पाण्याचा ग्लास जवळ नव्हता, त्यावरुनच लक्षात आले मुलाखत फिक्स्ड आहे.
पुन्हा एकदा गाव गोळा. वर्षातलं पहिलं गावगोळा करणार हे सदर. परवा आमच्या एका भिडूला MPSC करणारा एक भिडू पेठेत भेटला. बोलभिडूच कौतुक केल आणि म्हणाला गावगोळा भारी आहे. गावभर बोंबलत फिरण्यापेक्षा इथं एकाच छत्राखाली कमेंट वाचायला भारी वाटतं. तसही प्रत्येक नोट्स वेगवेगळ्या वाचण्यापेक्षा एकनाथ पाटलांचा ठोकला कधीही चांगलाच म्हणायचा. २०१९ च्या वर्षातली आमच्यासाठी पहिली कमेंट हि होती की गावगोळा सदर हे एकनाथ पाटलांचा ठोकळा आहे.
असो ठोकळा तर ठोकळा, मुद्दा हा आहे की जे घडतय ते लोकांना सांगायचा.
आत्ता झालं अस की कालपरवापर्यन्त आपण सगळे होतो २०१८ मध्ये. दोन दिवसात आपण आलो २०१९ मध्ये. आत्ता दोन दिवसात कोण नव्या वर्षात सेट होत असत का? पण हे सगळ्या भारताच शिवधनुष्य पेलणाऱ्या आदरणीय प्रधानसेवकांनी हि कामगिरी पार पाडली. २०१९ ला काय होणाराय याची झलक दाखवण्यासाठी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालातील पहिली मुलाखत दिली. मुलाखत पाहीली आणि आपण आत्ता २०१९ मध्ये सेट होवू शकतोय याची शाश्वती आम्हाला मिळाली.
आत्ता अजून एक्स्ट्रा ग्यान सांगून आपण प्रत्यक्ष कमेंटसत्राला सुरवात करू. २०१८ साला सगळ्यांची लग्न जमली. द ग्रेट शुभ विवाह सोहळा पार पडले. २०१९ नंतर काय होणार याची सर्वात जास्त धास्ती सिंगल लोकांनी घेतली होती. २०१९ ला दाखवतोच, बघु लाट किती राहत्या, आत्ता संपतय, नाय आघाडीत बसल, गडकरी होतील पंतप्रधान, देशात येतय राज्यात जातय वगैरे वगैरे चर्चाना ऊत आलेला.
हळुहळु उत्तर मिळतीलच तुर्तास प्रधानसेवकांच्या मुलाखतीबद्दल गाव काय म्हणतय ते पाहू.
“पहिली कमेंट दिसली, नरेंद्र मोदी यांच्या जवळ पाण्याचा ग्लास नव्हता त्यामुळे मुलाखत फिक्स्ड होती हे लक्षात आले”.
“एकही विरोधी प्रश्न नाही. त्यामुळे मुलाखत फिक्स्ड.”
“मोदींनी सगळ ठरवल्यासारखे बोलले, त्यामुळे मुलाखत फिक्स्ड”
थोडक्यात मुलाखत फिक्स्ड म्हणणारे ५० टक्यांच्या आकडेवारीला शिवत आहेत. बर यात जितेंद्र आव्हाडांनी देखील तसाच आरोप केला आहे. त्यांच्या बातमीला मात्र अनेकांनी सर तुम्ही यदा यदा ही म्हणून दाखवा म्हणून उत्तर दिल आहे हा भाग वेगळा. तर पोत्यांनी कमेंट या मोदींनी मुलाखत फिक्स्ड केली होती असेच आरोप करणाऱ्या आहेत आत्ता दूसरा मुद्दा म्हणजे जस ठाकरे सिनेमाच्या आवाजाला विरोध करताना चेतन सशीतल यांच्या आवाजाची मागणी करण्यात आली होती तशी या ठिकाणी मोदींनी रविश कुमार यांना मुलाखत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
थोडक्यात लोकशाही लोकांच्या मागण्यांना हळुहळु बळ यायला लागलं आहे.
आत्ता तातडीने कॉंग्रेसने यावर पत्रकार परिषद घेवून पंधरा लाखाचा मुद्दा अजेंड्यावर आणला. लोकांच देखील असच मत आहे की पंधरा लाखाचं काय झालं. पण अशा व्यक्तींना मोदी समर्थक चांगलच सुमडीत घेत आहे. एकजण तर म्हणाला घरी ये तुला देतो पंधरा लाख. ( घराचा पत्ता आम्ही देखील शोधत आहोतच)
एकजण म्हणाला, मुलाखतीमध्ये देखील हातवारे करुन बोलणारे जगातले पहिले पंतप्रधान. दूसरा म्हणतो, आपली माती आपली माणसं आजपर्यन्त ऐकलं होतं काल पाहीलं आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तर.
आत्ता कमी जास्त फरकावर हे असच आहे, बाकी मोदी समर्थक याला कस उत्तर देत आहेत तर नेहमीप्रमाणं इधरसे आलू उधरसे सोना टाईप. याहून विशेष अस काहीच नाही. बाकी, तुम्हाला काही सुचल तर कमेंट बॉक्स आहेच.
हे ही वाचा.
- जीते तो राहूल जिंदाबाद, और हारे तो इंशाअल्लाह EVM तेरे तुकडे होंगे..
- आव्वाज कुणाचा, सचिन खेडेकरांचा !!!
Best Actor of the Indian political Era….????????????????