सिक्कीमच्या राजाला त्याची राणी भारताविरुद्ध पेटवत होती. त्यांचा ना संसार टिकला ना राज्य टिकलं.

1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतातील वेगवेगळे संस्थाने भारतात विलीन झाली.

परंतु काही संस्थाने ही उशीराने भारतात विलीन झाली. त्यातलेच एक संस्थान होते सिक्कीम संस्थान. सिक्कीमवर 300 वर्षापासून चोंग्याल वंशाची सत्ता होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सिक्कीमने स्वतंत्र देश म्हणून राहण्याचे ठरवले. 1958 ला भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामार्फत तीन मूर्ती भवन येथे एका पाहुण्याच्या आदरातिथ्याची तयारी होत होती. ते पाहुणे होते सिक्कीमचे राजे  पॉल्देन थोंदुप नामग्याल.

आदरातिथ्य स्वीकार करताना नामग्याल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की ज्यांच्यामार्फत आपण आदरातिथ्य स्वीकारत आहोत त्यांच्या मुलीकडून 17 वर्षानंतर आपल्या 300 वर्ष जुन्या राजवंशाची सिक्कीमवरील सत्ता संपुष्टात येईल. सिक्कीमच्या  शेवटच्या राजाबद्दलचा इतिहास आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल तो आज आपण जाणून घेऊयात.

नामग्याल यांची अमेरिकन पत्नी

नामग्याल यांनी होप कूक नावाच्या महिलेशी विवाह केला होता. होप कूक नंतर सिक्कीम ची शेवटची राणी ठरली. नामग्याल आणि होप कूक यांची पहिली भेट ही दर्जिलिंग च्या विंडमोर होटल मधे झाली होती. होप कूक त्यावेळी 20 वर्षाची तर राजा नामग्याल 42 वर्षाचे होते. 1963 मधे त्यांनी विवाह केला. राणीला भारत आवडत नसे. राणीने राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. राणीचा मनसुबा भारत विरोधी होता…भारताने आरोप केला कि, राणी ही CIA ची एजंट आहे .

राजा देखील आपल्या देशाच्या बाबतीत संवेदनशील होता. राणीचा भारत विरोध राजाच्या भारतविरोधी मत तयार होण्यास पोषक ठरत होता. सिक्कीमच्या राजवंशाच्या शेवटच्या काळात राणी होप कुक चा हस्तक्षेप तेथील सत्ता संपुष्टात यायला कारणीभूत ठरला. राणी परस्पर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ लागले. देशाचे धोरण भारत विरोधी ठेवले तर आपल्याला अमेरिकेचे समर्थन प्राप्त होईल असे राणीला वाटे.

राजा-राणीचा संसार फार काळ टिकला नाही.

1980 साली त्यांचा घटस्फोट झाला. नामग्याल यांच्या विवाहानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले व नंतर  मुहूर्तानुसार नवीन राजाला गादीवर बसविण्यात आले.

आणि 1975 साली चोंग्याल वंशाचा शेवट झाला….

6 एप्रिल 1975 ला इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना भारतीय सेनेने सिक्कीम मध्ये घुसून तेथील राजमहालाला घेराव घातला. जनतेच्या मनात देखील राजाविषयी असंतोष होता. त्यादिवशी अडीचशे सैनिक महाला मध्ये तैनात होते. अशात चकमकीची ठिणगी उडते आणि चकमक सुरू होते. बसंत छेत्री नावाच्या गार्डला गोळी लागून तो मृत्यू पावतो. दुपारच्या एक वाजण्याआधी पर्यंतच सेनेने संपूर्ण महालावर ताबा मिळवला होता. नंतर सिक्कीम मधे जनमत घेण्यात येते. भारतात विलीन होण्यावर जनतेने बहुमत देऊन सिक्कीम भारताचे राज्य होण्यासाठी मार्ग मोकळा होतो.

पण नामग्याल राजाचे नंतर झाले काय ?

सिक्कीम भारतात विलीन झाल्यानंतर राणी कुक आणि राजा नामग्याल यांच्यात बेबनाव सुरू होतो राणी राजाला सोडून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन अमेरिकेला निघून जाते.राजाच्या सर्वात वाईट काळात राणीने  त्याची साथ सोडलेली असते.

नोव्हेंबर 1976 मधे राजा नामग्याल बार्बिटुरेट्स चं सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न करतो.एसएसकेएम हॉस्पिटलमधील ऍनेस्थेसिया आणि रेस्पिरेटरी केअर युनिट विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ अमल कुमार बोस यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार केले.नामग्याल यांचे 29 जानेवारी 1982 रोजी न्यूयॉर्क शहरातील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर येथे कर्करोगाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 58 वर्षांचे होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.