शीख महिलांनी देखील पगडी बांधण्यास का सुरवात केलीय?

आमचा लाडका हिरो सनी देओल बऱ्याच पिक्चर मध्ये पगडी घालतो. पण बाकीच्या पिक्चर मध्ये तो पगडी घालत नाही. प्रचाराच्या काळात त्यांनी एका ठिकाणी पगडी घातली होती. पण इतर वेळी त्याची पगडी दिसत नाही.

यामागे नेमके काय कारण आहे याचा आम्हाला अंदाज आला नाही. त्यामुळे आम्ही ठीक धर्मातील पगडी घालण्याच्या परंपरेकडे थोडं लक्ष घातलं आणि काही नवीन गोष्टी समजल्या.

सनी देओल एकवेळ फुलटाईम पगडी घालत नसेल पण शीख धर्मातील काही स्त्रियांनी पूर्णवेळ पगडी करणे सुरू केले आहे.

भारतात उगम पावलेला आणि जगाच्या अनेक भागांमध्ये पसरलेला महत्त्वाचा धर्म म्हणजे शीख होय. या धर्मातील वैशिष्ट्यपूर्ण रितींनी आणि परंपरांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे .

आपल्या स्थापनेपासूनच शीख धर्माचे भारताच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे काम केले आहे. तसेच भारताच्या मध्ययुगीन इतिहासामध्ये भारताच्या सीमांचे संरक्षण करण्याचे तसेच जगभरात भारताचा मानवतेचा संदेश घेऊन जाण्याचे काम धर्माने केले आहे. या धर्मात स्त्रियांना मिळणारी समानतेची वागणूक आणि गरिबांसाठी केला जाणारा मदतीचा पुरस्कार या दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत.

स्त्रियांना समान हक्क देण्याच्या बाबतीत शीख धर्माची जुनी ख्याती राहिली आहे .

गुरुद्वारामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व काही गोष्टी करू शकतात. तसेच व्यवहारातही स्त्रियांना महत्त्वाचे स्थान मिळते.
पण काळाच्या ओघात मध्ये काही गोष्टींमध्ये त्यांना वेगळ्या सवलती देण्यात आल्या होत्या. काही गोष्टी फक्त पुरुष लोकांसाठी सीमित राहिल्या होत्या.

त्यातील एक म्हणजे शीख लोकांचा की पगडी होय.

शीख माणूस ओळखण्यासाठी सगळ्यात सोपे बाब मानली जाते ती म्हणजे त्याची पगडी. पगडी जगभरात शीख मित्रांची एक महत्त्वाची ओळख आहे.

पगडी घालणे हे त्या धर्मातील एक महत्त्वाचे काम म्हणून ओळखले गेले आहे. प्रत्येक शिख माणसाने केस वाढवले पाहिजेत आणि ते काढता कामा नये अशी आज्ञा धर्माने केली आहे.

त्यामुळे या केसांना बांधण्यासाठी व ते खुले न सोडता एका जागी ठेवण्यासाठी पगडीचा वापर केला जातो.

पगडी द्वारे हे केस झाकले जातात. हातामध्ये कडे घालने तसेच सोबत एक छोटा चाकू म्हणजे कृपान बाळगणे आणि केस वाढवणे अशा काही आज्ञा सर्व शिख धर्मियांसाठी दिल्या गेल्या आहेत. म्हणूनच शीख लोक आपल्याला पगडी घालताना दिसतात पण स्त्रिया पगडी घालू लागल्या तर जगातील काही भागात मध्ये शीख स्त्रियांनी पगडी घालण्यास सुरुवात केली आहे.

देविंदर या चाळीस वर्षाच्या महिला आहेत त्यात इंग्लंड मध्ये राहतात. लंडनच्या एका शाळेमध्ये त्या शिक्षकाचे काम करतात आणि त्या आपल्या डोक्यावर बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भेटण्यासाठी फेटा म्हणजेच पगडी साठी प्रसिद्ध आहेत. त्यांना पाहणारा कोणताही माणूस त्यांच्या या वैशिष्ट्याला दाद आल्यावाचून राहत नाही. त्यांना नेहमी त्यांच्या डोक्यावरील या पगडी विषयी विचारण्यात येतं.

त्या सांगतात की

“पगडी घातल्यापासून मला स्वतःला एक चांगला माणूस बनण्यासाठी मदत झाली आहे. माझ्या स्वतः प्रति आणि माझ्या समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या पार करण्यासाठी पगडी मला प्रोत्साहित करत असते.

पण भारतीय वंशाच्या देवेंदर यांनी हे पाऊल का उचलले असावे? भारतात महिला तर आतापर्यंत कपडे घालत होत्या मग अचानक हा ट्रेन्ड येण्याचे कारण काय?

तर याचे कारण आहे शीख धर्मातील सगळ्या लोकांसाठी त्यांच्या धर्मगुरूंनी दिलेल्या काही आज्ञा.

पगडीला शीख धर्मामध्ये दसतर असेही म्हटले जाते. १६९९ साली शिखांचे दहावे धर्म गुरु गोविंदसिंह यांनी शीख धर्मियांना कसे राहावे व वागावे यासंबंधी काही आज्ञा दिल्या होत्या.

पण एक धर्मीयांचा युद्धासाठीचा केलेला पोशाख असतो. या काळात हा पोशाख वापरून एक धर्माचे लोक भारतात जागोजागी फिरत व मोगल सत्तेविरुद्ध लढा चालू ठेवत.

या काळामध्ये डोक्यावरती पगडी बांधणे हे डोक्याच्या रक्षणासाठी आणि शीख धर्मियांचे लांब केस बांधून ठेवण्यासाठी वापरण्याचे साधन बनले.

डोक्यावरती असणारी पगडी ही तेव्हापासूनच शीख धर्माच्या लोकांची खासियत राहिलेली आहे.

पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा शीख धर्माचा लढाईचा इतिहास संपला. त्यानंतरच्या काळातही ही परंपरा सुरूच राहिली.

पण काळाच्या ओघात या परंपरेचे स्वरूप फक्त पुरुषांना पुरते मर्यादित राहिले. त्यामुळे शीख धर्मातील फक्त पुरूषच आपल्याला पगडी बांधताना दिसतात व स्त्रिया या पगडी बांधणे ऐवजी डोक्यावरून दुपट्टा घेणे पसंत करतात.

पण आता हळूहळू ही पद्धत काही जागी बदलून पाहत आहे स्त्रिया देखील पगडी बांधण्यासाठी सुरुवात करत आहेत.

देवेंदर याही लहानपणी पगडी बांधत नव्हत्या.

आपल्या पगडी बांधणे मागची गोष्ट सांगताना त्या म्हणतात,

सुरुवातीपासून मी अशी नव्हते सुरुवातीच्या काळात मी माझे केस कापत असे. तसेच मेकअप लावणे आणि रात्री बाहेर जाऊन मजा करणे अशा बऱ्याच गोष्टी मी करत असे.

पण या सगळ्यात आपले कुठेतरी चुकते आहे असे मला वाटत होते.”

सात वर्षांपूर्वी देविंदर यांनी शीख धर्म पूर्णपणे स्वीकारला आणि त्या या धर्माचे पालन प्रत्येक नियमासोबत करू लागल्या. त्यांनी स्वतःचे केस कापणे बंद केले तसेच त्या डोक्यावरती मोठी पांढरी पगडी घालू लागल्या.

“बऱ्याच लोकांनी मला या गोष्टीपासून वाढविण्याचा प्रयत्न केला. जगाच्या स्पर्धेत आपण ह्या गोष्टीमुळे कुठेतरी मागे पडू, लोक आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतील अशा सगळ्या गोष्टी लोकांनी मला ऐकवल्या. पण पगडी घातल्यापासून माझ्या जीवनामध्ये बदल झाला आहे. माझ्या वागण्यात आत्मविश्वास अाला आहे. तसेच अनेक गोष्टी ज्या मी सुरुवातीला करू शकत नव्हते त्या आता मला सहज शक्य होत आहेत.”

याबरोबरच केस कापणे ही गोष्ट शेख धर्मांमध्ये चुकीची समजण्यात आली आहे. म्हणूनच देवेंदर यांनी आपल्या शरीरावरील केस न कापण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या या गोष्टीबद्दल मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने बोलतात .

भारतामध्ये स्त्रियांना केस असणे हे त्यांच्या सौंदर्याचे मुख्य लक्षण मानले गेले आहे. त्यामुळे स्त्रीला सुंदर केस असावेत आणि तिने त्याचे प्रदर्शन करावे याचे प्रचंड दडपण माझ्या मनावर होते . स्त्रीने असेच दिसले पाहिजे अशी आपल्या समाजाची रीतभात आहे. पण धर्माला अनुसरून वाढणे मला योग्य वाटते म्हणून मी पगडी घालने जास्त पसंत करते”

असं त्या सांगतात.

“लोक काय म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष करणे आणि पगडी घालने हे मला बळ देणारे ठरले. शीख धर्मियांनी आपण कोण आहोत व आपली परंपरा काय आहे या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. एक व्यक्ती म्हणून मला माझ्या अस्तित्वाचे भान आले तेव्हापासून पगडी घालणे माझ्यासाठी सामान्य गोष्ट बनली आहे देवाने आपल्याला ही आज्ञा दिली आहे म्हणूनच आपल्या समाजातही असेच वावरणे हे आपले काम आहे असे मला वाटते” असं त्यांचं म्हणणं आहे.

काही शीख पुरुषही आता केस वाढवणे या प्रथेकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक शीख पुरुषांनी आपले केस कापायला सुरुवात केली आहे. सिनेमामध्ये आपल्याला याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. तरुण पिढीसाठी केस कापणे ही सामान्य बाब बनली आहे.

मात्र केस कापणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे शिख समजले जात नाही.

त्यामुळे जगभरात नेमक्या किती स्त्रिया सध्या पगडी घालत आहेत याचा अंदाज लावणे ही फार शक्य नाही. पण पगडी घालणाऱ्या लोकांचे प्रमाण जगभरात कमी आहे.

पण जगभरातील शीख धर्मातील स्त्रिया पगडी घालायला सुरुवात करत आहेत. याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात .

डोरिस जेकब या कॅनडामधील वॉटर्लू विद्यापीठांमध्ये शिक्षिका आहेत . त्यांनी पगडी या विषयावर शास्त्रोक्त अभ्यास करत त्याचे मूलभूत संशोधन केले आहे .

त्यांच्या मते भारतातील पंजाब राज्य सोडून जगभरातील इतर शीख स्त्रिया पगडी घालायला सुरुवात करत आहेत. भारतात ही गोष्ट अद्यापही सुरू झालेली नाही.

जगभर पसरलेल्या शीख धर्मातील तरुण लोकांनी ही गोष्ट नव्याने सुरू करायला प्रारंभ केला आहे .
यापूर्वी शीख स्त्रिया डोक्यावर केवळ चुनी किंवा चुनरी घेऊन बसत. काही स्त्रिया डोक्यावर फक्त स्कार्फ गुंडाळून बसत असत.

पण परदेशामध्ये आपल्या धर्माचा अभिमान वाटणे आणि आपण त्या धर्माचे प्रतिनिधी आहोत हे दाखवणे ही काळाच्या ओघात नव्याने तयार झालेली गोष्ट आहे . त्यामुळे अभिमानाने आपण शिख आहोत हे दाखवण्यासाठी स्त्रियांनीही पगडी घालायला सुरुवात केली आहे असे त्यांचे मत आहे . शीख धर्मामध्ये मुलभूत असलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टींना स्त्रियांनी पगडी घालून एक प्रकारे आपल्या धर्माची व्याख्या पुन्हा मांडली आहे असेही त्या म्हणतात.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपच्या काही देशांमध्ये गेल्या काही काळात शीख धर्मियांवर हल्ले झाले होते. अमेरिकेमध्ये 9/11 रोजी ट्विन टॉवरवर झालेल्या हल्ल्यानंतर मुस्लिम लोकांविषयी द्वेष मोठ्या प्रमाणात वाढला .

शीख धर्माच्या लोकांना लांब दाढी असल्याने काही परदेशी नागरिक शिख यांनाच मुस्लीम समजून त्यांच्यावर हल्ले करत होते . त्याचबरोबर शीख लोकांची पगडी हीदेखील अफगानी लोकांसारखी असल्याने व त्यातही त्याचे साधर्म्य ओसामा बिन लादेन याच्या सगळ्यात प्रसिद्ध असणाऱ्या काही चित्रांमध्ये घातलेल्या पगडीशी दिसत असल्याने शीख धर्माचा लोकांविषयी संशय मधूनच वाढला होता . त्यामुळे तिथल्या शीख धर्माच्या लोकांमध्ये घबराट पसरली होती .

भारतातील अनेक गटांनी तसेच शीख धर्मांच्या काही संस्थांनी या घटनेत या गोष्टींची समाजामध्ये जागृती व्हावी म्हणून कामही केले होते .

शीख समाज कॅनडा आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. कॅनडामध्ये पंजाबी ही आता त्या देशाची महत्त्वाची भाषा म्हणून मान्यता पावली आहे. त्या देशाचा पंतप्रधान दरवर्षी भारतात एकदा तरी येऊन सुवर्णमंदिराला भेट देऊन जातो. कारण तेथील मतदार देखील या गोष्टी पाहूनच मतदान करत असतात एकट्या इंग्लंडमध्ये आता पाच लाखांच्या जवळपास शीख धर्माचे लोक राहत आहेत.

त्यामुळे पगडे घालण्याचा हा ट्रेंड इंग्लंडमधील शीख धर्माच्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे . जगजीत सिंग हे इंग्लंडमधल्या विद्यापीठांमध्ये या विषयाचा सविस्तर अभ्यास करताहेत. इंग्लंडमध्ये पगडी घालणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या त्यांच्या अनुभवानुसार शीख धर्माच्या स्त्रियांनी पगडी घालायला सुरुवात करण्यामागे अनेक कारणे आहेत.

त्यांना शीख धर्मातील काही तरुण मुलींनी या संदर्भात व त्यांचे विचार सांगितले.

“शीख धर्म हा प्रामुख्याने समानता सांगणारा धर्म आहे पण आपल्या समाजामध्ये पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे स्त्रियांना या काही महत्त्वाच्या गोष्टीपासून वंचित राहावे लागले होते आमच्या गुरूने सर्व शीख धर्मियांनी पगडी घालावी असा आदेश दिला आहे जर सर्व शिक्षक धर्मीय पगडी घालत असतील तर मग स्त्रियांनी त्यामध्ये का मागे राहावे असा आमचा सवाल आहे त्यामुळे सर्व शीख धर्मीय या व्याख्येमध्ये स्त्रियाही येतात म्हणूनच आम्ही पगडी घालायला सुरुवात करत आहोत.”

येत्या काही काळात भारतातही हा ट्रेंड सुरू होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.