ट्रकवाल्या सरदारजींनी कॅनडाच्या पंतप्रधानांना भर थंडीत घाम फोडलाय

कॅनडा-अमेरिका सीमा ओलांडण्यासाठी लस बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णया विरोधात शेकडो ट्रक आणि हजारो आंदोलक, यांनी त्यांनी ओटावा शहराच्या दिशेने जाणारे रस्ते रोखले आहेत. जानेवारीच्या मध्यात घेतलेल्या या निर्णयाला पहिल्यापासून विरोध होत होता. याला विरोध करण्यासाठी  ट्रक चालकांचा ताफा ज्याला फ्रीडम कॉन्वे असं नाव देण्यात आलं होतं त्याला हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला होता.

लवकरच हे आंदोलन देशभरात पसरलं आणि लसीकरणाच्या मुद्यावरून चालू झालेलं हे आंदोलन आता सरकारनं कोव्हीड काळात घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात येऊन ठेपलं आहे.

या आंदोलनात अजून एक लक्षणीय गोष्ट पाहायला मिळतेय म्हणजे शीख सरदारांची उपस्थिती.हजारो शीख ड्रायव्हर्स कॅनडा ओलांडून सुमारे ४० मैल लांब असलेल्या हजारो ट्रकच्या ताफ्यात सामील झाले आहेत, लस कंपलसरी करण्याच्या आणि कोविड-संबंधित निर्बंधांचा निषेध करण्यासाठी व्हँकुव्हरहून राजधानी ओटावापर्यंत गाडी चालवत आलेले आहेत.यूएस आणि कॅनडा या दोन्ही ठिकाणी ट्रकचालकांची लक्षणीय टक्केवारी शीखांची आहे.

अंदाजानुसार दीड ते दोन लाख शीख कॅनडाचा जवळपास ४०टक्के ट्रांसपोर्ट व्यवसाय सांभाळतात.

त्यापैकी बरेच यूएस-कॅनडा पुरवठा साखळीचा भाग आहेत आणि ते ही लस आणि आणि इतर कोविड प्रोटोकॉलबद्दल नाराज आहेत.तथापि, कॅनडामधील शीख समुदायामध्ये आता दोन गट पडले आहेत. एका गटाचं असं म्हणणं आहे कि लस आदेशाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे ट्रूडोचा राजकीय विरोध करणार्‍या कट्टरपंथी पांढर्‍या ट्रकर्सद्वारे प्रोटेस्ट हायजॅक केला जात आहे. ट्रुडो सहयोगी असलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते जगमीत सिंग यांनी या निषेधाचा निषेध केला तेव्हा हे विभाजन समोर आले. या आंदोलनामागील काही लोक “दाहक, फूट पाडणारी आणि द्वेषपूर्ण टिप्पण्या” देऊन “खोटी माहिती” देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 

त्याचवेळी सिंह यांचे मेहुणे, जोधवीर सिंग धालीवाल यांनी या प्रोटेस्टसाठी $१३,००० दान केल्याची माहिती बाहेर आली.

यूएस आणि कॅनडामधील ट्रकचालक ट्रक चालवून $१००००० पेक्षा जास्त कमावू शकतात त्यामुळं मोठ्या संख्येने शीख स्थलांतरित या बिझनेसमध्ये येतात. अलिकडच्या काही महिन्यांत पुरवठा साखळीतील त्यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे, विशेषत: कोविड काळातील कमतरतेमुळे या शीख ट्रकचालकांना चांगलंच महत्व आलं आहे.

ट्रकचालकांनी चालू केलेल्या या आंदोलनानं मात्र सरकारला जंग जंग पछाडलं आहे.

त्यामुळं आता या आंदोलनाचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. आंदोलन १८व्या दिवसात प्रवेश करत असताना देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही वापरण्यात न आलेल्या आणीबाणीची घषण करण्यात आली आहे. आणीबाणीचे अधिकार तात्काळ लागू झाले आहेत आणि ते ३०दिवस चालतील.

त्याचबरोबर या आंदोलनासाठी चालणारं क्राऊडफंडिंगची खातीही सरकारनं गोठवली आहेत. त्याचबरोबर या आंदोलनातील ट्रकचालकांची बँक खातीही जप्त करण्याचं सरकारनं ठरवलं असं सांगण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्य आणीबाणी जाहीर करण्याच्या या निर्णयाचा आता जोरदार विरोधही होत असतो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.