फक्त ३ ओव्हरमध्ये शतक ठोकणारा तो क्रिकेटचा ओरिजनल डॉन होता…

क्रिकेट जेव्हापासून सुरु झालंय तेव्हापासून तो खेळ रेकॉर्ड ब्रेक करण्याचा आणि नवीन इतिहास रचण्याचा खेळ झाला. या खेळामुळे जगभरातले टॉप प्लेअर आपल्याला माहिती झाले. शतकं, विकेट्स, कॅचेस अशा सगळ्या प्रकारात रेकॉर्ड होऊ लगे. कधी हे रेकॉर्ड मोडले तर कधी हे रेकॉर्ड कुणाकडूनही मोडले गेले नाही. त्यात असाच एक रेकॉर्ड आहे क्रिकेटच्या ओरीजनल डॉनचा तो आपण जाणून घेऊया.

सचिन तेंडुलकर ज्याला लेजेंड खेळाडू मानतो तो खेळाडू म्हणजे सर डॉन ब्रॅडमन. फक्त ऑस्ट्रेलियापुरतं मर्यादित न राहता ब्रॅडमन हे जागतिक दर्जाचे आयकॉनिक प्लेअर बनले होते. क्रिकेट खेळणाऱ्या आणि पाहणाऱ्या प्रत्येकाच्या आठवणीतला खेळाडू म्हणून सर डॉन ब्रॅडमनकडे पाहिलं जातं. अनेक रेकॉर्डचा बादशाह असलेले सर डॉन ब्रॅडमन यांनी एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता. 

सर डॉन ब्रॅडमन यांच्या नवे असलेला एक दर्जेदार रेकॉर्ड म्हणजे त्यांनी फक्त ३ ओव्हरमध्ये ठोकलेलं शतक. ब्रॅडमन यांच्या करियरमधला पीक पॉईंट म्हणून हे रेकॉर्ड ओळखलं जातं. साल होतं १९३१ चं. त्यावेळी सर डॉन ब्रॅडमन हे ब्लॅकहिथ इलेव्हन कडून खेळत होते. या संघाकडून खेळताना फक्त २२ बॉलमध्ये ब्रॅडमन यांनी शतक लगावलं होतं. फक्त तीन ओव्हर खेळून त्यांनी हि सेंच्युरी पूर्ण केली होती.

त्यावेळी प्रत्येक ओव्हरमध्ये ८ बॉल असायचे आणि ब्रॅडमनने २४ पैकी २२ बॉल खेळला होता. पहिल्या ओव्हरमध्ये ब्रॅडमनने ३३, दुसऱ्या ओव्हरमध्ये ४० आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये २७ धावा ब्रॅडमन यांनी चोपल्या होत्या.

या इनिंगमध्ये ब्रॅडमन यांनी १४ षटकार आणि २९ चौकार लगावले होते आणि २५६ धावांची जोरदार बॅटिंग केली होती. सिक्स आणि फोरमध्ये जवळपास २०० धावा ब्रॅडमन यांनी कव्हर केल्या होत्या.

हे शतक यासाठी फेमस झालं कि ते फक्त १८ मिनिटांमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांनी ठोकलं होतं. हे रेकॉर्ड इतिहासात अजरामर झालं. सर डॉन ब्रॅडमन हे शाळकरी खेळाडू असल्यापासूनच आक्रमक बॅटिंग करायचे. आपल्या करियरमध्ये ब्रॅडमन यांनी ११७ शतकं असल्याचा माईलस्टोन रेकॉर्ड बनवला. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ब्रॅडमन यांनी शतक लगावलं होतं.

१९२०-२१ साली बॉवरल स्कुलकडून खेळताना नाबाद ११५ धावांची खेळी सर डॉन ब्रॅडमन यांनी केली होती. या मॅचनंतर सर डॉन ब्रॅडमन यांना कुणीही रोखू शकलं नाही. आक्रमक बॅटिंग आणि चौकार षटकारांची बरसात हे ब्रॅडमन यांच्या खेळीचं वैशिष्ट्य होतं. 

इंग्लंडविरुद्ध सर डॉन ब्रॅडमन यांची बॅट जरा जास्तच चालायची. इंग्लंडविरुद्ध ब्रॅडमन यांनी ५ हजार २८ धावा बनवल्या. कुठल्याही एका टिमविरुद्व इतक्या धावा फटकावणं ब्रॅडमन खेरीज कुणालाही जमलं नाही. सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिन तेंडुलकर हा आपल्यासारखा खेळतो आणि मला त्याच्यात माझी झलक म्हणत सचिनचं कौतुक केलं होतं.

सर डॉन ब्रॅडमन यांना हिट विकेट करणारे फक्त एकच खेळाडू होते आणि ते म्हणजे भारताचे लाला अमरनाथ. जगभरातून सर डॉन ब्रॅडमन यांना भरपूर प्रेम मिळालं. सर डॉन ब्रॅडमन नंतर हे इतकं प्रेम फक्त सचिन तेंडुलकरलाच मिळालं. ऑस्ट्रेलिया संघासाठी मोलाचं योगदान सर डॉन ब्रॅडमन यांचं आहे आणि क्रिकेट विश्वातील मानाचं पान हे सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. 

सर डॉन ब्रॅडमन यांची प्रसिद्धी इतकी होती कि २७ वर्षानंतर जेव्हा नेल्सन मंडेला तुरुंगातून सुटले तेव्हा ते म्हणाले होते ब्रॅडमन अजूनही क्रिकेट खेळतोय का ? हाच जगप्रसिद्ध होण्याचा क्षण ब्रॅडमन यांच्या आयुष्यात आला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.