निवड होऊन वर्ष झालं नाही, तरी रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्याची मागणी का होत आहे ?
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला. अगदी २०९ रन्सचं टार्गेट देऊनही हारला. एकतर आधीच एशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून हरल्यानं टीम इंडियाला शिव्या पडल्या होत्या, त्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर हरणं म्हणजे पार नाक कापलं गेलं. आता विशेष म्हणजे भारत या मॅचेस लास्ट ओव्हरमध्ये जाऊन हरलाय आणि तिन्ही वेळा बॉलिंग करतानाच.
या तिन्ही मॅचेसनंतर दोन गोष्टी झाल्या, पहिलं म्हणजे आता क्रिकेट नाय बघायचं रे हे ठरवण्याचा आपण अयशस्वी प्रयत्न केला आणि दुसरं म्हणजे भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं खच्चून शिव्या खाल्ल्या. आधी कसं होतं भारत हरला की रवी शास्त्री आणि विराट कोहली जोडीनं घावायचे, आता रोहित शर्मा एकटा घावतो.
टी२० रँकिंगमध्ये एक नंबरला असलेल्या भारताचा मागच्या काही मॅचेसमधला परफॉर्मन्स पाहिला, तर सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे, रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्याची हीच वेळ आहे का ?
हे ही वाच भिडू:
- रोहित शर्माच्या हॅट्रिकने सचिनच्या मुंबई इंडियन्सला रडवल होतं….
- फॉर्म, टॅलेंट की राजकारण… संजू सॅमसनचं दरवेळी गंडतं कुठं..?
- काकांनी केलेल्या ५० रुपयांच्या मदतीमुळे डॉन ऑफ बोरिवली क्रिकेटचा हिटमॅन बनला.