स्मृती ताईंनी राहुल बाबाला असं बोललं नाय पायजे..

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ही घोषणा ऐकली की आपला ऊर कसा अभिमानाने भरून येतो. मोदी सरकारची हि घोषणा महिलांमुलीं विषयी असणाऱ्या उद्दात विचारांची आठवण करून देते. पण मोदी सरकारमधल्या एक मंत्री आहेत त्यांनी प्रियांका गांधींवर टीका करताना म्हंटलंय,

घर पर लड़का है, पर लड़ नहीं सकता.

आता यावर स्मृती इराणी सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यात. लोक म्हणतायत राजकारण हा काय फक्त पुरुषांचाच विषय आहे का ? स्मृती इराणी असं भेदभाव करणार वक्तव्य कस काय करू शकतात ?

आता लोक असं का म्हणतायत, नक्की असं काय झालं कि स्मृती इराणींना हे असं म्हणावं लागलं ?

तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, सध्या उत्तरप्रदेश मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची जोराशोरात तयारी सुरु आहे.  सगळेच पक्ष आपला आपला प्रचार करतायत. साहजिकच प्रचार आला की नेते एकमेकांवर चिखलफेक करणार, हे काही नवं नाही. तसंच नेतेमंडळी निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसतायत.

अशी क्लुप्ती लढवली काँग्रेसच्या प्रियांका गांधी – वाड्रा यांनी. त्यांनी एक घोषणा दिली त्यात त्या म्हणतायत,

लड़की हूं, लड़ सकती हूं

आता त्या नुसत्या घोषणा देऊनच थांबल्या नाहीत तर त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४० टक्के सीट्स महिलांसाठी राखीव ठेवणार असल्याची पण घोषणा केली. म्हणजे उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४० टक्के महिला उमेदवार असतील.

आता या घोषणेवर भाजपवाले शांत बसतील का ? अजिबात नाही.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी या घोषणेवर पलटवार करायचं अस मनोमन ठरवलंच असेल बहुधा. एका टेलिव्हिजन चॅनेलवर मुलाखत देत त्या राहुल गांधी यांना टार्गेट करत म्हंटल्या,

घर पर लड़का है, पर लड़ नहीं सकता.

पुढं त्या म्हणतात, उत्तरप्रदेशात निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. आम्हाला आशा आहे की नीतिमत्ता, विकास आणि लोकशाही यांचा विचार जनतेकडून केला जाईल.

प्रियांका गांधींच्या महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्यावर त्या म्हंटल्या,

याचा अर्थ असा ही निघतो की त्यांना ६० टक्के महिलांना उमेदवारी द्यायची नाही. माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही की, महिलांनी राजकारणात प्रयत्न करूच नये. जिंकणं हरणं हा राजकारणाचा एक भाग आहे. मी पण २०१४ मध्ये पराभूत झाले होते. विषय हा आहे की लोकांचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास पाहिजे.

आता हे काही असो, पण स्मृती इराणींनी राहुल गांधींना असं बोलायला नको होतं, बरं का..

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.