साध्या नगरसेवकांवर ईडीची धाड पडते म्हणजे ….

राज्यात दोनच गोष्टी सद्द्या चर्चेत आहेत एक म्हणजे, पत्रकार परिषदा आणि दुसरी म्हणजे ईडीच्या कारवाया…जसं ईडी आणि सीबीआयचं सत्र चालू झालं तसं आघाडी सरकारकडून आरोप होतोय कि, या यंत्रणा सातत्यानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, भाजपच्या आदेशावर काम करत असतात, या यंत्रणांचा वापर भाजप कडून विरोधी पक्षातील आमदार, खासदारांना भीती घालण्यासाठी, त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी केला जातं असतो, भाजपच्या धार्जिणी लोकांना मदत करत असतात अशा सगळ्या प्रकारचे हे आरोप होतं आलेत.

ईडी आणि सीबीआय आता या केंद्रीय तपास यंत्रणा आघाडीच्या दृष्टीने बदनाम झाल्या आहेत. बदनाम यासाठी की, या केंद्रीय तपास यंत्रणांवर जेवढे आरोप होतात, तेवढे आरोप कदाचित एखाद्या राजकीय पक्षावर देखील होतं नसतील…

असो आता वारंवार होणारे आरोप आणि आघाडीच्या नेत्यांच्या घरी पडणारे छापे यात काय साम्य असेल नसेल यात भिडू खोलात पडत नाही तर मुद्दा हा आहे कि आत्ता नंबर कुणाचा ??? आज नंबर कुणाचा तर मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांचा !!! 

यशवंत जाधव यांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची चर्चा चालू होती. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं कि, अशा कोणत्याही नेत्याच्या घरी आम्ही छापेमारी केली नाही. तेंव्हा अशी माहिती मिळालाय कि, ईडीने नाही तर आयकर विभागाने हि धाड मारल्याचे बोलले जात आहे. याआधीच आयकर विभागाने जाधव यांना नोटीस पाठवली होती. 

इतके दिवस आपण बघतोय कि आघाडीचे मोठे मोठे नेते आयकर विभागाच्या आणि ईडीच्या कचाट्यात अडकलेत पण आज मात्र एक नगरसेवक तसेच महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असणारे यशवंत जाधव यांच्या घरी सकाळी सकाळी ईडीच्या छापा पडला. पहाटेच अधिकारी यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी पोहोचले असून चौकशी सुरु आहे. 

अलीकडेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीमध्येच मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. 

शिवाय जाधव यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप देखील सोमय्यांनी जाधव यांच्यावर केले आहेत. तसेच आयकर विभागाच्या हाती पुरावे लागल्याचं सांगण्यात येतंय. जाधव यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यासाठी मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

सद्या तरी जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून प्राप्तिकर विभागाने अद्याप काही माहिती दिलेली नाही. पण ऐन मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षांच्या घरी आयकर विभागानं केलेली कारवाई सेनेसाठी मोठा धक्का मानला जातोय. पण जाधव यांची हि पहिलीच वेळ नसून याआधी देखील त्यांच्यावर आयकर विभागाची कारवाई झाली होती. तसेच त्यांच्या पत्नी आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव या देखील चौकशीत अडकल्या होत्या.  

कोण आहेत यशवंत जाधव? 

मुंबईतील शिवसेनेचे मोठे नेते म्हणून जाधव यांचं नाव आहे. आधी गटनेते आणि २०१७ साली त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली होती. आणि २०१८ त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तसेच त्यांनी बाजार समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे.  अशी माहिती मिळतेय कि, यशवंत जाधव यांना २००२ साली महापौर बनण्याची संधी थोडक्यात हुकली, आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांचा देखील २०१४ मध्ये महापौर बनण्याचा चान्स थोडक्यात थोडक्यात हुकला होता.  दोघांच्या वेळेस अनुसूचित जातीसाठी आरक्षण असल्यामुळे त्यांना या पदाची संधी मिळू शकली नव्हती. 

पण नगरसेवक यशवंत जाधव यांचं हे प्रकरण आहे तर काय ?

आयकर विभागाच्या याआधीच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी कोलकातामध्ये शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं समोर आलेलं.  कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचा दावा करण्यात आला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले कि, त्यांची एकूण संपत्ती हि ७.५  कोटी रुपयांची आहे. यातली २.७४ कोटींची जंगम मालमत्ता होती. तर त्यांचे पती म्हणजे यशवंत जाधव यांची एकूण ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती तर जंगम मालमत्ता हि १.७२ कोटी असल्याचं नमूद केलं होतं. तर जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं.

पण यामिनी जाधव यांनी १ कोटीचं कर्ज जे दाखवलं ते त्यांची स्वतःचीची रक्कम होती, असं आयकर विभागाचं म्हणणं आहे. तसेच या तपासादरम्यान समोर आलं कि, त्यांची प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी आहे. महावर यांची चौकशी झाली तेंव्हा समोर आलेलं कि, महावर यांनी सन २०११-१२ मध्ये प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना केली होती. कालांतराने हि कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली होती.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.