श्रीशांतच्या बाउन्सरने सगळ्या आफ्रिकन टीमच्या बत्त्या गुल केल्या होत्या.

श्रीशांतच्या नुसत्या बॉलिंगचा रनअप जरी बघितला तरी भल्या भल्या खेळाडूंच्या छातीत धस्स व्हायचं. जेव्हा तो बॉल घेऊन पळत सुटायचा असं वाटायचा आता खतरनाक यॉर्कर असेल किंवा जबरदस्त बाउन्सर असेल यापैकी एकावर तरी खेळाडू बाद व्हायचा म्हणजे व्हायचाच. जहीर खाननंतर धोनीचा हुकुमी एक्का म्हणून श्रीशांतकडे पाहायलं जायचं.

याच श्रीशांतने साऊथ आफ्रिकेविरुद्ध जो राडा घातला होता तो सगळ्या जगभर प्रसिद्ध झाला होता. केवळ एका बाउन्सरने सगळ्या क्रिकेट जगताचं लक्ष श्रीशांतने स्वतःकडे वेधून घेतलं होतं. म्हणजे श्रीशांतने टाकलेला बाउन्सर खरे क्रिकेटप्रेमी कधीही विसरू शकणार आणि लूप मोडवर बघत बसतील.

आता हा काय विषय चाललाय तो आधी डिटेलमध्ये बघू म्हणजे सगळं ध्यानात येईल. तर आजचा किस्सा श्रीशांतच्या आणि जॅक कॅलिसच्या जुगलबंदीचा.

जॅक कॅलिस हा आजवरच्या सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याचा बॅटिंगचा स्टान्स आणि त्याने फटकावलेले टायमिंग शॉट. त्याची भेदक गोलंदाजी बॅट्समनची गोची करायची. इतका सर्वोत्तम खेळाडू होता जॅक कॅलिस कि त्याचं नाव कपिल देव, इमरान खान, रिचर्ड हॅडली या दिग्गजांच्या यादीत कायम असायचं आणि आजही आहे.

जेव्हा जेव्हा जॅक कॅलिसच्या मोठमोठ्या रेकॉर्डसचा मुद्दा येतो त्यावेळी अगत्याने श्रीशांतचं नाव हे येतच. २०१० साल. भारतीय संघ त्यावेळी साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. आधीच या सिरीजमध्ये भारत एक मॅच गमावून बसला होता. १-० अशा स्थितीत असताना भारत पुढची कसोटी जिंकायचीच या हिशोबाने मैदानात उतरला होता.

२६ डिसेंबरला दुसरी टेस्ट सुरु झाली. चौथ्या दिवशी साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी ३०३ धावांची गरज होती. ३४ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १२३ धावांवर आफ्रिकन संघ खेळत होता. जॅक कॅलिस आणि ए.बी. डिव्हिलियर्स हे दोन खेळाडू मैदानावर होते. आता या दोघांच्या रेकॉर्डबद्दल बोलायलाच नको. हि जोडी फोडण्यासाठी भारत आटोकाट प्रयत्न करत होता.

हे दोघे जर टिकले तर सामना जिंकवूनच परत जातील हे भारतीय संघाला माहिती होतं. हि पार्टनरशिप तोडणं जरुरीचं झालं होतं. आणि याच वेळी आला तो श्रीशांतचा चमत्कारिक बाउन्सर.

३५ व्या शतकाची सुरवात श्रीशांतने केली, हि त्याची वैयक्तिक ११ वि ओव्हर होती. दुसरा बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ.

टप्पा पडून हा बॉल इतक्या वेगाने वर उसळला कि जॅक कॅलिस अक्षरशः गडबडला. आधीच बॉलला स्पीड इतका होता कि कॅलिसला यातून वाचताच आलं नाही. उडी मारून तो बॉल सोडू पाहत होता पण तोंडावर बॉल आल्याने तो मागे झाला आणि त्याच्या शरीराचा धनुष्यबाणासारखा आकार झाला होता.

पण कॅलिसचं दुर्दैव बघा बॉल उसळी मारून अंगावर आला , धनुष्यासारखा आकार झाला आणि बॉल ग्लव्जला लागून हवेत उडाला. गलीत उभा असलेल्या सेहवागने काहीही चूक न करता कॅच पकडला आणि कॅलिस बाद झाला.

या विकेटमुळे भारतीय संघाचा जोश वाढला. १२३ धावांवर आफ्रिकेचा खंदा फलंदाज श्रीशांतने बाद केला. पुढे मग जहीर खान आणि हरभजन सिंग यांनी सगळी आफ्रिकन टीम बाद केली. साऊथ आफ्रिका २१५ धावांवर ऑलाउट झाली आणि भारताने ८७ धावांनी साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव केला.

श्रीशांतच्या या सामान्यातल्या बाउन्सरचं मात्र प्रचंड कौतुक झालं. मोठमोठ्या क्रिकेट तज्ज्ञांनी या बाउंसरबद्दल श्रीशांतची पाठ थोपटली. श्रीशांतच्या क्रिकेट करियरमधला गोल्डन बॉल हा बाउन्सर समजला जातो. त्याच्या एका बाउन्सरने क्रिकेट प्रेमी लोकांना इतकं खुश केलं होत कि त्याच्यापुढे त्याच्या क्रिकेट कॉंट्रोव्हर्सी फिक्या वाटतील.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.