सेबीने चांदीसाठी एक्सचेंज ट्रेडेड फंड सुरु करण्याची परवानगी दिलीय, म्हणजे नेमकं काय?
भारतात आता गोल्ड ईटीएफप्रमाणेच चांदीसाठी सुद्धा एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफ सुरू होणार आहे. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबीने यासाठी मान्यता दिली आहे. सेबीच्या संचालक मंडळाने म्युच्युअल फंड नियमांमध्ये काही सुधारणा करून ‘सिल्व्हर ईटीएफ’ सुरू केले आहे.
सेबीने काल रोखे बाजाराशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात सोन्याचे रोखे आणि सामाजिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी स्वतंत्र शेअर मार्केट तयार करणे, गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी ‘गुंतवणूकदार अधिकार पत्र सोबतच विलीनीकरण आणि अधिग्रहण तांत्रिकदृष्ट्या अधिक योग्य करणे, आणि चांदी एक्सचेंज ट्रेडेड फंड (Silver ETF) सुरू करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण आता मुख्य प्रश्न म्हणजे हे सिल्व्हर ईटीएफ असतं काय आणि ते काम कशाप्रकारे करणार आहे?
आता पर्यंत ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड हे फक्त सोन्यामध्ये होते. यालाच गोल्ड ईटीएफ असं म्हंटलं जात. यामुळे प्रत्यक्ष सोन विकत न घेता म्युच्युअल फंडांच्या ईटीएफच्या माध्यमातून कागदी स्वरुपात म्हणजेच भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करता येत होती. मात्र आता चांदीमध्ये म्हणजे सिल्वर ईटीएफ सुरु झाल्याने प्रत्यक्ष चांदी विकत न घेता म्युच्युअल फंडांच्या ईटीएफच्या माध्यमातून कागदी स्वरुपात चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विकसित बाजारात ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या एक्सचेंज ट्रेडेड फंड लाँच करतात ज्या चांदीच्या किमती दोन प्रकारे ट्रॅक करतात. काही योजना डेरिव्हेटिव्हज (वायद्यामध्ये गुंतवणूक) वापरून चांदीच्या रिटर्सची नक्कल करतात. तर काहीजण त्यासाठी प्रत्यक्ष चांदीचे बार खरेदी करणे पसंत करतात. या दोन्ही पर्यायांमध्ये अल्प किंवा दीर्घ मुदतीत दुप्पट परतावा मिळतो.
चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे…
भारतात चांदीकडे केवळ एक मौल्यवान धातू म्हणून बघितले जात नाही तर त्याचे अनेक प्रकारे औद्योगिक उपयोग आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये देखील चांदी वापरली जाते. त्यामुळे आगामी काळात गुंतवणुकीचा हा गुंतवणूकदारांना पर्याय फायदेशीर ठरु शकतो.
भारतातील गोल्ड ईटीएफ
सध्या, भारतीय म्युच्युअल फंडांना ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी फक्त सोन्यासाठी होती.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार,
गोल्ड ईटीएफमध्ये तब्बल ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत १६,३४९ कोटी रुपयांच्या मालमत्तेची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सेबीने मंगळवारी म्युच्युअल फंड कंपन्यांना बोर्डाच्या बैठकीनंतर सिल्व्हर ईटीएफ सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
आतापर्यंत बाजारात चांदीचा ईटीएफ नव्हता. चांदी आणि कच्च्या तेलाच्या एक्सचेंज ट्रेडेड फंडची बऱ्याच काळापासून मागणी होत होती. चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचे चांगले मार्ग आहेत असे तज्ञांचे मत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना केवळ सोने किंवा हिऱ्यासारख्या मौल्यवान धातूंवर अवलंबून राहावे लागणार नाही.
हे हि वाच भिडू
- गौतम अदानींच्या या एका अफवेमुळे, NDTV चे शेअर्सचे भाव अचानक १० टक्क्यांनी वाढले.
- सेबीच्या एका पॉलिसीमुळे गौतम अदानी गोत्यात येऊन रामदेव बाबांची दिवाळी होणार आहे
- बाप भारताचा ॲपल बनवायच स्वप्न पहात होता तेवढ्यात पोरीने हजारो कोटींचा टीव्ही ब्रँड उभा केला.