शिवसेनेत प्रवेश करायचा असेल तर एक शपथ घ्यावी लागायची

प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवरील छोटेखानी घरात शिवसेनेची स्थापना झाली. राजकीय पक्ष नव्हे तर मराठी माणसांची संघटना…म्हणून या पक्षाची नोंदणी करायला सुद्धा मराठी माणसांची मोठी झुंबड उडाली होती…

शिवसेनेची पहिली जाहीर सभा म्हणजेच सेनेचा पहिला दसरा मेळावा. शिवाजी पार्कवरील पहिल्याच मेळाव्यास तुफानी गर्दी झाली होती. प्रबोधनकार ठाकरे, रामराव आदिक हि दिग्गज लोकं व्यासपीठावर बसली होती.

‘हा बाळ मी आज तुम्हाला दिला!’ म्हणत प्रबोधनकारांनी पक्षाची घोषणा केली. त्याचवेळी बाळासाहेबांचे  उद्गार होते…. ‘राजकारण हे गजकरण. त्यामुळे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण !’ म्हणत ठाणे नगरपालिका निवडणूक लढवून राजकारण प्रवेश केला.

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतरच्या महिन्याभरातच, संघटनेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या शिवसैनिकांसाठी काही मार्गदर्शक सूत्रं संघटनेतर्फे जाहीर करण्यात आली होती. शिवसेना स्थापनेला एक महिना झाल्यानंतर १९ जुलै १९६६ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘मार्मिक’च्या अंकात त्याचा तपशील दिला होता.

शिवसेनेच्या पहिल्या वर्षी संघटनेत येऊ इच्छिणाऱ्यांना एक शपथ घ्यावी लागायची. 

त्या शपथपत्रात काही मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश होता….

१. मराठी माणसानं मराठी माणसाला मदत करावी आणि त्याची भरभराट होईल याकडे लक्ष द्यावं.

२. मराठी माणसानं आपली मालमत्ता अ-मराठी माणसाला विकू नये आणि असा व्यवहार कुठे होत असल्यास त्याची माहिती तातडीने जवळच्या शाखेवर द्यावी.

३. मराठी दुकानदारांनी आपला माल शक्यतो मराठी घाऊक व्यापाऱ्यांकडूनच विकत घ्यावा आणि आपल्या ग्राहकांशी सौजन्याने वागावं.

४. मराठी मालकवर्गाने फक्त मराठी माणसालाच कामावर ठेवावं. ५. तरुण मराठी मुलांनी उत्तम इंग्लिश बोलायला शिकावं; तसंच इंग्रजी स्टेनो-टायपिंगही त्यांनी शिकलं पाहिजे.

६. मराठी माणसानं आपला आळस झटकून स्वतःच्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन

कराव्यात; तसंच नोकरीसाठी कोठेही जाण्याची तयारी दाखवावी. ७. मराठी सण-समारंभ आणि उत्सव यामध्ये आपल्या मराठी बांधवांबरोबर मोठ्या संख्येनं सहभागी व्हाव.

८. मराठी माणसांच्या संस्था, शाळा, आश्रम यांना उदारपणे मदत करून त्यांच्या कार्यात सहभागी व्हावं.

९. उडपी हॉटेलांवर बहिष्कार टाकावा आणि अ-मराठी माणसांच्या दुकानांतून कसलीही खरेदी करू नये. 

१०. धंदे आणि उद्योग व्यवसाय यामधील मराठी माणसाला खाली बघायला न लावता, उलट

त्याला शक्य तो मदत करावी. ११. मराठी बांधवांशी उद्दामपणे आणि बेफिकिरीनं वागू नये. उलट एखादा मराठी माणूस अडचणीत असल्यास इतरांनी त्यास संघटितपणे मदत करावी. 

 संदर्भ – मार्मिक, १९ जुलै १९६६

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.