म्हणून 1995 सालापासून भारतात असणाऱ्या डॉमिनोजचा मार्केटमध्ये 70 % ताबा आहे

टूथपेस्ट म्हटलं की कोलगेट, पाणी बॉटल म्हटलं की बिसलेरीच नाव घेतलं जातं त्याच प्रमाणे पिझ्झा म्हटलं की डॉमिनोजच नाव आपसूकच घेतलं जातं.

भारतात डॉमिनोज बरोबर इतरही कंपन्या आल्या, भारतीय कंपन्यांनी सुद्धा पिझ्झा मार्केट मध्ये आल्या मात्र यात कोणीही टिकू शकले नाहीत. भारतीय पिझ्झा मार्केट चा विचार केला तर एकट्या डॉमिनोजचा ७० टक्के हिस्सा आहे. डॉमिनोज आपल्या इतर प्रतिस्पर्धापेक्षा काय वेगळे केलं, कुठली स्ट्रॅटेजी वापरली ते पाहूया.

ग्लोबलायझेशन नंतर भारतात आलेल्या कंपन्यापैकी एक डॉमिनोज होती. 

१९९० मध्ये पिझ्झा कंपन्यांची चैन भारतात आली होती. मात्र त्यांना भारतीय लोकांना आवडते, कुठल्या  खाद्य पदार्थाची चव आवडते ते कळालेच नाही. इतर पिझ्झाना भारतीय लोकांच्या चवीचं बॅलन्स सांभाळता आलं नाही. ते म्हणजे फॉरेनची चव आणि भारतीय चव. 

भारतात डॉमिनोज आलं १९९५ साली आणि पिझ्झा हट १९९६ मध्ये आले.

तसा दोन्ही कंपन्यात भारतात  एकच वर्षाचा फरक आहे. तेव्हा एक क्लास सोडला तर पिझ्झा, बर्गर बद्दल काही आवड नव्हती. मार्केट पण खूप लहान होत. 

इथल्या मार्केट मध्ये यशस्वी ठरल्याचे असेल तर भारतीयांना आवडणारी चव दिली पाहिजे हे डॉमिनोज ठरविले त्यानुसार चिकन टीका, पनीर चीज, तिखट आवडणाऱ्यांसाठी रेड पाप्रिका. दक्षिण भारतात आउटलेट मध्ये कच्ची केळीचा असणारा पिझ्झा दिला. भारतात चिकन फार आवडीने खाल्ले जाते त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला होता. 

कुठल्याही देशात गेल्यावर तिथले स्थानिक पदार्थांचा समावेश असायलाच पाहिजे. तेच डॉमिनोज ने केलं. हे फक्त भारतातच नाही तर इतर कुठल्याही देशात करायला हवं. 

फास्ट डिलिव्हरी नाही तर पिझ्झा फ्री ..

डॉमिनोज जे यश मिळाला ते इतर पिझ्झा कंपन्यांना मिळविता आले सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फास्ट डिलिव्हरी. २० मिनिटात जर पिझ्झा पोहचला नाही तर तो फ्री देण्यात येईल अशी जाहिरात केली होती. आणि त्याप्रमाणात लोकांना पिझ्झाची फास्ट डिलिव्हरी मिळू लागली. इतर कुठल्याच कंपन्यांना हे जमलं नाही. त्यांना पिझ्झा डिलिव्हरी द्यायला ३० किंवा त्यापेक्षा जास्त मिनिटे लागायची. 

भारतात डॉमिनोजची फ्रॅन्चायजी देणाऱ्या ज्युबीलीयंट फूड वर्क्स दिलेल्या माहिती नुसार,

डॉमिनोज ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी देणारी पहिली कंपनी होती. भारतात ऑनलाईन फूड कल्चर राबविले ते डॉमिनोजने.  

डॉमिनोजने २०१३ मध्ये ॲप आणलं. २०१३ मध्ये डॉमिनोजचे पिझ्झा ऑनलाईन १७ टक्के विकले जात. २०१९ चा विचार केला तर डॉमिनोच्या पिझ्झाची ७५ टक्के विक्री ऑनलाईन माध्यमातून झाली आहे. भारतात डॉमिनोजचे ॲप वापरणाऱ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे.

२०१८ मध्ये एकट्या डॉमिनोजने ५१० मिलियनच्या पिझ्झाची विक्री केली होती. 

जाहिरात आणि इंटरनेटच्या जमान्यात पिझ्झा, बर्गरची भुरळ तरुणांबरोबर लहान मुलांना आहे. वेगळ काही तरी ट्राय करायचं म्हणून ग्रामीण भागात सुद्धा पिझ्झा फेमस होत आहे. यामुळे डॉमिनोज ने आपला मार्ग ग्रामीण भागाकडे वळविला आहे.

सध्या भारतात २३० शहरात १ हजार ४१० आऊटलेटच्या माध्यमातून सेवा देत आहे. पुढच्या ५ वर्षात ५०० शहरापर्यंत डॉमिनोजचे पोहचणार आहे. पिज्जा हटचे ४३० आउटलेट आहेत. तर पापा जॉन्स ने २०१७ मध्ये ६६ आउटलेट बंद केलीत.

भारतातच नाही तर अमेरिकेत सुद्धा डॉमिनोज इतर कंपन्यांना बाजूला काढून नंबर वन बनली आहे. अमेरिकेत डॉमिनोज ने सुद्धा पिझ्झा वॉर जिंकलं त्याच कारण होत फास्ट डिलिव्हरी आणि त्यांच्या ॲपमधील सुटसुटीत पणा. अमेरिके नंतर सर्वाधिक डॉमिनोज आऊटलेट भारतात आहेत. 

भारताचं पिझ्झा मार्केट हे १.२५ बिलियन डॉलर एवढं आहे अमेरिकेचा विचार केला तर ४६.७ बिलियन डॉलर आहे. डॉमिनोज ने भारतीय मार्केट मध्ये आपला दम बसविला होता. एकही प्रतिस्पर्धी जवळपास नाही.   

 हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.