सिंगापूरमध्ये सुद्धा एका मेट्रो स्टेशनचे नाव ‘धोबीघाट’ आहे

१३ डिसेंबर रोजीचा कौन बनेगा करोडपतीचा एपिसोड बघितलाय का ? बघितला असेल तर नक्कीच एक नाव तुमच्या लक्षात राहीलं असेल. या एपिसोडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे, ‘धोबीघाट’.

त्याच झालं असं कि, एक प्रश्न केबीसीमध्ये विचारण्यात आला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांमध्ये भारताचे आणि तसेच भारतातील कोणत्याही शहराचे नाव नव्हते. 

तो प्रश्न असा होता कि, कोणत्या शहरातील मेट्रो रेल्वे सिस्टीममध्ये लिटिल इंडिया, चायना टाइम, कॅश्यू (काजू) आणि धोबी घाट नावाची स्टेशन आहेत? आणि यासाठी चार पर्याय आहेत. क्वालालंपूर , हाँगकाँग, सिंगापूर आणि बँकॉक. 

dhoby ghaut: धोबी घाट स्टेशन कहां हैं? जवाब भारत नहीं, सिंगापुर है, जिसकी कहानी है बड़ी दिलचस्प - dhoby ghaut metro station in singapore kaun banega crorepati 13 viral question ...

आता कुणीही हि नावांपैकी धोबीघाट नाव पाहिलं तर म्हणेल कि, यातला धोबीघाट हा तर भाताशी संबंधित शब्द आहे आणि चायना टाईम हे नाव चीनशी संबंधित आहे…त्यामुळे कुणीही म्हणेल कि धोबीघाट हे भारतसोडून बाहेर कसे काय आहे ??

हो वास्तविक धोबीघाट नावाचं मेट्रो आणि बाकीचेही ही तीन स्थानके सिंगापूरमध्ये आहेत….पण त्यातल्या स्थानकाचे नाव धोबीघाट कसे पडले??? त्यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 

पहिल्यांदा हाच विचार डोक्यात येतो कि, कि भारतातलं धोबी घाट हे नाव सिंगापूर ला गेलं ?

खरं सांगायचं तर सिंगापूरमधील या स्थानकाचे नाव धोबी समाजामुळे प्रसिद्ध झालेले आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला, १८१९ मध्ये धोबी पहिल्यांदा सिंगापूरला पोहोचला. या वॉशरमनना म्हणजेच धोब्यांना ब्रिटिश- भारतीय सैनिकांनी सिंगापूरला आणले होते. ब्रिटीशांनि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना जरी आणलं तरी या धोब्यांनी सिंगापूरच्या लोकांसाठी सेवाही देण्यास सुरुवात केली होती.

असंही सांगितलं जातं कि, या धोब्यांनी सिंगापूरच्या लोकांची इतक्या मनापासून सेवा केली की सिंगापूरचे लोकं त्यांच्यावर प्रभावित झाले.

सिंगापूरमध्ये मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम अंतर्गत भूमिगत स्थानकाच्या बांधकामादरम्यान, १९८७ मध्ये एका स्थानकाचे नाव धोबीघाट ठेवण्यात आले. एका अहवालानुसार, धोबीघाट नावाचा परिसर सिंगापूरचा वारसा म्हणून ओळखला जाऊ लागला होता. हा भाग मोठ्या व्यापारी समुदायाचे क्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. 

सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर आणि सिंगापूरमधील भारतीयांचे लेखक राजेश राय यांच्या अभ्यासानुसार, सुरुवातीला भारतातील धोबी स्वच्छ पाण्याच्या नदीजवळ राहत होते, म्हणूनच आज याला धोबी घाट एमआरटी स्टेशन म्हणतात.

WhatsApp Image 2021 12 21 at 2.02.03 PM

हि स्वच्छ पाण्याची नदी म्हणजे, सुंगाई बेरस बाशा असं त्या नदीचं नाव होतं. सुंगाई बेरस बाशा याचा मलय भाषेत अर्थ म्हणजे, ‘ओल्या तांदळाची नदी’ असा होतो. ओले तांदूळ या नदीच्या काठी बोटीने आणले जायचे आणि नंतर वाळवले जायचे म्हणून त्याला असे नाव देण्यात आले. 

याच नदीच्या काठावर सिंगापूरचे धोबी राहत होते आणि त्यांचे काम करत होते. ही नदी आता अस्तित्वात नसली तरी, सिंगापूरचे ब्रिटिश संस्थापक थॉमस स्टॅमफोर्ड रॅफल्स यांच्यानंतर हा परिसर स्टॅमफोर्ड कालवा म्हणून ओळखला जातो.

सिंगापूरला गेलेले हे धोबी बिहार, उत्तर प्रदेश आणि मद्रास इथले होते.

इंग्रजांनी सिंगापूरला नेलेले धोबी बिहार आणि उत्तर प्रदेशातील होते. यांशिवाय मद्रासमधील धोबीही मोठ्या संख्येने होते. यामुळेच याला धोबी समाजाचे नाव देण्यात आले आणि तमिळमध्ये या भागाला वनन थेरूवू असेही म्हटले जातं. आज हा भाग ऑर्चर्ड रोडवरील शॉपिंग डिस्ट्रिक्टचा भाग असल्याचं सांगितलं जातंय.

अशाप्रकारे भारतीय धोब्यांच्या सेवाप्रीत्यर्थ हे नाव देण्यात आले आहे. आजच्या काळात या परिसरात काय धोबीघाट नाही, पण एक आठवण म्हणून सिंगापूरवाल्यांनि हे नाव तेथील मेट्रो स्टेशनला दिले आहे. त्याला आजही धोबी घाट मेट्रो स्टेशन म्हणून ओळखले जाते…त्यामुळे तुम्ही जरी सिंगापूर ला ट्रीपला जाल तर तुम्ही या धोबी घाट मेट्रो स्टेशनला नक्कीच भेट द्या..

 हे हि वाच भिडू :

Web title: Singapore : Singapore has metro station name dhobi ghat

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.