अख्खी वखार उकरून काढल्यावर शिवरायांच्या नावाची दहशत इंग्रजांना कळली

शिवरायांचे आठवावे रूप,

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी ।

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं, ताकदीचं आणि बुद्धिचं वर्णन करताना लिहीलेल्या आपल्या साहित्यातील काही ओळी. ज्या वाचल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.

आपल्या गनिमी काव्यानं महाराजांनी अख्ख्या मुघलांच येडं पळवलं होत आणि दिल्लीपर्यंत मजल मारलेली. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर युद्धाने मात करायची की बुद्धीने हे महाराजांना चांगलचं माहित होतं.

आणि मुघलचं काय शिवाजी महाराजांनी इंग्रजांना सुद्धा आपल्या पुढं नमतं घ्यायला लावलं होतं. तेचं इंग्रज ज्यांनी आपल्या देशावर कित्येक वर्षे हुकूम गाजवला, पण याचं इंग्रजांच महाराजां पुढं काहीचं चालायचं नाही. कारणं एकदाचं घडलेली अद्दलं इंग्रजांच्या चांगलीच लक्षात राहिलेली.

१६६० चं ते सालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. ज्याची धास्ती सगळ्याचं मुघलं सरदारांना बसली होती. त्यामुळे महाराजांच्या विरोधात जाण्याची कोणाचीचं टाप नव्हती.

पण सिद्दी जोहरनं आपल्या पायावर धोंडा मारायच ठरवल, ३० ते ४० हजारांची फौज घेऊन तो स्वराज्यावर चालून आला. एक एक करत तो गावं उद्ध्वस्त करत होता.

याची खबर शिवरायांपर्यत पोहोचली, सिद्दी जोहरला अडवण्यासाठी महाराजांनी पन्हाळा गाठला. जेणेकरून त्याला बाहेरच्या बाहेर पळवून लावता येईल. सिद्दी जौहरला सुद्धा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असल्याची बातमी मिळाली, त्यामुळे त्यानं सगळ्या तयारीनिशी पन्हाळ्याला वेढा घातला.

हा वेढा खूप मजबूत होता. पण महत्त्वाचं म्हणजे पन्हाळ्याला वेढा घालण्यासाठी राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांनी सिद्दी जौहरला मदत केली होती.

हीच गोष्ट शिवाजी महाराजांना मनात खटकली. एवढचं नाही तर विशालगडाजवळ पालवणचा राजा जसवंतसिंग दळवी आणि शृंगारपूरचा राजा सुर्यराव सुर्वे ह्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या मार्गात अडखळा आणला होता. त्याचा रागही महाराजांच्या मनामध्ये होता.

महाराज लगेचचं राजापूरला पोहचले, तिथे आल्यानंतर शिवरायांनी सगळ्या स्थानिक अंमलदारांकडून आणि पाश्चात्त्य व्यापाऱ्यांकडून खंडण्या वसूल करायला सुरुवात केली.

पण इंग्रज व्यापाऱ्यांनी यात आडकाठी आणली. इंग्रज व्यापाऱ्यांनी खंडणी द्यायला टाळाटाळ केली. पन्हाळ्यावर तोफगोळा देऊन जौहरच्या मदतीला आलेला हेन्री रेव्हिंगटन हा त्या वेळी राजापूरलाचं होता. शिवाजी महाराजांनी त्याला आणि आणखी ७ इंग्रजांना कैद केले. इंग्रजांची वखार उकरून पुरून ठेवलेले द्रव्य महाराजांनी प्राप्त करून घेतलं.

त्यानंतर कैद केलेल्या इंग्रजांना सोनगडच्या किल्ल्यावर पाठविण्यात आलं. हे इंग्रज बरेच दिवस शिवाजी महाराजांच्या कैदेत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा त्यावेळचा प्रेसिडेंट अॅण्ड्रयज याने या इंग्रज कैद्यांना कळविलं की, “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन जौहरला जी मदत केली त्याचे फळ तुम्ही भोगत आहात. ”

या सगळ्या इंग्रजांची बेक्कार अवस्था झालेली. त्यांच्या सुटकेसाठी कोणी प्रयन्त सुद्धा केले नाहीत, करणारं तरी कसं महाराजांच्या विरोधात जाण्याची कोणाच्यातं एवढी हिंमत होती. या कैदेत असलेल्या इंग्रजांनी पैकी दोघं तर कैदेतच मेले. बाकीच्यांची १६६३ च्या जानेवारीत सुटका झाली.

शिवाजी महाराजांच्याच्या या कृतीमुळे राजापूरचे इंग्रजवखारवाले इतके धास्तवले की पुढे त्यांनी शिवाजी महाराजांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केला. पण त्याआधी सिद्दी जौहरचं काय झालं, हे काय नव्यानं सांगायला नको.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.