बादल गाडी फ्लॉप झाली पण भारताची पहिली तीन चाकी कार म्हणून तिला कायम ओळखलं जाईल

बाकी काही असो पण आपल्या देशाला गाड्यांचं वेड जबरदस्त आहे. सतत काही ना काही नवनवीन गाड्या आणि त्याचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये भारतातल्या गाड्यांच्या कंपन्या उतरवताना दिसतात. जसा बाजारपेठेत हिट झालेल्या गाड्यांच्या चर्चा होतात अगदी तशाच चर्चा फ्लॉप झालेल्या गाड्यांच्याही होतात. भारतात काही गाड्या या इतक्या वाईट पद्धतीने फ्लॉप झाल्या कि विचारता सोय नाही. तर अशाच एका गाडीचा आजचा किस्सा जी एकेकाळी भयंकर क्रेझ घेऊन आणि बाजारात फ्लॉप ठरली.

सीपानी ऑटोमोबाईल्स लिमिटेड हि बँगलोरमध्ये १९७३ साली कार मॅन्युफॅक्चअरिंगचा व्यवसाय करायची. १९७५ साली भारतीय बाजारपेठांमध्ये कार कंपन्या पदार्पण करत होत्या तर काही अगोदरपासूनच होत्या पण त्याही बोटावर मोजता येतील इतक्या तुरळक होत्या. 

याच काळात भारतीय कार बनवणाऱ्या सीपानीने एक नवीन कार बाजारात लाँच केली. हि एक तीन चाकांची गाडी होती. या तीन चाकी गाडीला नाव देण्यात आलं होतं सीपानी बादल.

तीन दारं आणि ऑटो रिक्षा सारखं हे मॉडेल बाजारात प्रचंड गाजलं. सीपानी बादल बाजारात येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यावेळच्या कार गाडयांना सोपा आणि पर्यायी वाहन पर्याय म्हणून सीपानी बादलची एंट्री झाली होती.

सीपानी कारला ब्रिटनची कंपनी रिलायंट मोटर्सच्या मदतीने बनवण्यात आलं होतं. सीपानी बादल दिसायला एकदम विचित्र होती आणि एक वेगळंच काहीतरी मॉडेल बाजारात आल्याने याच कारची सगळीकडे चर्चा होती. भारतात लाँच झालेल्या सीपानी बादलला फॉरेनची मंडळी प्लास्टिकचं डुक्कर म्हणायचे. पहिल्या वर्षी हि कार १५० युनिट पर्यंत विकली. या कारचं इंजिन सुद्धा दुर्मिळ होतं.

आता सीपानी बादल मार्केटमध्ये बदल घडवायला आली तेही नव्या लूक मध्ये पण या नव्या लूकची चर्चा सीपानी बादलची विक्री कमी करण्यास कारणीभूत ठरली. थ्री व्हीलर कार हि नवीन कन्सेप्ट लोकांना फारशी भावली नाही. या कारमध्ये अनेक टेक्निकल चुका होत्या, मॉडेलपासून ते इंजिनपर्यंत सगळ्यात काहीतरी दोष दिसू लागला होता. 

हि कार सरळ रस्त्यावर किंवा उतारावर तोल सांभाळू शकत नसे आणि ती सरळ खाली जात असे, याचे दुष्परिणाम गाडीत बसलेल्या लोकांना चांगलेच भोवले. अगदी जीवावर बेतेल इथपर्यंत काही प्रकरण गेले होते. कारमध्ये वजन ठेवण्याचं संतुलन गड्बडल होतं आणि जास्तीचं वजन झाल्यावर गाडीचा तोल जायचा. सीपानी बादल कारची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून कंपनीने अनेक सेलिब्रिटी लोकांना कारचं प्रमोशन करण्यासाठी आणलं होतं.

इतके सारे प्रयत्न आणि कन्सेप्ट सीपानी बादल टिकवण्यासाठी झाले मात्र हि कार काय बाजारात टिकली नाही. दिसायला विचित्र आणि टेक्निकल दोष सोबतच कमी खप झाल्याने या कारचं प्रोडक्शन बंद करण्यात आलं. सीपानी बादलला ४ सीटरचा आकार देण्यात आला होता पण फक्त बॉडीचं कारची होती, आतमधून या सीपानी बादलमध्ये कारचे फीचर्स नव्हते, पुढच्या सीटवर बसणाऱ्या लोकांना दोन दरवाजे आणि मागे बसणाऱ्या लोकांना एकच दरवाजा अशी याची विभागणी करण्यात आली होती. 

या थ्री व्हीलर कारमध्ये २०० cc चं पेट्रोल इंजिन लावण्यात आलं होतं जे तेव्हा त्याकाळातल्या स्कुटरमध्ये वापरलं जायचं. पुढे सीपानी बादल बंद पडली आणि परदेशात याच धर्तीवर सीपानी डॉल्फिन सुरु झाली. पण या कार कंपन्यांमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त चर्चा हि सीपानी बादलची झाली होती.

ज्या पद्धतीने सीपानी बादलने मार्केटमध्ये आपली हवा केली त्यापेक्षा वाईट पद्धतीने या गाडीवर फ्लॉप कारचा शिक्का बसला आणि शेवटी हि कार मार्केटमधून बाद झाली. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.