गाण्यांमध्ये नुसती बदला आणि बंदुकीची भाषा, सिद्धू मुसेवालाची हत्यापण तशीच झाली

“गब्रू दे नाल संताली (47) जुड गई, घाटो घाट सजा पंज साल वाट दे, गब्रू उठे केस जेहरा संजय दत्त ते, जट्ट उठे प्रकरण जेहरा संजय दत्त ते…”

सिद्धू मुसेवालच्या संजू या गाण्याचे हे लिरिक्स आहेत.

ज्याचा अर्थ होतो हा गब्रू  AK-47 सोबत जोडला गेला आहे आणि त्यासाठी किमान शिक्षा पाच वर्षे तुरुंगवासाची आहे. संजय दत्तला ज्या केसचा सामना करावा लागला, तोच हा गब्रू देखील सामना करत आहे.

आवा तवा बोल्दे वकील सोहनी, सारी दुनिया दा वो जज सुनीदा, जिते सादी चली अपील सोहनी…

(वकील काही ना काही बोलत राहतात पण या जगाचा खरा न्यायाधीश ऐकत असतो, जिथे माझे अपील चालते).

पोलिसांबरोबर AK-47 चालवाल्यांनंतर सिद्धू मुसेवालावर जि केस चालू होती त्यातून बाहेर आल्यांनतर त्यानं आपल्या कृत्याचं समर्थन करत त्यांना स्वतःची तुलना संजय दत्तबरोबर करत हे गाणं काढलं होतं.

पंजाबी गाण्यांमधलं एक फेमस नाव असलेल्या सिद्धू  मुसेवालाच्या जवळपास प्रत्येक गाण्यामध्ये बदला, बंदूक हीच भाषा असायची आणि आज दुर्दैवाने आज त्याचा अंतही तसाच झाला आहे.

मुसेवालाची पंजाबमधील मनसा इथं गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. 

सिद्धूवर किमान २० गोळी झाडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

पंजाबमधील नवीनच आलेल्या आम आदमी पार्टी  सरकारने दोनच दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवेलाची सुरक्षा काढून घेतली होती आणि आज दोन दिवसांनंतर त्याची हत्या झाली आहे.

सिद्धूने नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसपक्षात प्रवेश देखील केला होता.

गुन्हे फक्त खऱ्या मर्दांवरच नोंदवले जातात असं म्हणत त्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  त्यानंतर त्याला काँग्रेसनं मनसा मधून उमेदवारी देखील दिली होती. पण त्यात मुसेवालाल काय यश आलं नव्हतं आणि  आपच्या उमेदवाराकडून त्याचा ६३,००० मतांनी पराभव झाला होता.

सिद्धू मूसेवालाचं खरं नाव आहे, शुभदिप सिंग सिद्धू. 

मग म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आल्यावर जरा कुल वाटावं म्हणून त्यानं त्याचा मुसा या गावावरून ‘सिद्धू मुसेवाला’ हे नाव घेतलं होतं. इंजिनिरिंग झाल्यांनतर  झाल्यावर जसे सगळे पंजाबी करतात तसं हा कॅनडाला गेला होता. त्याचं  लिहलेलं लायसन्स हे पहिलं  गाणं ठीक ठाक चाललं. मग हा फुलटाईम सिंगर होण्याकडे वळले.

गँगस्टर रॅप हा हिपहॉपचा प्रकार मुसेवालाची खासियत. 

याच कारणामुळे पंजाबमधील तरुणाई त्याला डोक्यावर घेते. त्याच्या गाण्यांचे बोल बऱ्याचदा फक्त बंदुक, मारामारी आणि ड्रग्स या भोवतीच असतात.त्यामुळेच मुसेवालावर आपल्या गाण्यातून ड्रग्स आणि हिंसा यांना उत्तेजन दिल्याबाबद्दल एफआयर दाखल होता.

२०२० मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात हा गडी पोलिस बाजूला असताना एके ४७ चालवत होता. तेव्हा त्याच्यावर आर्म्स ऍक्टची पहिली केस झाली होती. पुन्हा २०२० मध्ये टिकटॉक व्हिडीओमध्ये बंदूक चालवताना त्याचा एक विडिओ व्हायरल झाला होता. या केसमध्ये मुसेवालाला जेलची हवा खायला लागली होती. 

२०१९ मध्ये एका गाण्यात १८व्या शतकातील शीख योद्धा माय भागो यांचा अपमान केल्यामुळेही सिद्धू चांगलाच वादात सापडला होता. त्यावेळी त्याला शिरोमणी अकाली दल आणि इतर शीख संघटनांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते.

सिद्धू मुसेवाला सारख्या गायकांनी गाण्यात बंदुकांचा उदोउदो करणं थांबवावं अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.

काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील भगवंत  “बंदूक संस्कृती आणि गुंडवादाच्या प्रवृत्तीचा काही पंजाबी गायकांकडून प्रचार केला जात आहे” असं म्हटलं म्हणत अशा प्रवृत्तींचा मी निषेध करत असल्याचं म्हटलं होतं. याआधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अशी गाणी बनवू नयेत असं आव्हान केलं होतं.

पंजाबमध्ये गाण्यातून होणाऱ्या बंदुकीच्या हिंसाचाराच्या प्रसाराविरोधात काम करणारे प्रोफेसर पंडित राव धन्नेवार सिद्धू मुसेवालाच्या गाण्यांवर बंदी आणावी म्हणून कोर्टात पण गेले होते.

जुलै २०१९ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने  पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड राज्यांच्या पोलीस महासंचालकांना दारू, वाइन, ड्रग्ज आणि हिंसाचार यांचा गौरव करणारी कोणतीही गाणी वाजवली जाणार नाहीत किंवा सादर केली जाणार नाहीत याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते. 

मात्र एवढा सगळं होत असताना सिद्धू या सगळ्याला फाट्यावर मारत “पखिया पखिया पखिया, बंदूक विच पंज गोलिया…” म्हणत राहिला आणि आज त्याची २० गोळ्या झाडून हत्या झाली आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.