फोटोचं निमित्त, पण श्रीकांत शिंदे सत्तेचं समांतर केंद्र होतायत का ?
ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र वापरलं आणि बाजूला बसलेल्या एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्याची घोषणा केली, त्याच क्षणी लोकांच्या रिएक्शन आल्या की पद तर फडणवीसच चालवणार. पण घडतय वेगळच, सुपर सीएम असल्याचा आरोप होतोय तो एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत ठाकरेंवर..
आणि त्याला निमित्त ठरला तो म्हणजे व्हायरल झालेला फोटो. झालं असं की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी रविकांत वर्पे यांनी एक फोटो ट्विट केला. या फोटोत खासदार श्रीकांत शिंदे लोकांसोबत चर्चा करत आहेत. ऑफिसचा सेटअप दिसत आहे. पण या फोटोच्या मागे मंत्रालयात असतो तसा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन लिहलेला बोर्ड दिसतोय.
या फोटोवरुन श्रीकांत शिंदेंवर प्रचंड टीका झाली, त्यानंतर त्यांनी पुढे येत स्वतःची बाजूही मांडली.
पण श्रीकांत शिंदेंनी त्या खुर्चीत बसण्यामधून नेमका काय संदेश गेला ? राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कुठले प्रोटोकॉल पाळायला हवेत ? आणि राज्याच्या आणि देशातल्या सत्तेच्या समांतर केंद्रांचा इतिहास काय सांगतो ? हेच जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.