श्यामाप्रसाद मुखर्जींचे वारसदार म्हणतायत, भाजपचं राजकारण जनसंघापेक्षा वेगळ झालं आहे…

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी. अखिल भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. हिंदू राष्ट्रवाद आणि स्वदेशी विचारसरणीच्या आधारावर जनसंघाने त्यावेळी काँग्रेसपुढे पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला होता. याच विचारसरणीतून जनसंघाने जम्मू काश्मीरच्या कलम ३७० ला देखील तीव्र विरोध केला होता. हाच जनसंघ म्हणजे पुढे जाऊन भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.

मात्र आताच्या भाजपच संपूर्ण राजकारणच जनसंघाच्या विचारसरणीपासून पूर्णपणे वेगळ आहे. असं खुद्द श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वारसदार आणि भाचा चित्ततोष मुखर्जी यांनी म्हंटलं आहे. चित्ततोष मुखर्जी याआधी कोलकाता आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश होते. सोबतच २००८ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे हंगामी राज्यपाल म्हणून देखील काम बघितले आहे.

नेमकं काय म्हणतं आहेत चित्ततोष मुखर्जी आणि का?

राष्ट्रवादावर भाजप आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या दृष्टिकोनावर बोलताना चित्ततोष मुखर्जी म्हणतात,

भाजपचे सध्याचे राजकारण काका श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर जे राजकारण होते त्याच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे आहे. त्यावेळी हिंदुत्वावर जास्तीत जास्त जोर देण्याचा मुद्दा तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्यांचा उद्देश हा संपूर्ण भारताला एकसंघ ठेवण्याचा होता. आणि हि गोष्ट त्यांच्या अखंड भारताबद्दलच्या विचारांमधून स्प्ष्टपणे दिसून देखील यायची.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नक्कीच हिंदूंसाठी आवाज उठवला. याबाबत दुमत असण्याचं कारणच नाही. जनसंघाने हिंदूंसाठी काम देखील केले. पण उघडपणे कधीच म्हंटले नाही कि, ते हिंदूंसाठी काम करत आहेत. एकूणच श्यामाप्रसाद यांनी जे आपल्या काळात केले नाही ते आज भाजप करत आहे.

चित्ततोष मुखर्जी म्हणतात,

विशेष म्हणजे श्यामाप्रसाद अशा काळात सक्रिय होते, जेव्हा बंगालमध्ये हिंदू अल्पसंख्यांक धोक्यात होता. त्यावेळी बंगाल मुस्लिम बहुल प्रांत होता. ते १९३९ रोजी राजकारणात आले. शिक्षणतज्ञ म्हणून ते संस्था चालवायचे. ३३-३४ व्या वर्षी कुलपती बनले. मात्र या धोक्यात असलेल्या हिंदूंसाठी ते राजकारणात आले.

मात्र अलीकडील काळात भाजप बंगालमध्ये लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. राज्याला एका चांगल्या विरोधीपक्षाची गरज होती. पण पक्षबदलू  नेत्यांना भाजपने आपल्या सोबत घेतले. हे पाऊल पूर्णपणे चुकीचे होते. भले त्यांनी निवडणूक हरली असती तरी चालले असते, पण ते कमीत कमी इनामदार तरी राहिले असते. त्यामुळे पक्षाचे राजकारण आता आधी होते तसे राहिलेले नाही. मी खूप नाराज आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.