द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशिया युक्रेनवर युद्धाला १२ दिवस उलटून गेलेत. युद्धाची धुमश्चक्री अजून चालूच आहे. लाखो निर्वासितांचे लोंढे युक्रेन सोडून जात आहेत. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. कुटुंबाच्या कुटुंबे तुटत आहे. पुरुषमंडळी युद्धात लढण्यासाठी देशातच आहते तर घरातल्या स्त्रियांना बाजूच्या युरोपियन देशांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. विस्तापितांची संख्या १७ लाखांच्या घरात गेली आहे.

रॉयटर्स कडून जे अंदाजे नुकसान जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार मृतांची संख्या किमान ९हजार असावी असं म्हटलं गेलंय तर $ १ हजार करोड रुपयांची मालमत्ता आतपर्यंत युद्धात उध्वस्त करण्यात आली आहे.

 १२ दिवस झाले तरी युरोप आणि अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये युद्धाचाच मुद्दा पहिल्या पानावर आहे.

द वॉशिंग्टन पोस्ट 

gh2

ओडेसा जे युक्रेनमधील अजून एक मोठे शहर आहे त्याच्या दिशने आता रशियन सैन्याने कूच केली आहे. आणि लवकरच या शहरावर बॉम्ब पडायला सुरवात होईल. चकमकी घडतील असं पोस्ट ने म्हटलं आहे. कालच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ओडेसा ने नेहमीच रशियन नागरिकांचं स्वागत केलं होतं असं म्हणत रशियन नागरिकांना आर्त साद घातली होती.

अजून एक महत्वाची बातमी म्हणजे चर्चेच्या तिसऱ्या फेरीनंतरपण युक्रेन रशिया युद्धाचा काही तोडगा निघालेला नाहीये. 

रशियाबरोबरच जगालाही शॉक बसू शकतोय अशी अजून एक बातमी म्हणजे अमेरिकेच्या दोन्ही पक्षांनी रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करण्याच्या ठरावाला संमती दिली आहे. जर अमेरिकेने असं केलं आणि इतर मित्र राष्ट्रांनी त्यांचं अनुकरण केलं तर आधीच गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.

त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग बातमी म्हणजे पूर्ण युरोपात रशियन नागरिक, ते चालवत असलेले व्यवसाय यांना लोकं वाळीत टाकत आहे. झेक रिपब्लिक मध्ये ऐका प्रोफेसरने तर रशियन विद्यार्थ्यांना शिकवणार नाही असं म्हटलं होतं.

अल -जझीरा 

Capture 67

अल -जझीरा ने दिलेले मुख्य अपडेट्स 

रशियाने मंगळवारी सकाळी नवीन सिझफायर जाहीर केला, युक्रेनियन लोक ‘त्यांना कोठे जायचे आहे’ ते निवडू शकतात असंही सांगण्यात आलं .

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणतात की रशिया युक्रेनमध्ये नव्याने भरती सैनिकांचा वापर करणार नाही आणि तेथे “अतिरिक्त राखीव सैनिकांना कॉल-अप देखील केले जाणार नाही”.

युक्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या हल्ल्यांकडे रशियन हालचालींमुळे नागरी मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान वाढले आहे, असं पँटागॉनने म्हटलं आहे.

इतर देश रशियाला ऑइल इंपोर्टच्या बंद करण्याचं धमक्या देत असताना एका उच्च रशियन अधिकाऱ्याने चेतावणी दिली आहे की रशियन तेल आयातीवरील पाश्चात्य बंदीमुळे तेलाच्या किंमती  दुप्पट होऊ प्रति बॅरल सुमारे $300 पर्यंत जाऊ शकतात आणि रशियापासून जर्मनीपर्यंतची मुख्य गॅस पाइपलाइन देखील बंद केली जाऊ शकते.

द मॉस्को टाइम्स 

Capture fgd

‘मी माझ्या देशावर प्रेम करतो आणि सरकारचा  द्वेष करतो’ या सदराखाली मॉस्को टाइम्समध्ये युद्धाला विरोध करणाऱ्या रशियन नागरिकांच्या प्रतिक्रिया छापल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय नुक्लियर एजन्सीने सोमवारी सांगितले की युक्रेनच्या वेढा घातलेल्या दुसऱ्या शहर खार्किवमध्ये तोफांच्या गोळ्यांनी अणु संशोधन केंद्राचे नुकसान केल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत  परंतु “रेडिओलॉजिकल परिणाम” झाले नाहीत.

पुतीन यांनी मीडियावर कडक बंधनं घातल्यानंतर द मॉस्को टाइम्सला त्यांच्या सर्व बातम्या एक तर बातम्या कोणत्यातरी एजन्सीच्या हवाल्याने द्याव्या लागत आहेत किंवा रशियाच्या विरोधाततील बातम्या देता येत नाहितंय असंच दिसतंय. युक्रेन मध्ये सध्या काय चालू आहे याचं पेजही बऱ्याच दिवसांपासून अपडेट झालेलं नाहीये.

ग्लोबल टाइम्स 

इतरांपेक्षा एक्झॅक्ट उलट्या बातम्या देण्याची परंपरा चीनच्या ग्लोबल टाइम्स ने चालूच ठेवली आहे.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे फ्रान्समध्ये NATO सोडण्याची मागणी होत आहे.

फ्रान्सच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी केलेल्या नाटो सोडण्याच्या मागणीचा आधार घेत ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

युक्रेनमध्ये कृष्णवर्णीय आणि इतर कलरचे  लोक जे अनुभवत आहेत ते पाश्चिमात्य देशांमध्ये  खोलवर रुजलेल्या वर्णद्वेष आणि पांढऱ्या वर्चस्वाचा  समर्थन करते असं एक एडिटोरिअल ही ग्लोबल टाइम्स ने छापले आहे.  युक्रेनमधनून निघताना आफ्रिकन लोकांनी भेदभावाचा आरोप केला होता. त्यावर या आर्टिकल मधून टीका करण्यात आली आहे 

द गार्डियन 

युक्रेनने सोमवारी मॉस्कोकडून आलेली लोकांना सुरक्षितपणे नेण्यासाठीची कॉरिडॉरची ऑफर नाकारली.  हे कॉरिडॉर निर्वासितांना रशिया आणि बेलारूसमध्ये जाण्यास फोर्स करतात त्यामुळे याला विरोध असल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे.

युक्रेनचे प्रेसिडेंट झेलन्स्की यांनी पुन्हा राष्ट्राला संबोधित करताना युद्धातून कोणत्याही परिस्तिथीत मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे.

 युक्रेनच्या प्रतिकाराने रशियाची झोप उडाली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. युक्रेनमधील मानवतावादी संकट तीव्र होत चालले आहे कारण रशियन सैन्याने त्यांचे हल्ले तीव्र केले आहेत, तर अन्न, पाणी, उष्णता आणि औषधांची कमतरता वाढत चालली आहे.

तसेच ब्रिटनचे गृह सचिवांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. युक्रेनच्या मदतीसाठी वल्गना करणाऱ्या ब्रिटनने आता पर्यंत फक्त ३०० विस्थापितांना आश्रय दिला आहे. 

तर जग युद्धाकडे असं बघतंय. आम्ही रोज तुम्हाला त्याचा अपडेट आहे तश्या देत आहोत. जर तुम्हाला यामध्ये काही नवीन माहिती असेल तर आम्हला कमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.