म्हणून चिन्मय मांडलेकरला प्रत्येक सिन नंतर “भारत माता की जय” म्हणावं लागायचं…

काश्मीर फाईल्स पिक्चर रिलीज होऊन ९ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. मात्र अजूनही पिक्चर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत आहे.सध्या काश्मीर फाईल्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे

इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली आहे.

“काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा या पिक्चर चर्चेत आला आहे.

९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर होणारा अन्याय, त्यांचे पलायन आणि त्यांची हत्या यावर वाचा फोडणारा पिक्चर म्हणून काश्मीर फाईल्सनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या पिक्चर संदर्भात दोन गट सुद्धा पडले होते. रिलीज होण्याच्या आधीपासून हा पिक्चर वादात अडकला आहे.  

यातील कास्टिंगची सुद्धा मोठी चर्चा झाली होती. या पिक्चर मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

असं सांगितलं जातं की, काश्मीर खोऱ्यात १९८९ पासून काश्मिरी पंडितांच्या हत्या होऊ लागल्या होत्या. या हत्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा आतंकवादी फारुख मल्लिक बिट्टा याने घडवून आणल्या होत्या. त्यामुळे पिक्चर मधील त्याचा रोल तगड्या कलाकाराने करणे गरजेचं होत.  

चिन्मय मांडलेकरला काश्मीर फाईल्ससाठी कास्टिंग पल्लवी जोशी यांनी केलं होत. 

 या सगळ्यात चिन्मय मांडेकरने केलेला फारुख बिट्टाचा रोल सगळ्यांच्या लक्षात राहिला. त्याने केलेल्या रोल बद्दल एकीकडे कौतुक होतंय तर काही जण शिव्या सुद्धा देत आहेत.

चिन्मय मांडलेकरने सेम फारुख बिट्टा उभा केल्याचे सांगितलं जातंय. 

ऍक्टिंगची तयारी करण्यापूर्वी पिक्चरचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी फारुख मल्लिक बिट्टाचे सगळे व्हिडीओ मांडलेकरला पाठविले होते. 

लोकांना फारुख बिट्टा किती क्रूर होता हे समजले पाहिचे होते यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे चिन्मय मांडलेकर सांगतो. बिट्टा क्रूर होता. पिक्चर मधून हा मेसेज जायला हवा यासाठी चिन्मय मांडेलकर काम करत होते. 

एक सिन होता ज्यात भारत विरोधी नारे द्यायचे होते. मात्र, सहकारी कलाकारांनी विरोधी केल्यावर सेटवरच वातारण तापलं होत.  

पिक्चर मध्ये मध्ये एक सिन होता. त्यात चिन्मय मांडलेकरला काश्मीर मधील एका चौकात जीप वर उभं राहून भारत देशा विरोधात भाषण, नारे द्यायचे होते. याअगोदर पिक्चरचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने चिन्मय मांडलेकरला सहा वेगळ्या अँगलने तो सिन शूट करायचे असल्याचे सांगितले होते. 

पण त्यापूर्वी त्या सिनची रियसल करायची होती. त्या सिन मध्ये फारुख मल्लिक बिट्टाचा रोल करणाऱ्या चिन्मय मांडेलकर भारत विरोधी नारे येऊन भाषण करणार होता. सिनची रियसल करायला लागताच सेट वरील सर्व कलाकार लोकांनी विरोध केला. आणि हे सगळं भारत विरोधी आहे असं सांगितलं. 

हा कुठला पिक्चर आहे म्हणत, आम्ही भारत विरोधी नारे देणार नसल्याचे सांगितले. 

यामुळे सेट वरच वातारण चांगलंच तापलं होत. त्यानंतर चिन्मय मांडेलकरने गाडीच्या बोनेटवर बसून तिथल्या आर्टिस्ट, कलाकार लोकांशी संवाद साधला. त्यांना सांगितले की, हा पिक्चरचा सिन आहे. प्रत्येक पिक्चर मध्ये व्हिलनअसतो. ते काम कोणीतरी केलं पाहिजे. या पिक्चर मध्ये ते काम मी केलं आहे. 

यानंतर सुद्धा ते लोक शांत बसायला तयार नव्हते.  

चिन्मय मांडेलेकरने स्वतःचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील फोटो तिथे उपस्थित असणाऱ्यांना  दाखविले. तो त्यांना म्हणाला की, मी मराठी क्टर आहे. अनेक ऐतिहासिक पिक्चर, सिरीयल मध्ये काम केले आहे. चिन्मय मांडेलकरांनी त्याने आज पर्यंत कुठल्या कुठल्या पिक्चर मध्ये काम केलं याची सगळी माहिती दिली.  

हे सगळं पाहून काश्मिरी नागरिक म्हणाले की, मग ठीक आहे आम्ही तुमच्या सिन मध्ये काम करायला तयार आहोत. मात्र, त्यांनी यावेळी एक अट घातली. 

ती म्हणजे प्रत्येक टेक नंतर भारत माता की जय हा नारा द्यायचा.  

चिन्मय मांडलेकरांनी ही अट मान्य केली. त्यानंतर प्रत्येक टेक नंतर स्वतः चिन्मय मांडलेकर जीप वर उभे राहून भारत माता की जयची घोषणा देत होते. यानंतर तिथं असणाऱ्या स्पॉट बॉय पासून पिक्चर मध्ये लहान मोठ्या अभिनेत्यांनी जो बोले सो निहाल पासून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा सगळ्या घोषणा, नारे यावेळी देण्यात येऊ लागले होते. 

हे नारे दिल्यानंतर सेट वरील गरम वातारण बदलून गेलं होत. आणि तिथल्या लोकांनी सुद्धा त्यांच कौतुक केलं होत. हा सीन मसुरीच्या लायब्रेरी चौकात हे शूट घेण्यात आले होते. यासाठी तिथले लोकल आर्टिस्ट गोळा करण्यात आले होते. 

हे ही वाच भिडू

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.