शिवसेनेने तेव्हाही युती मोडून शेकापबरोबर भगवा फडकवायचा निर्धार केला होता

सत्ता येण्याची पुसटशी चाहुलही लागली नव्हती तेव्हा शिवसेना ही एक अभेद्य संघटना होती. त्या संघटनेची शिस्तही बुलंद होती. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेस अभूतपूर्व यश मिळवून सत्तेच्या जवळ जाऊन ही संघटना पोहोचली. तिथेच सत्ता व पदासाठी संघर्ष व कुरबुरिंना सुरुवात झाली. कारण काही असोत, पण अभेद्य म्हंटल्या गेलेल्या शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली ती १९९२ साली. शिवसेनेत छगन भुजबळ ह्यांच्या नेतृत्वाखाली १७ शिवसेना आमदारांनी पक्ष सोडून काँग्रेसचा आसरा घेताच महाराष्ट्रात राजकीय धरणीकंप झाला.

महाराष्ट्राच्या भावी राजकारणाला कलाटणी देणारे हे फोडाफोडीचे राजकारण. शिवसेना त्यामुळे संपली काय ? बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वालाच आव्हान होते का ? ह्याविषयी दैनिकांही काही अनेक महिने चर्चा केली. ह्या सर्व काळात स्वतः बाळासाहेब कमालीचे मौन बाळगून होते.

त्याचवेळी शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष युती करणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या. 

म्हणजे आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली असली आणि हा सेनेचा नवा प्रयोग वाटत असला तरी तस अजिबात वाटून घ्यायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी बरोबरचा संसार सेनेने काही पहिल्यांदाच मोडलेला नाही. १९९२ नंतर बाळासाहेब ठाकरेंनी बीजेपीशी युती मोडली होती.

त्याच कारण त्यांनीच लोकप्रभाच्या मुलाखतीत सांगितलं होत. बाळासाहेब ठाकरे म्हणतात,

बीजेपी ही जागा वाढवते आणि मग कुठेच आम्हाला उपयोगी पडत नाही. मी आनंदला (आनंद दिघे) सांगितलं तू डावपेचात कमी पडलास.

शेकाप बरोबर जाण्याच्या मुद्द्यावर बाळासाहेब म्हंटले होते, 

आम्ही स्वतःहून कोठेही युती करण्यासाठी गेलेलो नाही. मला महाराष्ट्राला एक चांगलं सरकार द्यायचं आहे. आणि यासरकारसाठी सहकार हा लागणारच. शेवटी मराठी माणूस सुद्धा फाटलेला आहे. आणि हिंदू सुद्धा जोडता जोडता पुष्कळ वेळा पंचाईत होते. कारण आपल्याकडे ज्या पद्धतीचा माथेफिरू पणा पाहिजे तितका नाही.तो मुसलमानांमध्ये आहे.

शेतकरी कामगार पक्षाची ताकद तुम्हाला मानावी लागेल. ग्रामीण पोकेट्स जेवढे त्यांच्याकडे आहेत तेवढा जनसंपर्क बीजेपीचा पण नाहीये. आज तुम्हाला जे ग्रामीण भागातलं बीजेपीच चित्र दिसतय  ते शिवसेनेच्या मदतीने उभा राहिलेला आहे ही कोणीच नाकारू शकणार नाही. आत्तापर्यंत त्यांचा जेमतेम एक खासदार यायचा. ती ठाण्याची जागा नाही म्हटलं तरी रामभाऊ म्हाळगी यांची पुण्याई होतीच आता एकदम दहा खासदार.

रायगड मध्ये जेव्हा शेतकरी कामगार पक्ष सत्तेवर होता, तेव्हा शिवसेना आणि शेकाप च्या कायम चकमकी व्हायच्या. यावर बाळासाहेब ठाकरेंनी शेकापच्या दत्ता पाटील यांना विचारलं होत की,
ह्या तुमच्या आणि आमच्या मारामाऱ्या किती पिढ्या चालणार आहेत ? झालं आता पुरे झालं !

यावर दत्ता पाटील म्हंटले होते, मी तुमचं अभिनंदन करतो, इतकं सगळं होऊनही तुम्ही माझं प्रेमाने स्वागत केलंत.

दत्ता पाटील किंबहुना बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही समजलं होत की, शेकाप आणि शिवसेना एकत्र आले तर खरोखरच महाराष्ट्रात मोठी ताकद उभी राहू शकली असती. पण जेव्हा असा प्रयत्न झाला तेव्हा ही युती मोडण्याच काम मात्र शरद पवारांनी केलं होतं, अस खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हंटले होते.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.