अगदी शेवटच्या काळातही शिवाजीराव निलंगेकरांनी त्यांच्या तरुण नातवाला हरवले होते.

महाराष्ट्रातील राजकारणाने असेही काही मुख्यमंत्री पाहिलेत ज्यांनी अगदी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांनी अगदी खूपच कमी काळ मुख्यमंत्री पद संभाळलं. यातलंच एक नाव म्हणजे, शिवाजीराव निलंगेकर पाटील !

१९८५ मध्ये निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, त्यानंतर निलंगेकर यांचा  फक्त ११ महिनेच मुख्यमंत्री कार्यकाळ होता.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांची राजकीय कारकीर्द हि सुरुवातीपासूनच दमदार राहिलेली आहे. मात्र त्यांना त्यांच्या याच दमदार कारकिर्दीत त्यांना अशाही निवडणुकीला सामोरं जावं लागलं, जिथे स्वतःच्याच नातवा विरुद्ध त्यांना निवडणूक लढवली होती. 

परंतु त्याआधी २००४ ते २००९ या काळात ते सत्तेच्या बाहेर होते.

तेव्हा निलंगेकरांचा पराभव झाला होता कारण त्याचे प्रमुख कारण म्हणजे लातूर जिल्ह्यात चालू असलेल्या पक्षाअंतर्गत गटबाजी हे होय. याच गटबाजीमुळे निलंगेकरांचे सर्व विरोधक एकत्र आले होते.  असं म्हणलं जातं कि निलंगेकरांच्या विरोधात जाण्यासाठी या विरोधकांना आर्थिक लाभ झाला होता.

असो,  शिवाजीराव हे मुंबईत असल्यावर कै. दिलीपभाऊ हेच सर्वेसर्वा होते. त्यामुळे साहजिकच शिवाजीराव यांच्या माघारी दिलीपभाऊ यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढत गेला होता. त्यामुळे  लोकांच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण होत गेला कि,.आतापर्यंत आपण शिवाजीरावांना निवडून देत आलोच आहोत.

संभाजीराव हेदेखील त्यांचेच वारस आहेत, त्यामुळे त्यांना एक संधी देऊन पाहायला हरकत नाही, असा जनतेचा मतप्रवाह बनत गेला आणि त्यातून संभाजीरावांच्या विजयाचा मार्गही सुकर होत गेला.  अशातच ते २००४ च्या निवडणुकीत शिवाजीराव निलंगेकर मोठ्या खिंडीत सापडले होते कारण,

त्यांच्या विरोधात त्यांचा तरूण नातू उभा राहिला.

आणि अशाप्रकारे त्यांना अशाही निवडणुकीला सामोरं जावं लागलं, जिथे स्वतःच्याच नातवा विरुद्ध त्यांना निवडणूक लढवावी लागली होती आणि हीच नातू विरुद्ध आजोबा अशी निवडणूक देशभर गाजली होती.

पण या निवडणुकीत नातवाकडून आजोबा शिवाजीराव निलंगेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. बरं या निवडणुकीत पराभव झाला असला, तरी शिवाजीराव पाटील हे खचून गेले नाहीत तर
आपण कुठे कमी पडलो, याचा शोध ते घेत राहिले.

लोकांची कामे करण्यात ते व्यग्र राहायचे. गोरगरिबांच्या मोठ्या आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी शिवाजीराव मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल, शिर्डीतील शिर्डी हॉस्पिटल येथे स्वतः फोन करून त्यांना विनामूल्य सेवा मिळावी, याकरिता आग्रही असत. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करत असायचे.

२००४ ते २००९ या काळात सत्तेच्या बाहेर राहूनही त्यानी जनतेच्या समस्यांचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आणून दिले.

लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता प्रसंगी आपल्याच पक्षाच्या शासनालासुद्ध त्यानी धारेवर धरले. मराठवाड्याच्या विकास कसा होईल यावर लक्ष दिले.

बरं, ते या काळात सत्ते बाहेर होते म्हणजे ही गोष्ट इथेच संपत नाही तर, दुसऱ्यांदा देखील असंच घडलं, २००९ च्या निवडणुकीत पुन्हा आजोबा नातू आमने सामने आले. आता मात्र शिवाजीरावांनी त्यांचा लढवय्या स्वभाव दाखवून दिला होता.

कारण या निवडणुकीत मात्र शिवाजीराव निलंगेकर यांनी नातू संभाजीराव निलंगेकर यांचा पराभव केला.

२०१४ साली झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत केंद्राप्रमाणेच राज्यातही सत्तापालट झाले. या निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळून त्या पक्षाचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनले होते. याचा फायदा महाराष्ट्रातील भाजपला झाला.

त्यामुळे ठिकठिकाणच्या मतदारसंघांतील काँग्रेसच्या प्रस्थापित उमेदवारांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसने डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे पुत्र अशोकराव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. परंतु भाजपचे उमेदवार संभाजीराव दिलीपराव पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

जनतेने तरुण, तडफदार अशा संभाजीरावांना प्रतिनिधित्व करण्याची दसऱ्यांदा संधी दिली.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकरांना एकूण ७६ हजार ८१७ इतकी मते मिळाली, तर संभाजीराव पाटील यांचे काका अशोक पाटील निलंगेकर यांना ४९ हजार ३०६ इतकी मते मिळाली. या निवडणुकीत पुतण्याने काकाचा मोठ्या फरकाने पराभव केल्यामुळे महाराष्ट्रात हा विषयही काही काळ चर्चेत राहिला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.