राज ठाकरेंपासून MF हुसेन पर्यंत अनेकांना घडवणाऱ्या जे जे स्कुलला मोठे करणारे हात मराठी आहेत

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही देशातील नव्हे, तर जगातली एक प्रख्यात कलावास्तू. भारतातील चित्रकलेची आवड असणारे कित्येक तरुण तरुणी या संस्थेत प्रवेश घेण्याची स्वप्ने बघत असतात. असं काय स्पेशल आहे या महाविद्यालयामध्ये? चला जाणून घेऊ

जमशेदजी जीजीभॉय यांच्या सौजन्याने १८५७ .मध्ये ‘सर जमशेदजी जीजीभॉय स्कूल ऑफ आर्ट’ अर्थात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ ची स्थापना झाली.

ही मुंबईतली सगळ्यात जुनी कलाशिक्षणाची संस्था.  १९३५ मध्ये इथे ‘कमर्शियल आर्ट’चा विभाग सुरु झाला. १९३७ ते १९३९ च्या काळात एम. एम. आचरेकरांनी  या संस्थेचे उपसांचालक म्हणून सूत्र सांभाळली. स्वातंत्र्या आधीच्या  काळात जॉन ग्रिफिथ, सेसिल बनर्स, कॅप्टन ग्लॅडस्टन, सॅलोमन यांच्या प्रयत्नांतून पाश्चात्य अभिज्यात चित्रशैलीचा प्रभाव असलेली अकॅडमिक शैलीतील नामवंत भारतीय चित्रकार इथं तयार झाले. दादासासेब फाळके ते दीनानाथ दलालांसारख्या अनेक जुन्या काळातील चित्रकारांनी जे. जे. मधून शिक्षण  घेतलं होत.

शंकर पळशीकर मराठीतल्या दिग्गज चित्रकारांमधला  मोठा चेहरा. ज्यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातल्या साकोरीतला. १९४७ पासून ते ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये अध्यापक म्हणून काम करायचे. स्वातंत्र्या नंतरच्या काळात कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि समकालीन कलाप्रवाहाचं भान लाभवं. यासाठी प्रयत्नशील राहून अनेक आघाडीचे आधुनिक चित्रकार घडवण्याचं श्रेय पळशीकरांना दिल जात.  

पळशीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलाशिक्षणाच्या चौकटीत राहून सुद्धा आधुनिक व समकालीन कलाप्रवाहांचं भान देण्याचे प्रयत्न सतत सुरु ठेवलं. माधव सातवळेकर आणि पळशीकरांचे संबंध चांगलेच जवळचे  होते. १८६५ मध्ये कला संचालनालयाची स्थापना होऊन पुढे सातवळेकर यांची कलासंचालक म्हणून नियुक्ती झाली आणि १९६५ मध्ये पळशीकर जे. जे. चे डीन झाले. याच काळात कलाशिक्षणाचा पायाभूत अभ्यासक्रम अमलात आला आणि या दोघांच्या प्रयत्नातून जे. जे. ची उन्नती घडून आली.

त्याच्या डीन पदाच्या ७  वर्षाच्या कारकिर्दीत जे. जे. स्कूल’च्या कलाप्रवाहाला चालना मिळावी आणि म्हणूनच त्यांचा कार्यकाळ  जे. जे. च्या इतिहासातला ‘दुसरं सुवर्णयुग’ मानला जातो. 

पळशीकरांची शिकवण आणि आधुनिक चित्रकारांची घडण

पळशीकर विद्यार्थ्यांना घडवत असतानाच एक चित्रकार म्हणून स्वतःही घडत होते. त्यामुळे तय्यब मेहता, अकबर पदमसी, एम. एफ. हुसेन, मनु पारेख, लक्ष्मण श्रेष्ठ, जतीन दास या जे.जे. मधल्या किंवा बाहेरच्या चित्रकारांना  पळशीकरांबद्दल सदैव आदर राहिला. कलेबद्दलच्या मूलतत्वांचा आणि कलाभुनवाची जाण असलेला त्याच काळातील चित्रकारांमधला पहिला चित्रकार एस.एच. रझा यांनी पळशीकरांचा उल्लेख केलेला आहे.

पळशीकरांनी व्यक्तिचित्रणातल्या रूढ संकेतांच्या पलीकडं  जाऊन व्यक्तींच्या वैशिष्ट्यांचा शोध घेतला. त्यांच्यामते,  रंगाकारांच्या परस्परनात्यांच्या शोधाबरोबरच माणूसपणाची ओढ व्यक्तिचित्रणात दिसायला हवी. चित्रात प्रकाश हा कसा महत्वाचा घटक आहे आणि तो चित्रात कसा आणायचा हे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं. पळशीकरांवर लोक-कला, अजिंठ्याची भित्तीचित्र, अमृता शेरगील, त्यांचा प्रभाव होता.

सुरुवातीच्या  त्यांच्या चित्रात कथनात्मक शैली, मानवी आकृत्या आणि प्रतीकचिन्हांचा वापर दिसायचा. पळशीकर’प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप ‘ मधल्या कलाकारांसोबत होते, पण ते त्या गटात कधी सहभागी झाले नाही. त्यांनी आधुनिक कलतत्वांचा स्वीकार करताना भारतीय शैली सोडली नाही. डीन असताना ते ध्वनीचित्रांकडे वळले होते. तंत्र आर्टमधल्या बीजाक्षरांचा चिन्हात्मक वापर करून त्यांनी काही अमूर्त चित्र या काळात केली. त्यांची हि चित्र निओ- तांत्रिक शैलीतल्या चित्रांपेक्षा अधिक मूलगामी आणि जाणिवांचा नवा प्रदेश धुंडाळणी होती.

 जे. जे. चा विकास 

शिक्षक म्ह्णून पळशीकरांचं योगदान तेवढंच महत्वाचं होत. जे. बाहेरच्या कलाविश्वाचा, विविध शैलींचा विद्यार्थ्यांना परिचर व्हावा  म्ह्णून चित्रकारांची प्रात्यक्षिक ठेवण्याची पद्धत त्यांनी सुरु केली. एम. आर. आचरेकर, गोपाळ देऊस्कर, ए. ए. आलमेलकर अशा अनेक चित्रकारांची काम करण्याची पद्धत  विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रत्यक्ष पाहता आली. जे. जे. च्या संग्रहातली लघुचित्रशैलीतली चित्र विद्यर्थ्यांना पाहता यावीत म्हणून त्यांनी वातानुकूल दालनाची व्यवस्था करून घेतली.

पळशीकरांच्या काळात वार्षिक स्नेहसंमेलनात  संगीताची मैफिल असायची. ते सांगायचे,  कलेच्या अभ्यासकाने संगीत, साहित्य, तत्वज्ञान सगळ्यांचा आस्वाद घ्यावा.  भारतीय तत्वज्ञानाकडे त्यांचा ओढा होता.  ‘जग महत्वाचं नाही, पण तुम्ही त्याच्याशी कसं नातं जोडता, ते महत्वाचं आहे.’ असं त्यांचं म्हणणं असायचं.

मेन म्हणजे  पळशीकरांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला, कलेचा अधिक चौकसपणे शोध घ्यायला शिकवलं. कस रंगवायचं यापेक्षा  काय रंगवायचं, कलेचा आशय काय आणि हे सर्व कशासाठी, म्हणजेच कलेचं अंतिम उद्देश काय हे प्रश्न त्यांना जास्त महत्वाची वाटायची. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि कलाविष्कार करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याचा प्रभाव नंतरच्या पिढीतल्या चित्रकारांवर पडला.

सर्वसाधारणपणे सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टची अकॅडमिक शैली आणि प्रोग्रेसिव्ह ग्रुपने आणलेली आधुनिक कलेची दृष्टी यात विरोध असल्याचं मानलं जात. पण ते काय सगळं खरं नाही.  जे. जे. मध्ये चार्ल्स जेरार्ड, ज.द. गोंधळेकर  आणि शंकर पळशीकर यांच्यासारख्यांनी मंडळी अकॅडमिक कलाशिक्षणाच्या चौकटीत राहून सुद्धा आधुनिक आणि समकालीन प्रवाहांच भान विद्यार्थ्यांना सात्यत्याने दिल. म्हणूनच पळशीकरांचा डीन म्ह्णून असलेला कार्यकाळ महत्वाचा ठरतो.

राजकारणात फेमस झालेले मात्र  अर्थाने व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरे असतील अथवा जागतिक दर्जाचे महान चित्रकार एम एफ हुसेन प्रत्येकाच्या जडणघडणीत जे जे स्कुल ऑफ आर्ट आणि त्याचे पळशीकरांसारखे दिन यांचा सिंहाचा वाटा आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.