कल्पना चावलाच्या पावलावर पाऊल ठेवत भारताची तिसरी लेक अंतराळात सफर करणार….

कल्पना चावला माहित नाही असा माणूस विरळचं.. भारताची पहिली महिला अंतराळवीर. जिने स्पेसमध्ये भरारी घेतली आणि बरीच महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. मात्र, तिच्या  स्पेसशिपचा अपघात झाला आणि कल्पनाचा तिथेच मृत्यू झाला.

पण यानंतर आता पुन्हा एकदा कल्पनाच्या पावलावर पाऊल ठेवत भारताची आणखी एक लेक अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे. जी अर्थातच भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

येत्या ११ जुलैला वर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रेनसन अंतराळाच्या सफरीवर जाणार आहेत. त्यांच्यासोबत ५ जणांची टीम आहे. याच टीम मध्ये भारतात जन्मलेली सिरीशा बांदल सुद्धा आहे.

कोण आहे सिरीशा बांदल ?

सिरीशा मूळची आंध्र प्रदेशातील गुंटूरची राहणारी. तिनं पर्ड्यू युनिव्हर्सिटीमधून अरोनॉटिकल इंजिनीरिंग पूर्ण केलं. नंतर जार्जटाउन युनिव्हर्सिटीमधून एमबीए पूर्ण केलं. सिरीशाने २०१५ मध्ये वर्जिन गॅलॅक्टिक जॉईन केलं.  त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

सिरीशा बांदल वर्जिन ऑर्बिटच्या वॉशिंगटनचं कामकाजही सांभाळते. या कंपनीने नुकताच बोईंग ७४७ प्लेनच्या मदतीने एक सॅटेलाईटला अंतराळात लॉन्च केले होते. सिरीशा वर्जिन गॅलॅक्टिक कंपनीत सरकारी प्रकरणं आणि शोध कार्याशी संबंधित अधिकारी आहे.

याआधी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिनं ग्रीनव्हिले टेक्सासमध्ये एल-३ कम्युनिकेशनमध्ये एक एयरोस्पेस इंजीनियर म्हणून sophisticated aircraft components ला डिझाईन करण्याचं काम केलं होत. त्यांनतर सिरीशानं  कमर्शियल स्पेसफ्लाइट फेडरेशन (CSF) मध्ये एक स्पेस पॉलिसीसाठी काम केले.

तिसरी भारतीय महिला

कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स नंतर सिरिशा ही तिसरी भारतीय महिला आहे, जी अंतराळात पाऊल ठेवणार आहे. भारताकडून राकेश शर्मा सगळ्यात आधी अंतराळात गेले होते. यांनतर पहिली महिला अंतराळ म्हणून कल्पना चावला गेली होती.

दरम्यान, अमेरिकन अंतराळयान कंपनी वर्जिन गॅलॅस्टिकचे रिचर्ड ब्रेनसन आपला मित्र जेफ बेजोसच्या नऊ दिवस आधी अंतराळात जाण्याची योजना आखातायेत. कंपनीनं गुरुवारी घोषणा करत म्हंटल कि, त्यांचा पुढचा अंतराळ प्रवास ११ जुलैला असेल. हे अंतराळ या न्यू मेक्सिकोमधून भरारी घेईल.

या प्रवासात सहभागी असणारे सगळे सदस्य हे कंपनीचे कर्मचारी आहेत.

वर्जिन गॅलॅस्टिकसाठी अंतराळात जाण्याची ही चौथी वेळ असेल.  गॅलॅस्टिकच्या या  घोषणेच्या काही तास आधी बेजोसची कंपनी ब्लु ओरिजिननं म्हंटल होत कि, बेजोस २० जुलैला अंतराळात जातील आणि त्यांच्यासोबत एयरोस्पेस जगातील एक टॉपची महिला वॅली फंक असेल. जिने अंतराळात जाण्यासाठी ६० वर्ष वाट पाहिली.

दरम्यान, सिरीशाच्या कुटुंबीयांनी तिच्या या यशाबद्दल म्हंटल कि,

रिचर्डबरोबर अवकाशात जाणं अर्थातच सर्वात चांगली गोष्ट असेल. आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करतो.

सिरीशाच्या कुटुंबीयांबरोबर अर्थातच सगळ्या भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. सुनीता विल्यम्सन  १९९८ मध्ये अंतराळ प्रवास केला होता. ज्याच्या  इतक्या वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा एक भारतीय अंतराळात देशाचं नेतृत्व  करणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.