व्हेलेन्टाईन डे दिवशी सिंगल लोक या ६ पद्धतीने दिवस ढकलतात..

जिथे कमी तिथे आम्ही, हा आमचा बाणा आहे. बाणा म्हणजे कसा कसलाही लोड असला तर बोलभिडू कार्यकर्ते एका का होईना आर्टिकल तोंडावर फेकून मारणाराच. समोरचा असा काही तो आर्टिकल वाचत बसणार की समाजातील दूख:, चिंता, दर्द विसरून जाणार. बर त्याला एक्स्ट्रॉ दूख: हवच असेल तर त्याची सोय देखील बोलभिडू करुन देतच असते.

पण आजचा विषय डिपय.

म्हणजे आज तुमच्या कामाला आम्ही येवू शकत नाही. आजचा दिवस आहे व्हॅलेन्टाईन डे चा. आणि आज काहीही झालं तरी हा सण साजरा करायला जोडीदार लागतोच. म्हणजे जगातल्या अशा खूप कमी गोष्टी आहेत त्या जोडीदाराशिवाय पुर्ण होत नाहीत. 

व्हॅलेंन्टाईन डे देखील यातलीच एक गोष्ट. इथे फक्त आणि फक्त जोडीदारच लागतो. म्हणजे कस नागपंचमीला नाग लागतो, बैलपोळ्याला बैल लागतो, ख्रिसमसला सांता लागतो तसच व्हॅलेन्टाईना जोडीदार लागतो. आत्ता तुम्ही हेडलाईन वाचून आत आलाय म्हणजे एकतर तुम्ही सिंगल असाल. आणि नसला तर तुम्हाला सिंगल होण्याची घाई झालेय आणि हे देखील नसेल तर दूसऱ्यांची मज्जा बघणारं तुमचं व्यक्तिमत्व निळू फुले टाईप आहे. 

तर या पवित्र दिवसाला वंदन करुन सुरू करु, व्हॅलेन्टाईन डे रोजी सिंगल लोक काय करतात.? 

१) दिवसभर झोपून राहणं. यू ट्यूब पासून नेटफ्लिक्स पाहणं. 

सर्वात मोठ्ठा ऑप्शन हाच असतो. म्हणजे सोशल मिडीयावर तुम्ही गेलात तर आपल्या Ex चा फोटो चुकून पाहण्याची वाईट वेळ या पवित्र दिवशी येवू शकते. म्हणून अनेकजण काय करतात तर युट्यूब चालू करतात. दिवसभर यु ट्यूबवर काय पहायचा असा प्रश्न असतोच. आमच्या मते अशा वेळी तुम्ही गुंडा सारखे सिनेमे पहावेत. अजय देवगण सारखे दिलजले सिनेमे पाहून पुन्हा अती दूखात जाण्यात मज्जा नसते.

त्याहून अधिक अशा वेळी मिथून कामी येवू शकतो. बर तुम्ही स्वत:ला शहरी अशा निमशहरी पुढारलेले समजून घेत असलात तर नेटफ्लिक्सचा ऑप्शन आहेत. हाऊस ऑफ कार्ड्स पासून नार्कोस पर्यन्त बरेच मटरेल आे जे तुम्हाला भावनिक करणार नाही. इंटरनेट सेवा नसेल तर सेव्ह केलेले गेम ऑफ थ्रोन्स पहायला सुरवात करावी. यामुळे काय होतं. तर पुढचा व्हॅलेन्टाईन आला तरी सिरीज काय संपत नाही. उत्तम फरक पडू शकतो. 

२) दिवसभर आरश्यात पहात राहणं. (सिंहावलोकन) 

वास्तविक या मुलांना सिंगलपणातले निर्लज्जम सदासुखी म्हणलं जातं. हि मुले काय करतात तर दिवसभर आरश्यात निरखत बसतात. बर आरशात पाहताना हे अजिबात आपण सिंगल का राहिलो याचा विचार करत नाहीत ते फक्त आणि फक्त हा दिवस स्वत:ला पहात एॅन्जाय करतात. बरीच मुल या प्रकाराला सिंहावलोकरन म्हणतात. आत्ता तुम्ही म्हणाल अस काही नसतय तर भावांनो, असच असतय.

३) स्टॉर्ट अप च्या आयडीयावर वेळ घालवणे. 

एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रातल्या कोपऱ्याकोपऱ्यातला विद्यार्थी MPSC, UPSC करत होता. आजही ती मुलं आहेत पण प्रकाशाच्या वेगाहून जरा कमी वेगाने ते बाहेर देखील पडत आहेत. आत्ता हि मुलं कशाचा मार्गावर आहेत तर स्टॉर्ट अप. म्हणजे केल्या काही वर्षात महाराष्ट्रात आलेले चुलीवरची मिसळ अथवा तंदूर चहा हे अशाच स्टार्टअप च उदाहरण. त्यातही इंजनिरिंग केलेले विद्यार्थी असाल तर पिचर सारख्या सिरीज पासून तुम्ही स्टार्टअप सुरू करता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तर असो आजचा हा पवित्र दिवस आपल्याला तिने “कोले” केलं आणि आत्ता आपल्याकडे स्टार्टअप शिवाय पर्याय नाही हे समजून मस्त आयडिया लावाव्यात.

स्वत: आमच्या मालकांच अस मत आहे की दूखात जास्त सुचतं. त्यामुळे आज तुम्हाला जास्त पर्याय सुचू शकतात. व्हॅलेंन्टाईन डे ला स्टार्टअप वर वेळ खर्च करणारे मोक्कार आहेत. आपणही सहभागी होवून यास हातभार लावू शकता. 

४) ट्रेकिंग ट्रेकिंग ट्रेकिंग. 

ट्रेकिंगचा अर्थ पर्वती किंवा सिंहगड नाही. जाता जाता लोणावला, जोतिबा किंवा सावर्डेचा डोंगर देखील नाही. अजिंठा किवा रामटेकडी देखील नाही. इथे ट्रेकिंगचा अर्थ आपल्या जवळपास एकही माणूस दिसणार नाही अशा ठिकाणी जाणं. बरेच जण या दिवशी फिरायला म्हणून जातात. वास्तविक हा प्रकार भूमीगत होण्याचा असतो. या दिवशी आपल्याला कोणी ओळखणार नाही अशा ठिकाणी जायचं असत. काय माहिती असाच एकांत शोधण्याच्या नादात एखादी तिथे मिळून देखील जाईल. 

५) बजरंग दल सारख्या संघटनांमध्ये सहभागी होणे. 

हा सर्वात चांगला उपाय असतो. कालच्या एका बातमीनुसार यावर्षी व्हॅलेन्टाईन डे ला विरोध करण्यासाठी जे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत त्यातील ७० टक्के लोक इंजनियर आहेत. थोडक्यात बऱ्याचशा मुलांकडून हा उपाय सर्वात निखळ आनंद मिळवून देत असणारा आहे असा संशय येतो. म्हणजे बघा, ककककिरण मेरी नहीं हो सकतीं तो वो ओंर किसी की भीं नहीं हो सकती. याच अॅटिट्यूड मध्ये अशा संघटनांमध्ये सिंगल लोक सहभागी होवून काम फत्ते करतात. 

६) उपाशी मित्रमंडळ घेवून चौकाचौकातून बाहेर पडणे. 

खरा टेरर हाच. हे सिंगल लोक अशा दिवसांना विरोध करत नाहीत. पण हा दूसरीकडे ते सपोर्ट पण करत नाहीत. म्हणजे सध्या मनसेचं इंजिन जस आहे ना अगदी तस. सोबत आहे म्हणायला आहे. तर अशी मुलं घोळक्याने रस्त्यांवर, मॉलमध्ये येतात. सगळीकडे गुलाबी वातावरण आहे याचा त्यांच्यावर काहीही फरक पडत नसतो. त्यांना फक्त या जगात आपण आहोत हे सिद्ध करायचं असत.

मग ते घोळक्याने फिरतात, शॉपिंग करतात आणि कुणाच्याही भावना न दुखावता घरी एकटे जावून अंधाऱ्या रात्री एक थेंब रडतात. वास्तविक हा प्रकार सर्वात सुंदर असतो. इथे लिमिटेड स्कोप देखील मिळू शकतो. 

बाकी हे झालं बोलभिडू कार्यकर्त्यांनी सिंगल पोरांना दिलेला धीर, तूम्ही सिंगल असाल? तुमचा मित्र सिंगल असेल तर मोठ्या मनाने शेअर करा. लाजू नका. लक्षात ठेवा सिंगल असणं हा काही घटनात्मक गुन्हा नाही. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.