१११ वर्षांपासून ‘बुगाटी’ सल्ला देतेय, आम्ही गाडी पळवण्यासाठी बनवतो, थांबवण्यासाठी नाही..

फोर व्हिलरचा नाद कोणाला नसतो?, प्रत्येकालाच वाटतं की आपल्या दारासमोर एखादी फॅमिली कार पाहिजेच पाहिजे. त्यात ब्रँडेड आणि स्टायलिश कारकडे लोकांचं जरा जास्तचं अॅट्रक्शन असतं. मग ती कार कितीका महाग असेना पण हौस महत्त्वाची.

यात ऑडी, बीएमडब्ल्यू, फरारी यासोबत नंबर लागतो तो बुगाटीचा. सगळ्यात महागड्या पण फेमस गाड्यांच्या यादीत बुगाटीचं नाव हमखास येतचं.

आपल्या नवनवीन आणि स्टायलिश लुईने घायाळ करणारी बुगाटी. जीची किंमत कोटींच्या घरात असते पण कारप्रेमींची ही ती नेहमीच पहिली चॉईस असते.

तर या ब्रँडेड कारचा निर्माता म्हणजे एटोर आर्को इसिडोरो बुगाटी. इटालियन वंशाचा फ्रेंच ऑटोमोबाईल डिझायनर आणि निर्माता. ऑटोमोबाईल उत्पादन कंपनी ऑटोमोबाईल ई. बुगाटीचे संस्थापक आणि मालक. १९०९ मध्ये याने कंपनीची स्थापना तत्कालीन जर्मन शहर मोल्सहेममधल्या अलसेस भागात केली, जे आता फ्रान्समध्ये आहे.

वडील कार्लो बुगाटी इटालियन आर्ट नोव्यू फर्निचर आणि दागिन्यांचे डिझायनर, धाकटा भाऊ, रेम्ब्रांट एक प्रसिद्ध प्राणी मूर्तिकार, काकू, लुईगिया बुगाटी चित्रकार जिओवानी सेगँटिनीची पत्नी तर आजोबा जिओवानी लुईगी बुगाटी हे आर्किटेक्ट आणि शिल्पकार अशा इटलीच्या मिलान येथे एका कलात्मक कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

बुगाटीच्या वडिलांची इच्छा होती कि, त्याने त्यांच्या पारंपारिक टेक्निकल उद्योगात डोकं घालावं. परंतु मुलाने मोटर-वाहन निर्मीतीच्या बारीक-सारीक पैलूंचा अभ्यास केला आणि 1898 मध्ये प्रिनेटी, स्टुचीसोबत ‘बुगाटी टाईप 1’ तयार केली.

त्याच्या या प्रयोगाल चांगलाच प्रतिसाद मिळाला. मग काय एकदा स्पीड मिळाला आणि बुगाटी थांबलीचं नाही.

काउंट गुलिनेलीच्या आर्थिक सहाय्याने बुगाटीने टाइप 2 दुसरं मॉडेल विकसित केलं. जिला 1901 मिलान व्यापार मेळाव्यात पुरस्कारही मिळाला.

या गाडीच्या डिझाईनने बॅरन एड्रियन डी टर्कहेमचेही लक्ष वेधून घेतले, ज्याने बुगाटीला नीडरब्रोनमधील त्याच्या लोरेन-डायट्रिच कार कारखान्यात येऊन ऑटोमोबाईल डिझाइन करण्याची संधी दिली.

फ्रँको-प्रशियन युद्धानंतर डी डायट्रिचला दोन वेगवेगळ्या देशांतील दोन कार कारखान्यांसह विभागले गेले होते. त्यातलं एक म्हणजे निडरब्रोन प्लांट जिथं बुगाटी तयार होत होती. जो 1871 पासून जर्मनीचा भाग होता, नंतर 1919 मध्ये ते फ्रेंचमध्ये विलीन झाले.

दरम्यान, 1902 ते 1904 पर्यंत, डी डायट्रिचने आपली टाइप 3/4 आणि टाइप 5/6/7 लाँच केली. जी त्यावेळी “डी डायट्रिच, लायसन्स बुगाटी” या नावाने ओळखली जायची.

डी डायट्रिचसाठी काम करत असताना बुगाटी एमिले मॅथिसला भेटले. दोघे आधी मित्र आणि नंतर बिजनेस पार्टनर बनले. त्यांनी स्वतःची ऑटोमोबाईल कंपनी तयार करण्यासाठी 1904 मध्ये डी डायट्रिच सोडले, ज्याची ओळख “मॅथिस-हर्मीस (लायसन्स बुगाटी)” या नावाने झाली.

ही पार्टनरशीप 1906 पर्यंत चालली त्यानंतर दोघांनी आपापला वेगळा मार्ग निवडला. बुगाटीने इलकिर्च-ग्रॅफेनस्टाडेन येथे एक “रिसर्च सेंटर” स्थापन केले. त्यांनी तिथ अनेक प्रोटोटाइप तयार केले.

मूळच्या इटलीच्या असणाऱ्या बुगाटीने 1909 मध्ये आपली ऑटोमोबाईल कंपनी ऑटोमोबाइल्स ई. बुगाटीची स्थापना केली.

प्रॉडक्शनच्या आपल्या काळात बुगाटीच्या गाड्या सगळ्यात फास्ट, आलिशान आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत कार म्हणून ओळखल्या जायच्या.

1907 मध्ये बुगाटी यांची ड्युट्झसह उत्पादन संचालक (“डायरेक्टर डेस फॅब्रिकेशन”) म्हणून नियुक्ती झाली. येथे त्याने टाइप 8/9 ची रचना केली. ड्यूट्झ येथे नोकरी करत असताना, बुगाटीने त्याच्या घराच्या तळघरात टाइप 10 बांधला. 1913 मध्ये, बुगाटीने टाइप 19 ही एक छोटी कार डिझाइन केली.

पहिल्या महायुद्धात दरम्यान बुगाटीने विमानाच्या इंजिनांची रचना केली, विशेषतः काही प्रमाणात बरोक 16-सिलिंडर U-16, जे कधीही मोठ्या संख्येने बांधले गेले नव्हते आणि ते अगदी मोजक्या विमानांमध्ये बसवले गेले. युद्धांच्या दरम्यान बुगाटीने ऑटोराईल बुगाटी नावाची एक यशस्वी मोटारवर चालणारी रेल्वे कारचे प्रॉडक्शन केले, आणि मॉडेल 100 विमान तयार करण्यासाठी सरकारी करार जिंकला.

दरम्यान, 11 ऑगस्ट 1939 रोजी बुगाटीचा मुलगा,जीन, वयाच्या 30 व्या वर्षी मोलशाईम कारखान्याजवळ बुगाटी टाईप 57 टँक बॉडी रेस कारची चाचणी घेत असताना ठार झाला. त्यानंतर, कंपनीचा व्यवसाय कमी होऊ लागला. कंपनीने मालमत्तेवरील नियंत्रण गमावले.  

युद्धादरम्यान, बुगाटीने पॅरिसमधील लेव्हलॉईस येथे नवीन कारखान्याची योजना आखली आणि नवीन कारच्या सीरीज डिजाईन केल्या.

बुगाटीची ग्राहक संबंधांची संकल्पना देखील काहीशी वेगळी आहे. एकदा एका ग्राहकाने तक्रार केली की, आपली कार थंडीत लवकर सुरू होत नाही. यावर कंपनीकडून सांगण्यात आले की, “सर! जर तुम्हाला टाइप 35 परवडत असेल तर तुम्ही नक्कीच गरम गॅरेजची गाडी घेऊ शकता!”

असाच आणखी एक किस्सा म्हणजे एका ग्राहकाने मॉडेलमधील ब्रेकबद्दल तक्रार केली यावर कंपनीने सांगितले,

“आम्ही आमच्या गाड्या पळवण्यासाठी बनवतो, थांबण्यासाठी नाही!”

आणि मुख्य म्हणजे बुगाटी हा सल्ला मागच्या १११ वर्षांपासून आपल्या ग्राहकांना देत आहेत. 2000 मध्ये त्यांना ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. एकूणच बुगाटी कार लव्हर्सच्या मनावर नेहमीचं आपली वेगळी छाप सोडते आहे.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.