ब्रिटिशराज मधल्या लष्करप्रमुखांनी काश्मीरबद्दल जे लिहिलंय ते सिक्रेट का ठेवलं जातंय?

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि १५ जानेवारी रोजी फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांनी    ब्रिटीशचे शेवटचे ब्रिटीश कमांडर जनरल रॉय बुचर यांच्याकडून भारतीय लष्करात कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. आणि याच दिवसापासून दरवर्षी १५ जानेवारी रोजी ‘आर्मी डे’ साजरा केला जातो. जनरल सर रॉय बुचर हे एक ब्रिटीश सैनिक होते जे स्वातंत्र्यापर्यंत भारतीय लष्कराचे सर्वोच्च पदभार सांभाळणारे भारतीय लष्कराचे शेवटचे कमांडर-इन-चीफ होते.

ब्रिटिश लष्करप्रमुख रॉय बुचर यांचे जम्मू -काश्मीरबद्दलचे सखोल लेखन जे जम्मू -काश्मीरचे भारतामध्ये विलीनीकरण झाले यासंबंधित असलेल्या लेखनाचा हा दस्तऐवज आहे. जो आजपर्यंत गुप्तपणे ठेवला गेला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने या महिन्यात एका आदेशात म्हटले आहे की, भारतीय लष्कराचे प्रमुख रॉय बुचर यांनी नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला दिलेल्या दस्तऐवजाचा खुलासा केला आहे. राष्ट्रीय हितामध्ये बसणारेच हे लिखाण असल्याचे सांगितले आहे मात्र  

सीआयसीने ही कागदपत्रे उघड करण्याचे आदेश अद्याप तरी जारी केलेले नाहीत.

माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी RTI कार्यकर्ते व्यंकटेश नाईक यांना उत्तर देण्यापूर्वी, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीच्या केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याला निर्देश दिले की,  “उच्च अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित करा आणि यासंदर्भात आवश्यक परवानगी घ्या. तसेच त्यांनी  NMML कडून पारदर्शकता कायद्यांतर्गत कागदपत्रे देखील मागितली आहेत.

हा दस्तऐवज अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण त्यात विलीनीकरण कराराबद्दल सविस्तरपणे विचार मांडल्याचे सांगितले जाते, ज्या दस्तऐवजावर २६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू -काश्मीर संस्थानचे शासक महाराजा हरिसिंग यांनी स्वाक्षरी केली होती.

RTI कार्यकर्ते व्यंकटेश नाईक यांनी बुचरच्या या कागदपत्रे प्रकाशित करा अशी मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१६ मध्ये द वायर’ च्या एका लेखात, नाईक यांनी जम्मू -काश्मीर इन्स्ट्रुमेंट ऑफ अॅक्सेशनची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. २०१९ मध्ये त्यांनी दस्तऐवज समोर आणा अशी   मागणी करणारी आरटीआय याचिका दाखल केली होती. याच याचिकेला उत्तर देताना, एनएमएमएलचे सार्वजनिक माहिती अधिकारी, केंद्र सरकारच्या एजन्सींच्या निर्देशांचा हवाला देत म्हणाले की, कागदपत्रे सार्वजनिक करण्यावर बंदी असल्याचं सांगितलं आहे .

पण नाईक यांच्या प्रयत्नांना एक असं यश मिळालं आहे कि, त्यांना सर बुचर यांच्या मुलाखतीचा एक उतारा मिळालाय जो इतिहासकार आणि चरित्रकार बाळ राम नंदा यांनी घेतला होता. नाईक यांनी ह्यूमन राइट्स इनिशिएटिव्हसाठी लिहिलेल्या एका लेखात लिहिले कि, “सर रॉय बुचरच्या मुलाखतीचा उतारा हा जम्मू -काश्मीरमधील घडामोडींबद्दलच्या आठवणींवर आधारित आहे जो खूप मनोरंजक पद्धतीने लिहिला आहे तसेच बुचर यांनी भारताबद्दलचं त्यांचं प्रेम देखील केले आहे”.

जम्मू -काश्मीरमधील परिस्थितीवर बुचर यांनी त्यांच्या अनुभवांमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, याच उताऱ्यांचा आधार घेत नाईक यांनी त्यांच्या दाव्यांची पुष्टी केली. यातली एक महत्वाची कडी म्हणजे, बुचर यांनी दावा केला की त्यांच्याकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची काही पत्रे होती, जी त्यांनी एनएमएमएलला दिली होती.

बुचर यांच्या म्हणण्यानुसार, अखनूर आणि बेरीपट्टण पुलांवर सीमेपलीकडून पाकिस्तानच्या जबरदस्त तोफखान्यांनी केलेल्या गोळीबारामुळे पंतप्रधान नेहरू खूप अस्वस्थ झाले होते, त्यांनी बुचर यांना याला प्रतिक्रिया देता येतील का असं विचारलं. अशा स्थितीत प्रतिशोधात्मक आगीशिवाय कोणीही काही करू शकत नाही असं बुचर यांनी संगीतलं. तसेच बुचर यांनी नेहरूंच्या एका पत्राचा थेट उल्लेख केला, ज्यात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या समर्थित युद्धबंदीच्या भोवतालच्या अनिश्चिततेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या उताऱ्यानुसार नेहरूंनी १९४८ मध्ये बुचर यांना एक उत्तर दिले त्यात त्यांनी लिहिले कि, ‘संयुक्त राष्ट्र संघ काय प्रस्ताव मांडणार आहे हे मला माहित नाही. ते युद्धबंदीचा प्रस्ताव देऊ शकतात आणि मला याचा अंदाज आहे कि याबाबतच्या अटी काय असतील. युद्धबंदी नसेल तर… .तर आपल्याला पुढे जाऊन पाकिस्तानविरुद्ध लढावे लागेल आणि आपण त्यासाठी तयार असले पाहिजे असंही त्यांनी या पत्रात सुचवलं होतं.

मग बुचरने विस्ताराने या उताऱ्यात लिहिलेय कि, कसे त्यांना पुढे जाण्याचे आदेश दिले गेले आणि त्यांनी असाही दावा केला की त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ डग्लस ग्रेसी यांना त्यांच्या वतीने आदेश दिले होते आणि त्यांच्या उताऱ्यानुसार त्यांनी पाठवलेली हीच युद्धबंदीच्या सिग्नलची प्रत  NMML ला देण्यात आली आहे.

हे फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बुचर कोण आहेत?

३१ ऑगस्ट १८९५ रोजी जन्मलेल्या फ्रान्सिस रॉबर्ट रॉय बुचर यांचे शिक्षण प्रतिष्ठित स्कॉटिश खाजगी शाळेत एडिनबर्ग अकादमीमध्ये झाले, ज्या अकादमीच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये लेखक रॉबर्ट लुई स्टीव्हनसन, अभिनेता इयान ग्लेन आणि संगीतकार गाय बेरीमन यांचा देखील समावेश आहे.

लंडन गॅझेट लिस्टच्या संदर्भानुसार, बुचरची पहिल्या भारतीय महायुद्धादरम्यान १५ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रिटिश भारतीय सैन्यात नियुक्ती करण्यात आली होती आणि पुढच्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी त्यांना सेकंड लेफ्टनंट बनवण्यात आले. नंतर १९१६ मध्ये त्यांना सेकंड लेफ्टनंटपासून लेफ्टनंट म्हणून बढती देण्यात आली, हे राजपत्रातही नोंदवले गेले आहे. त्यांनी उत्तर-पश्चिम सीमा प्रांतात तैनात ब्रिटिश भारतीय सैन्याची एक बख्तरबंद रेजिमेंट, कॅनॉट्स ओन लान्सर्सची ३१ वी ड्यूक म्हणून जबाबदारी स्वीकारली. फाळणीनंतर ही रेजिमेंट पाकिस्तान लष्कराचा भाग बनली.

गॅझेट लिस्टनुसार दाखवतात की बुचरला हळूहळू इतर उच्च पदांवर बढती देण्यात आली. १९१८ मध्ये त्यांना कॅप्टन म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि १९२० मध्ये मिलिटरी क्रॉस देण्यात आला, कारण त्यांनी आणि लान्सर्सने १९१९ मध्ये तिसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धात भाग घेतला होता. दोन वर्षे ब्रिटीश सैन्याने चालवलेल्या स्टाफ कॉलेज या लष्करी प्रशिक्षण संस्थेत भाग घेण्यासाठी ते १९२६ मध्ये ते ब्रिटनला परतले.

या ट्रेनिंगनंतर ते दख्खन प्रदेशात ब्रिटिश भारतीय सैन्यात तैनात झाले आणि लेफ्टनंट-कर्नल या पदावर विराजमान झाले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा बुचरने भारतीय सैन्यासाठी आपली सेवा सुरू ठेवली परंतु १९४१ मध्ये काही काळ इराकमध्येही ते तैनात होते. हे  युद्ध संपल्यानंतर, बुचर यांची बंगाल आणि आसाम क्षेत्राचे कमांडिंग जनरल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि १९४६ मध्ये ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडर-इन-चीफ बनले.

स्वातंत्र्यानंतर, १९४८ मध्ये, त्यांना भारताचे दुसरे लष्करप्रमुख म्हणून बढती मिळाली. १९४९ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी या पदावर काम केले. ते लष्करातील शेवटचे ब्रिटिश प्रमुख कारण त्यानंतर त्यांनी के.एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरची त्यांच्या बद्दलची फार कमी माहिती इतिहासात नमूद आहे. १९७० मध्ये त्यांच्या आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्याशी झालेल्या बैठका वगळता बाकी काही फार संदर्भ सापडत नाहीत.

पण त्यांच्या आणि नेहरूंच्या पत्रव्यवहारामध्ये काय गुपितं दडलीत ती भविष्यात समोर येतील कि नाही याबद्दल कुणीही सांगू शकत नाही.

हे हि वाच भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.