सिलिकॉन व्हॅलीच्या झगमगाटात जगणारा CEO जेव्हा तमिळनाडूच्या एका गावात स्थायिक होतो…

असं म्हणतात ना, माणूस कितीही मोठा झाला तरी मातीशी नाळ तुटत नाही, असचं काहीस घडलयं यशस्वी व्यावसायिक श्रीधर यांच्यासोबत. श्रीधर आणि त्याच्या भावाने मिळून १९९६ मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये झोहो कंपनीची स्थापना केली, जे तंत्रज्ञानाच्या जगात एक प्रख्यात नाव आहे.

२५ वर्षांपासून क्लाऊड-आधारित सॉफ्टवेअर कंपनीत ९५०० कर्मचारी काम करतात. फोर्बज मासिकाच्या मते, या बंधूंची संपत्ती १.५ अब्ज डॉलर्स आहे. पण जवळजवळ तीन दशके कॅलिफोर्नियामध्ये घालवल्यानंतर आणि कंपनीला पुढे नेल्यानंतर श्रीधरने ठरवले की,

त्याला एका शांत जागी राहायचे आहे आणि अशा जागेच्या शोधात त्याने दक्षिण भारतातील एका दुर्गम गाव गाठले.

ना रस्ते, ना पाणी, ना वीजेचा पत्ता

श्रीधर सांगतात की, चेन्नईपासून दक्षिणेस सुमारे ६०० कि.मी. दक्षिणेस एका जिल्ह्यात हे खेड वसलं आहे. इथल्या बर्‍याच भागात धान्याची लागवड केली जाते. गावाची लोकसंख्या २००० पेक्षा कमी आहे. ना तिथे रस्ते, ना नाल्याची योग्य व्यवस्था, ना घरांमध्ये पाईपद्वारे पाणीपुरवठा. एवढचं नव्हे तर इथे वीजेचा देखील पत्ता नसतो. त्यामुळे श्रीधर बहुधा डीझल जनरेटरवर अवलंबून असतात.

सिलिकॉन व्हॅलीपासून लांब असूनही कोणत्याही अडथळ्याशिवाय  सुरूये काम

खरं तर, इथे आजच्या जगात सर्वात महत्वाच्या असणाऱ्या इंटरनेटची हाय-स्पीड सुविधा आहे. ज्यामुळे श्रीधर ऑफिसची कामे आरामशीर करतात. ते एका मोठ्या कंपनीचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. ते म्हणतात,

“एक टीम आहे, जी मला थेट अहवाल देते. मी प्रोग्रामरबरोबर काम करतो. जेे मोठ्या टेक प्रोजेक्टवर काम करतात. सॉफ्टवेअर टीममध्ये अनेक अभियंता या जगाच्या कानाकोपऱ्यातून काम करतात.”

श्रीधर नुकत्याच बांधलेल्या दोन बेडरूमच्या फार्महाऊसमध्ये राहतात. त्यांच्या घरात एअर कंडिशनर नाही आणि गाडी ऐवजी ते इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा किंवा सायकल वापरतात. बऱ्याचदा गावाच्या चहाच्या दुकानात जाऊन स्थानिक लोकांशी भेटतात.

श्रीधर सांगतात की, “मी येथे माझे पूर्ण आयुष्य जगतोय, येथे आता मी बरेच स्थानिक लोकांना ओळखतो आणि जवळपासचे बरेच गावकरी देखील ओळखू लागले आहेत.”श्रीधर सहसा गावात जीन्स-टी-शर्ट घालून फिरताना दिसतात, पण कधीकधी ते गावातील इतर लोकांप्रमाणेच धोतर देखील घालतात.

‘लोकांना माहित आहे पण’ सेलिब्रिटी म्हणून ‘नाही

त्यांना  मिळालेल्या मीडिया कव्हरेजमुळे ते कोण आहे हे बर्‍याच स्थानिक लोकांना माहित आहे. मात्र, ते सांगतात की, ते सेलिब्रिटी नाही. ते गावाच्या नावाचा देखील उल्लेख करत नाही. जेणेकरून त्यांना कोणी भेटायला येऊ नये.

साथीच्या आधीच बनविले सॅटेलाईट ऑफिस

गेल्या वर्षी कोरोनो साथीचा त्रास सुरू झाला तेव्हा जगभरातील कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झाले. याचा परिणाम म्हणून बर्‍याच कंपन्यांनी कायमस्वरूपी घरातून काम करण्यास सुरूवात केली. पण श्रीधर यांनी हे काम वेळेपूर्वीच केले होते. त्यांनी स्वतः साठीच नाही तर त्यांच्या कर्मचार्‍यांसाठीही हा मार्ग खुला केला आहे. त्यांच्याकडे कायमस्वरूपी कार्यरत मॉडेल आहे.

त्यांची कंपनी झोहोने १० वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या तेंकसी येथे पहिले ग्रामीण कार्यालय तयार केले, तेव्हापासून झोहोकडे ३० सॅटेलाईट कार्यालये आहेत. ते म्हणतात, “कामाची पद्धत कशी विकसित होते हे आम्हाला अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. परंतु आम्ही ही ग्रामीण कार्यालये तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहोत आणि आम्ही ऑनलाईन साधनांमध्येही गुंतवणूक करीत आहोत.”

श्रीधरला आशा आहे की, त्यांचे जवळपास २० ते ३० टक्के कर्मचारी घरून कायमस्वरुपी काम करू शकतील आणि सॅटेलाईट ऑफिस मिटींगची गरज पूर्ण करतील. यामुळे अनेक कर्मचार्‍यांना चेन्नईला यावे लागणार नाही जेथे त्यांचे सर्वाधिक कर्मचारी आहेत.

श्रीधर यांनी का पकडला गावाचा रस्ता?

श्रीधर यांचा जन्म भारतात झाला होता आणि शाळेच्या सुटीत ते मूळ गावी येत असत. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतरही, त्यांना नेहमीच भारतात येण्याची इच्छा होती. जेव्हा श्रीधरने सॅन फ्रान्सिस्को सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या सहकार्यांना मोठा धक्का बसला नाही.

शिक्षण यंत्रणेकडे तक्रारी

श्रीधर यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी भारत आणि अमेरिकेच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये अभ्यास केला परंतु शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यांचे फारसे सकारात्मक मत नाही.

त्यांनी आयआयटी, मद्रास येथे अभियांत्रिकी पदवी घेतली आणि त्यानंतर अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून मास्टर्स आणि पीएचडी केली. परंतु त्याचा असा आग्रह आहे की त्याच्या शिक्षणाचे त्याच्या यशाशी काही देणे-घेणे नाही. ते म्हणतात,

“मला प्राध्यापक व्हायचे होते आणि उच्च-स्तरीय गणित शिकवायचे होते.

शिक्षणाबद्दल उत्साही असणाऱ्या श्रीधर यांनी पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे शिक्षण देणारी ‘झोहो स्कूल’ स्थापित केली.

तामिळनाडूमध्ये अशा दोन शाळा आहेत आणि त्यातील एक टेंकसी येथे आहे जेथे श्रीधर दररोज जातो. त्यांची शाळा सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, व्यवस्थापन, रचना, सर्जनशील लेखन यासारख्या विषयांवर दोन वर्षांचे कार्यक्रम चालवते. या शाळांमध्ये अभ्यासासाठी वयोमर्यादा 17 ते 20 वर्षे असावी आणि विद्यार्थ्याने शालेय शिक्षण 12 वर्षे पूर्ण केले असावे.

श्रीधर म्हणतात, “आम्ही प्रोग्रामिंग शिकवतो आणि मुले स्वतःच अॅप्स बनवतात. फ्लुईड डायनेमिक्स जाणून घेतल्याशिवाय आपण एक चांगले पल्मर बनू शकता, संगणक विज्ञानाचे नियम जाणून घेतल्याशिवाय आपण एक उत्कृष्ट प्रोग्रामर होऊ शकता, हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.”आहे झोहो स्कूलमधून उत्तीर्ण झालेले सुमारे 900 विद्यार्थी आज श्रीधरच्या कंपनीत काम करतात.

बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्यासारख्या काही अब्जाधीशांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग परोपकारी कार्यासाठी बाजूला ठेवला, परंतु श्रीधर म्हणतात की ते पाश्चात्य मॉडेलचे अनुकरण करण्यास तयार नाहीत, असे म्हणत सामाजिक जबाबदारी ही त्यांच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. ते म्हणतात,

“आम्ही अशा बर्‍याच गोष्टी करतो पण त्यास चॅरीटीचे नाव देत नाही. जेव्हा आपण नोकरी मिळवणाऱ्या लोकांना कौशल्य देतो तेव्हा आपण कंपनीला आणि त्या व्यक्तीलाही मदत करतो.”

श्रीधरला फक्त शाळा पर्यंत थांबायचे नाही, परंतु ग्रामीण भागात रूग्णांना आवश्यक उपचार देता यावे म्हणून दक्षिण भारतात २५० बेडचे रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे.

जानेवारीमध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळावर केली गेली, जिथे देशाची आर्थिक आणि सुरक्षाविषयक गरजांसाठी महत्त्वपूर्ण वैज्ञानिक मार्ग शोधण्याची त्यांची भूमिका आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.