सिंग इज किंग हरभजनने शोएब अख्तरला कायमचा धडा शिकवला.

भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामने एक वेगळ्याच लेव्हल ला जाऊन खेळले जातात. कधी कधी मैदानातील गरमागरमी एवढी वाढते की खेळातले वाद मैदानाबाहेर पर्यंत पोहचतात.

असच झालं होतं २०१० च्या आशिया कपच्या वेळी.

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्वालिफाइंग मॅच खेळला जात होता. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताला पाकने हरवले असल्यामुळे बदला घेण्याच्याच हेतूने भारतीय खेळाडू ग्राउंडवर उतरले होते.

प्रत्येकजण वेगळ्याच उत्साहाने पेटलेला होता. शाहिद आफ्रिदीने टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग घेतली.

सलमान बट्टने चांगली सुरवात करून दिली. त्याची आणि कामरान अखमलची फिफ्टी आणि मध्येच आफ्रिदीने धुवाधार ठोकलेल्या 32 धावा याच्या जोरावर पाकचा स्कोर २६७ धावांवर जाऊन पोहचला.

सचिनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारताची सुरवात एवढी चांगली झाली नाही.

सेहवाग,कोहली लवकर आउट झाले. गंभीर आणि धोनीने मात्र नांगर रोवून चांगली भागीदारी केली. या दोघांनीही फिफ्टी मारली.

४२व्या ओव्हर ला मॅच फिनिशर धोनी आउट झाला तेव्हा मात्र पाकच्या आशा पल्लवित झाल्या.

आता फक्त रैना आणि सर रवींद्र जडेजा एवढेच स्पेशालिस्ट बॅट्समन उरले होते. अशातच जडेजाची अजमलने स्वस्तात दांडी उडवली आणि सामना पूर्णपणे पाकिस्तानकडे झुकला.

पाच ओव्हर मध्ये भारताला ५९ धावा काढायच्या होत्या आणि आता फक्त टेलएंडर्स उरले होते.

रैनाने नव्याने आलेल्या हरभजनला सिंगल काढायला लावलं आणि सगळी सूत्र हातात घेतली. अजमलच एक बाऊंडरी आणि एक सिक्स ठोकुन स्वागत केलं.

पुढच्या ओव्हरला शोएब अख्तर बॉलिंगला आला आणि समोर होता हरभजन.

रैनाने भज्जीला सिंगल काढून स्ट्राईक द्यायला सांगितलेलं पण भज्जीचा मूड वेगळाच होता. पहिला बॉल त्याने व्यवस्थित खेळला. रन मिळाली नाही पण त्याला अंदाज आला होता.

पुढच्या बॉलला शोएब अख्तर नेहमीच्या स्टाईलने जोरात धावत आला आणि त्याने सुपरस्पीडमध्ये बॉल टाकला.

हरभजन तयारीतच होता, त्याने शोएबला थेट लॉंग ऑनच्या वर स्टेडियम बाहेर सिक्स हाणला.

हरभजन सारख्या बॉलरने सिक्स मारला हे बघून शोएब अख्तर चवताळला. त्याच्या अहंकाराला भज्जीने डिवचल होतं. दोघांची थोडीशी बाचाबाची झाली. शोएबने तिथून पुढे फक्त बाऊन्सर मारले.

पण मॅच परत हळूहळू भारताकडे झुकू लागली. रैनाने वेळोवेळी फोरसिक्स चोरून सिंगल घेत स्कोरबोर्ड हलता ठेवला.

४८ व्या ओव्हरला शोएब अख्तर परत बॉलिंगला आला, रैनाने त्याला परत सिक्स हाणला. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवेळी तर हरभजन आणि शोएबची जोरदार भांडणे झाली.

दोघेही पंजाबी असल्यामुळे शिव्यांची लाखोली वाहिली गेली.

शोएब हरभजनला म्हणाला,

आय विल किल यु.

हरभजन म्हणाला,

चलो देखते है कोण किसे मारता है.

शेवटच्या ओव्हरला भारताला जिंकायला फक्त ९ धावा हव्या होत्या. पण दुर्दैवाने रैना दुसऱ्याच बॉलला रनआउट झाला. पुढे आलेल्या प्रवीणकुमारने कशी बशी साथ दिली.

मॅचचे शेवटचे दोन बॉल शिल्लक होते तेव्हा मात्र भज्जीने मोहम्मद आमिरला परत एक सिक्स मारला आणि मॅच संपवली.

118446

ही मॅच आजवरची सगळ्यात स्लेजिंग, शिवीगाळ झालेली मॅच समजली जाते. याच मॅचमध्ये गौतम गंभीरची सुद्धा पाक खेळाडूंबरोबर भांडणे झाली होती.

या सगळ्याचा बदला घेणारा जल्लोष हरभजनने शेवटच्या सिक्सनंतर केला. विशेषतः शोएब अख्तर कडे बघून हातवारे केले.

शोएबने सुद्धा त्याला जा जा असा इशारा केला आणि हॉटेल मध्ये घुसून मारेन अस सांगितलं.

हरभजनने जोशात सेलिब्रेशन तर केलं पण जेव्हा शोएब खरोखर त्याला मारायला हॉटेलमध्ये शोधू लागला तेव्हा तो लपून बसला.

दुसऱ्या दिवशी माफी वगैरे मागून प्रकरण मिटल. हरभजन आणि शोएब अख्तर खऱ्या आयुष्यात पण चांगले मित्र होते. त्या हरभजनच्या सिक्स मुळे मात्र शोएबला जाणवलं की आपलं करियर संपत आल आहे. फक्त २०११च्या वर्ल्डकप पर्यंत तो थांबला व त्यांनतर त्याने निवृत्ती घेतली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.