फांसी का फंदा टुटेगा, जॉर्ज हमारा छुटेंगा पासून ते अबकी बार.. या आहेत फेमस घोषणा.

घोषणा पाहीजेत, त्याशिवाय प्रचाराला मज्जा नाय. ह्या वेळीच्या घोषणा विचारल्या तर मोदी हे तो मुमकीन हैं आणि फिर एकबार मोदी सरकार अशा घोषणा आहेत. कॉंग्रेसच्या घोषणा ऐकायला देखील आल्या नाहीत. आत्ता यावरुन तुम्ही आम्हाला ४० पैसे वाली गॅंग दिसतेय म्हणून चिडवू शकता पण खरं सांगा कॉंग्रेसची घोषणा आहे का काही ? 

नाय म्हणायला कोल्हापूरात यंदा आमचं ठरलय हे फेमस झालय. इकडे अमोल कोल्हेंच माझ मत अमोल आहे हे पण ऐकायला आलं पण त्यात एवढी मज्जा वाटत नाही. थोडक्यात यंदा मज्जा नाही अस वातावरण दमदार घोषणा न दिल्यामुळं तयार झालं आहे अस वाटतय. 

असो तर महत्वाचा मुद्दा इलेक्शनमध्ये घोषणा पाहीजे. त्याशिवाय मज्जा नाही. पण या घोषणांची सुरवात कधी झाली.

पहिल्यांदा देशात १९५२ साली इलेक्शन झाली हे आत्ता बारकं पोरगं पण सांगतो पण घोषणा कधी आणि कोणती देण्यात आली हे कोण सांगू शकत नाही. उत्तर शोधायला गेल्यानंतर पहिली घोषणा मिळते ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५७ च्या इलेक्शनला दिलेली. ते मेरठ येथील एका सभेत बोलत असताना म्हणाले होते हमें छलांग मारनी हें. लोकांनी याच वाक्याला घोषणा केली. आत्ता साधं वाटतं असली तरी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला हमें छलांग मारनी हैं हे वाक्य जोष देणारंच होतं. त्यानंतरच्या कोणत्याच इलेक्शनमध्ये विशेष काही झाल्याचं ऐकण्यात येत नाही. 

माहिती मिळते ती थेट इंदिरा गांधींच्या काळातील.

खर पहायचं झालं तर इंदिरा गांधी असताना त्यांच्या बाजून आणि विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा झाल्या. लोकांच्यात त्या खोलवर मुरल्या. १९७१ साली गरिबी हटाओ ची घोषणा इंदिरा गांधी यांच्याकडून देण्यात आली. लोकांनी मोठ्या उत्साहात गरिबी हटाओंचा नारा देत इंदिराबाईंच सरकार सत्तेत आणलं. पुढे याच घोषणेला विरोधकांनी इंदिरा हटाओची जो़ड दिली. त्यानंतर आणिबाणी आली आणि खऱ्या अर्थाने घोषणांचा जोर वाढला. 

१९७७ सालची घोषणा ठळकपणे लोकांकडून सांगितले जाते,

ती घोषणा होती सन सतहत्तर की ललकार, दिल्ली मे जनता सरकार, संपूर्ण क्रांति का नारा हैं, भावी इतिहास हमारा हैं, नसंबंदी के तीन दलाल, इंदिरा, संजय बंसीलाल. फांसी का फंदा टूटेगा, जॉर्ज हमारा छुटेगा,आणिबाणीच्या विरोधात असणाऱ्या अशा कित्येक घोषणांमुळे इंदिराबाईंच सरकार कोसळलं.

पुढे जनता पक्षाला घरघर लागली. जनता पक्ष विखुरला आणि इलेक्शन लागलं. त्यावेळी घोषणा होती आधी रोटी खाऐंगे इंदिरा जी को लाएेंगे,  इंदिरा लाओं देश बचाओं हि घोषणा तर सुपरहिट झाली होती. ऑपरेशन ब्लू स्टार आखण्यात आलं. त्याची किंमत इंदिरा गांधींना आपल्या प्राणाने द्यावी लागली. अशा काळात घोषणा देण्यात आली जब तक सुरज चांद रहैंगा इंदिराजी तेरा नाम रहेंगा. या घोषणेमुळे १९८४ साली मोठी सहानभूतीची लाट निर्माण झाली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देखील राजीव तेरा ये बलिदान याद करेंगा हिंदूस्तान हि घोषणा लोकांना जोडणारी ठरली होती. 

दरम्यान १९८० च्या काळात देखील तत्कालीन परस्थितीचा विचार करुन सरकार ओ चुने जो चल सके चा नारा देण्यात आला होता. १९६७ ला पंडित दिनदयाल उपाध्याय नी हर हाथ को काम हर खेत को पानी हर रोगी को दवाई हर बच्चे को पढाई जनसंघ की निशानी हि घोषणा दिली होती. 

१९९१ च्या इलेक्शनमध्ये राजीव गांधी यांच्या काळात स्थायित्व को वोट दें कॉंग्रेस को वोट दें ची घोषणा दिली होती. मंडल आयोग लागू करण्यात आल्या नंतर कॉंग्रेसला फटका बसण्याची चिन्ह होती त्यावेळी ना जात पर ना पात पर स्थिरता की बात पर, मुहर लगेगी हाथ पर अशी घोषणा देण्यात आली होती. त्याच दरम्यान भाजपकडून धोषणा देण्यात आली होती की, सबको परखा,हमको परखो. त्याचसोबत राम, रोटी और स्थिरता हा राम मंदिरानंतर दिलेली घोषणा होती. तसेच बहुजन समाजामार्फत तिलक, तराजू और तलवार, इनको मारों जूते चार अशी घोषणा देखील देण्यात आली होती. 

बसपा मार्फत अजून एक घोषणा देण्यात आली होती ती म्हणजे हाथी नहीं गणेश हैं ब्रम्हा विष्णू महेश हैं. लालू प्रसाद यांनी लाठी उठावन, तेल पिलावन, भाजप भगावन अशी घोषणा दिली होती. 

१९९८ ला अबकी बारी, अटल बिहारी या घोषणेतून जोर पकडण्यात आला. राज तिलक की करो तेयारी आ रहें हें अटल बिहारी हि देखील त्यापैकीच एक. नंतर २०१४ सालीच मोदींच्या लाटेत घोषणा देण्यात आल्या. अगली बारी अटलबिहारी पासून सुरू झालेला प्रवास अबकी बार मोदी सरकार वरती येवून थांबला. अंधेरा छटेंगा सुरज उगेंगा कमल खिलेंगा हे देखील मोठ्या काळानंतर पुन्हा फेमस झालं. तशी लाट आज मात्र सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना निर्माण करता येत नाही. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.