सिवानचे ‘गांधीजी’ ज्यांनी रिटायरमेंट नंतर सुद्धा आपली समाजसेवा सोडली नाही

आपल्या आसपास अशी अनेक मंडळी असतात, जी कुठलाही स्वार्थ न बाळगता समाज कार्यात स्वतःला झोकून देतात. पण प्रकाश झोतातून ते स्वतःला नेहमी बाजूला ठेवतात, त्यामुळेच त्यांच्या या कामाची दखल सहसा त्यांच्या गावापुरती किंवा आसपासच्या परिसरापुरती मर्यादित राहते. असचं एक नाव म्हणजे घनश्याम शुक्ला.
आता हे नाव कोणाला सहसा माहीतही नसेल. पण भिडू त्यांची दखल एका दिग्गज अभिनेत्याने घेतलीये. आता स्टोरीला सुरुवात करण्याआधी हे ट्विट एका बघाचं,
एक बेहतर शिक्षक एक समाज को कैसे सुंदर दिशा देता है उसका प्रत्यक्ष उदाहरण घनश्याम शुक्ल मास्टर जी रहे हैं। विद्यालय,पुस्तकालय,डिग्री कॉलेज और ग्रामीण बालिकाओं हेतु मेरीकॉम स्पोर्ट्स क्लब की स्थापना जैसा वृहद कार्य, गुरु जी को सादर श्रद्धांजलि, आप याद आएँगे और प्रेरणा देते रहेंगे pic.twitter.com/n9kFUT80H7
— पंकज त्रिपाठी (@TripathiiPankaj) December 23, 2021
हे ट्विट आहे मिर्झापूर मधल्या फेमस अशा त्रिपाठींच म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी याचं. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्रिपाठींनी या आपल्या ट्विटमध्ये ‘मास्टर जी घनश्याम शुक्ला’ यांचा उल्लेख केलाय. ज्यांचं नुकताच निधन झालंय. त्यामुळे हे अनोळखी चेहरा असलेले घनश्याम शुक्ला नक्की आहेत कोण अशा चर्चा सुरु झाल्यात.
तर घनश्याम शुक्ला हे बिहारमधील पंजवार भागातल्या सिवान गावचे. पेशाने ते शिक्षण होते. शिक्षक म्हणजे एक समाजसेवेचाच पेशा. त्यांना रिटायर होऊन बरीच वर्षे झालीत. आता रिटायर झाल्यांनतर आपल्यातली बरीच मंडळी निवांत आयुष्य जगतात. इतकी वर्ष इतरांसाठी जगलो, आता आपण आपलं आयुष्य जागून घ्यावं, अश्या विचारात मंडळी असतात. ज्याची प्लॅनिंग कित्येक दिवस आधीच करतात.
पण घनश्याम गुरुजी त्याला अपवाद आहेत. आपल्या नोकरीतून रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपला शिक्षकी पेशा सोडला नाही.यासोबतच त्यांनी लोकांना सामाजिक समरसतेचा धडा शिकवला. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या नियमांना चिकटून राहिले.
सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आणि लोकांना सामाजिक समरसतेचा धडा शिकवणे हा घनश्याम शुक्ला यांच्या जीवनाचा उद्देश होता. १९७४ च्या जेपी आंदोलनातही मास्टरजींनी अतिशय सक्रिय भूमिका बजावली होती. याच काळात सध्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार अनेक दिवस त्यांच्यासोबत राहायचे. आपल्या शिक्षकी पेशातून निवृत्तीनंतर त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी तसेच क्रीडा, संगीत आणि सांस्कृतिक कार्यात पूर्णपणे वाहून घेतलं.
त्यांच्या याच कार्यामुळं पंजावर भागात त्यांना गांधीजी नावं ओळखलं जायचं.
घनश्याम शुक्ला यांनी मुलींच्या शिक्षणासाठी गावातच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, प्रभा प्रकाश पदवी महाविद्यालय, महिला स्पोर्ट्स क्लब, बिस्मिल्ला खान संगीत महाविद्यालय यासोबतच डझनभर संस्थांचा पाया घातला. त्यांचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी उच्च पदावर आहेत.
अशा या समाजसेवकाचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं.ज्यामुळे आसपासच्या भागात शोककळा पसरली आहे.
घनश्याम शुक्ला यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी सुद्धा शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की,
‘घनश्याम शुक्ल गुरुजी हे एक उत्तम शिक्षक समाजाला सुंदर दिशा कशी देऊ शकतात याचा प्रत्यक्ष पुरावा होता. ग्रामीण भागातील मुलींसाठी शाळा, वाचनालय, पदवी महाविद्यालय, मेरी कोम स्पोर्ट्स क्लब अशी अनेक उत्कृष्ट कामे त्यांनी केली आहेत. गुरुजींना आदरांजली, ते नेहमीच स्मरणात आणि प्रेरणेत राहतील. ‘
हे ही वाच भिडू :
- वीर गंगा नारायण सिंह यांनी केलेल्या चुआडच्या बंडामुळे इंग्रज नाकीनऊ आले होते
- गरिबीत संघटना चालवली पण गांधीजींनी काँग्रेसकडून देऊ केलेली मदत स्वीकारली नाही
- किनवट सारख्या दुर्गम भागात आदिवास्यांचे आरोग्य सांभाळणारा देवमाणूस