhe नावाचे अधिकृत फेसबुक पेज आहे. या पेजला आढळराव यांच्या पेजच्या मानाने कमी म्हणजे एक लाख एकोणचाळीस हजार लोक लाईक करतात आणि तेवढेच फोलोवर देखील आहेत. हे अकाऊंट १७ सप्टेंबर २०१२ मध्ये उघडण्यात आले असून या पेजला फेसबुकचा निळा टिक अर्थात ऑफिशियल अकाऊंट चा सिंम्बॉल आहे.

कोल्हे यांचा सोशल मिडियावरचा प्रचार कोणत्या दिशेने चालला आहे हे जाणण्यासाठी त्यांच्या पेजवरील तीन पोस्ट पाहू,

  • आज सकाळी ९ वाजता या पेजवर गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देणारा फोटो शेअर करण्यात आला. या फोटोला ८०१ लाईक आणि ८५ कमेंट आहेत. शिवाय ही पोस्ट ११ जणांनी शेअर केली आहे.
  •  यापूर्वी काल रात्री सव्वा दहा वाजता अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्यातल्या झंझावती प्रचाराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला ५५३ लाईक, ३३ कमेंट आणि ४० जणांनी शेअर केलेले आहे.
  • काल संध्याकाळी ७ वाजता या पेजवर अमोल कोल्हे यांच्या खेड तालुका प्रचारदौऱ्याचा कार्यक्रम सांगणारा फोटो शेअर केला होता. या फोटोला ६२३ लाईक, २४ कमेंट आणि ११ शेअर आहेत.

या शिवाय अमोल कोल्हे यांच्या नावाचे इतर पेजेस. 

Screenshot 2019 04 06 at 4.48.00 PM

फेसबुक वर पाहायला गेलं तर पेजला लाईकच्या बाबतीत आढळराव पाटील यांनी बाजी मारली आहे. सर्वात जास्त लाईक त्यांच्या पेजला आहेत. सहा लाखाच्या दरम्यान लाईक असणाऱ्या या पेजवरून गेल्या आठ दिवसांमध्ये 62 पोस्ट टाकण्यात आल्या असून 810.4 K इतका रीच राहिला आहे. तर दूसरीकडे अमोल कोल्हे यांच्या पेजला 1 लाख 39 हजार लाईक असून 352 K इतका रीच आहे. थेट पहायचं झालं तर अमोल कोल्हे यांच्यापेक्षा शिवाजीराव आढळराव पाटील पुढे असलेले दिसून येतात,

Screenshot 2019 04 06 at 5.09.24 PM

Screenshot 2019 04 06 at 4.34.28 PM

पण फेसबुकवरील फॅन पेजेस, इतर ग्रुप यांचा विचार करता अमोल कोल्हे पुढे असल्याच जाणवतं. उदाहरणादाखल खाली एका ग्रुपचा स्क्रिनशॉट दिला आहे. त्या ग्रुवरची सदस्य संख्या अडीच लाख आहे. इतर अकाऊंटवरुन अमोल कोल्हे यांची होणारी प्रसिद्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तुलनेत जास्तच असलेली दिसून येते. 

Screenshot 2019 04 06 at 4.49.45 PM
https://www.facebook.com/groups/243548392753845/

ट्विटर. 

१. शिवाजीराव आढळराव पाटील.

adhalrao twit 1

जुलै २०११ पासून खासदार आढळराव पाटील यांचे ट्विटरवर अकाऊन्ट काढलेले दिसून येते. आतापर्यंत त्यांनी १७३३ ट्विट्स केले आहेत तर त्यांचे ५८५६ ट्विटर फोलोवर्स आहेत हे आपण पाहू शकतो. आढळराव पाटील हे ट्विटरवर फक्त ३२ जणांना फॉलो करतात या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, रतन टाटा, पत्रकार बरखा दत्त या ट्विटर अकाऊंटस चा समावेश आहे.

त्यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, आपल्या प्रचाराचा व्हिडीओ आणि बैलगाडा प्रश्नावरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटस ना अनुक्रमे ९, ४४ व ३७ इतके लाईक मिळालेले आहेत.

२. डॉ. अमोल कोल्हे.

kolhe twitter

ट्विटर या समाजमाध्यमावर अमोल कोल्हे अॅक्टीव्ह असलेले दिसत नाहीत. त्यांच्या नावाचे एक ट्विटर अकाऊंट आहे मात्र त्यावर कोणतीही राजकीय पोस्ट शेअर केलेली नाही. फक्त अमोल कोल्हे यांच्या नाटक व सिरीयलच्या प्रमोशनसाठी ट्विटर वापरलेलं दिसून येते. डिसेंबर २०१८ पासून तर येथे एकही पोस्ट टाकलेली नाही. या अकाऊंट च्या फोलोवर्स मध्ये  आदित्य ठाकरे यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट दिसते.

ट्विटरच्या लढाईत शिवाजीराव आढळराव हे अमोल कोल्हे यांच्या पुढे आहेत.

 इंस्टाग्राम. 

१. शिवाजीराव आढळराव पाटील.

adhalrao insta

खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला ७९७९ फोलॉवर्स आहेत. या त्यांच्या अकाऊन्टला अधिकृत असल्याचा शिक्का असणारा निळा टिक अजूनही मिळालेला नाही. येथे त्यांनी आतापर्यंत १६० पोस्ट केलेल्या आहेत. एका तासाभरापूर्वी त्यांनी पोस्ट टाकलेल्या प्रचाराच्या व्हिडीओ फक्त १३२ जणानी बघितलेला आहे. तर गुढीपाडव्याच्या त्यांनी दिलेल्या शुभेच्छाच्या व्हिडीओला ३०२ जणांनी पाहिलं आहे. गुढीपाडव्याच्याच शुभेच्छाचा त्यांनी फोटोही शेअर केला होता. या फोटोला १४२ लाईक आहेत.

खासदार आढळराव यांचे इंस्टाग्राम अकाऊंट नावापुरतेच अॅक्टीव्ह असलेले दिसून येते.

 २. डॉ. अमोल कोल्हे.

kolhe instagram

अमोल कोल्हे यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला तब्बल दीड लाख फोलॉवर्स आहेत. त्यांच्या या इंस्टाग्राम अकाऊंटला अधिकृत निळा टिक मिळालेला आहे. त्यांनी आतापर्यंत ७७ पोस्ट टाकल्या आहेत.

अमोल कोल्हे हे ट्विटर प्रमाणे इंस्टाग्रामवर देखील अॅक्टीव्ह नाहीत. या व्यासपीठावर त्यांनी कोणतीही राजकीय पोस्ट शेअर केलेली नाही. इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट २१ फेब्रुवारी २०१९ला टाकली होती. ही पोस्ट त्यांनी आपल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रमोशनसाठी टाकलेली आहे.

इंस्टाग्रामवर मात्र डॉ. अमोल कोल्हे यांना आढळराव पाटील यांनी अव्हरेज आणि स्ट्राईकरेटवरून मागे टाकलेले आहे.

ओव्हरऑल पाहायला गेले तर ही समाजमाध्यमावरची निवडणुकीची लढाई चांगलीच रंगलेली दिसून येते. डॉ. अमोल कोल्हे हे फेसबुकवर चांगलीचं फलंदाजी करताना दिसत आहेत. मात्र इंस्टाग्राम आणि ट्विटरवर निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी आढळराव पाटलाना बाय दिलेलं आहे. तर फेसबुकवर त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असताना देखील आकडेवारीत ते मागेच असलेले दिसून येतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.