रेसर पंडित भीमसेन जोशी म्हणाले, “घाबरू नका लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही”
रेसर पंडित भीमसेन जोशी म्हणाले, “घाबरू नका लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही”.
मी पण संपले। झालो विश्वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा।।
विंदा करंदीकर यांच्या या ओळी होत्या त्या पंडित भीमसेन जोशी यांच्यासाठी. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, अनेकदा अडचणीच्या काळात पंडित भीमसेन जोशी यांचा आवाज त्यांना बळ देत राहिला. हिंदूस्तानी शास्त्रीय गायनातील ख्याल गायकीचा राजा म्हणून पंडित भीमसेन जोशी यांना ओळखलं जातं. किराणा घराण्याचे वारसदार असणाऱ्या पंडित भिमसेन जोशी यांना शास्त्रीय गायनाला जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी ओळखलं जातं.
पंडित भीमसेन जोशी यांनी वयाच्या १२ व्या वर्षी संगीत शिक्षण घेण्यासाठी घर सोडले. उपाशी पोटी प्रवास करुन त्यांनी गायनविद्या शिकली. रामभाऊ कुंदगोळकर(सवाईगंधर्व) यांच्याकडे तालीम घेतली. १९४६ साली हिराबागेत पहिल्यांदा त्यांची जाहिर मैफिल झाली. त्यानंतर हा अनमोल हिरा भारतीयांच्या मनावर अधिराज्य करु लागला.
पंडित भीमसेन जोशी यांच नाव ऐकलं की आपणाला डोळ्यासमोर हेच सर्व येत. पण पंडित भीमसेन जोशी यांना एका वेगळ्या गोष्टीसाठी देखील ओळखलं जात. ते म्हणजे “रेसर”. अर्थात कार चालवण्याच्या त्यांच्या खास स्टाईलसाठी व ती तितक्याच ताकदीने चटकन दूरुस्त करण्यासाठी देखील.
नुसता नवीन कार घेण्याचा शौक नाही तर कार दुरूस्त करण्याची कला, आणि ती स्पीडमध्ये पळवण्याची कला देखील पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे होती.
याच एक किस्सा सुधिर गाडगीळ यांनी सांगितला आहे.. संदर्भात एक किस्सा सुधिर गाडगीळ यांनी सांगितला आहे..
ते सांगतात,
पंडीतजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरगाव सोडण्यात जसा त्यांच्या हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यात ही ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्ट ची माहिती पंडीतजींना असायची. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती गॅरेजवाल्याला ते अगदी बिनचुक सांगत असत.
एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते, पंडीतजींनी नुकतीच नवीन मर्सिडिज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडिज काढली आणी म्हणाले ‘बसा’. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फुल स्पीड मध्ये सोडली होती.
तासाभरात ते कोरेगावभिमाला पोहोचले. समोर नदीवरचा पुल होता. पलीकडून एक ट्रक येताना दिसत होता. पुल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता. गाडगीळांनी न राहवून ‘हुश्श’ केले.
त्यावर पंडितजी म्हणाले,
घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.
हे ही वाचा.
- जगजितसिंह विरुद्घ पुरुषोत्तम जोशी !
- संगीत जर धर्म असेल तर रफी त्याचा देव होता.
- लोक म्हणतात हा रफी आणि किशोर पेक्षा मोठा गायक आहे.